एक्स्प्लोर

Cidco Homes Lottery 2025 : शेवटची संधी चुकवू नका, सिडकोच्या 26000 घरांच्या नोंदणीसाठी दोन दिवस बाकी

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या नवी मुंबईतील माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेद्वारे 26 हजार घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची संधी आहे.

नवी मुंबई : शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोनं (Cidco) नवी मुंबईत 67 हजार घरांची निर्मिती करुन नागरिकांना विक्री करण्याची योजना आणली आहे. त्यापैकी 26 हजार घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेद्वारे पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवून घेतले जात आहेत. सिडकोनं अर्जदारांना शेवटची संधी देत मुदतवाढ देखील दिली होती. त्यानुसार 25 जानेवारीपर्यंत नोंदणी शुल्क भरुन अर्ज सादर करता येईल. त्यानंतर प्राधान्यक्रम नोंदवून बुकिंग शुल्क भरावं लागेल. 

सिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस 

सिडकोनं दिलेली मुदत यापूर्वी संपली तेव्हा 55 हजार अर्जदारांनी नोंदणी शुल्क जमा केलं होतं. 11 जानेवारीपासून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र, अर्जदारांना आणखी संधी देत मुदतवाढ देण्यात आली होती. 25 जानेवारीपर्यंत नोंदणी शुल्क भरुन अर्ज सादर करता येतील. तर, प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी 26 जानेवारीची अंतिम मुदत आहे. प्राधान्यक्रम नोंदवताना 15 घरांसाठी नोंदवायचा आहे. प्राधान्यक्रम नोंदवल्यानंतर बुकिंग शुल्क भरावं लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अर्जदारांना बुकिंग शुल्क 75 हजार रुपये भरावं लागेल. अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना दीड लाख रुपये बुकिंग शुल्क भरावं लागेल.  

सिडकोची घरं कुठं आहेत? 

अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी तळोजा, खारघर बसडेपो, बामणडोंगरी, खारकोपर आणि कळंबोली बस डेपो येथील घरांसाठी अर्ज करता येतील. तर, अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना पनवेल, खारघर, तळोजा , मानसरोवर, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, वाशी ट्रक टर्मिनल, खारकोपर आणि खारघर या भागातील घरांसाठी अर्ज करता येतील.

सिडकोच्या घरांच्या किमती किती? 

आर्थिक दुर्बल घटक  (EWS ) गटात अर्ज करणाऱ्यांसाठी म्हणजे ज्यांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न 6 लाखांपर्यत आहे. त्या गटासाठी घरांच्या किमती या 25 लाखापासून 48 लाखांपर्यंत ठेवण्यात आल्या आहेत. तर अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) आर्थिक वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त आहे.  या गटामध्ये  घराच्या किमती या 40 लाखांपासून ते 97 लाखांपर्यंत ठेवण्यात आले आहेत. 

सिडकोनं 'माझे पसंतीचे सिडको घर' या योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु करुन घेतली होती. मात्र, किमती जाहीर केल्या नव्हत्या. किमती जाहीर केल्यानंतर काही अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, सिडकोनं नवी मुंबईतील घरांच्या किमतीचं समर्थन करत त्यामध्ये कपात केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

गट EWS ( आर्थिक दुर्बल घटक )

तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख 
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख 
खारघर बस डेपो - 48. 3 लाख 
बामणडोंगरी -31. 9 लाख 
खारकोपर  2A, 2B -38.6 लाख 
कळंबोली बस डेपो  - 41.9 लाख 

अल्प उत्पन्न गट एलआयजी -

 पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख
 खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख 
 तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख 46.4 लाख 
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख 
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख 
खारकोपर ईस्ट - 40.3 लाख 
वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख 
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख

इतर बातम्या :

दावोसमधून महत्वाची बातमी समोर! हैदराबादमध्ये होणार 20000 कोटींची गुंतवणूक, नोकरीच्या मोठ्या संधी

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget