Zomato चे सीईओ 2026 पर्यंत बिनपगारी काम करणार,दीपिंदर गोयल यांनी असा निर्णय का घेतला? जाणून घ्या
Zomato CEO : हॉटेलमधील खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या सीईओंनी मोठा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या भारतातील प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल चर्चेत आहेत. सध्या झोमॅटोच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळतेय. या दरम्यान दीपिंदर गोयल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. झोमॅटोच्या सीईओनं आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 3.5 पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. गोयल यांनी याबाबत स्वत:हून पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2020-21 मध्ये दीपिंदर गोयल यांनी 2023-24 पर्यंत म्हणजेच 3 वर्ष पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. गोयल यांनी आणखी दोन वर्ष पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी दोन वर्ष मोफत काम करणार
कंपनीच्या कागदपत्रांनुसार दीपिंदर गोयल यांनी 24 मार्च 2021 पासून 1 एप्रिल 2024 पर्यंत पगार न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून 31 मार्चपर्यंत ते पगार घेणार नाहीत. गोयल सध्या झोमॅटोचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून काम करत आहेत. या काळात ते वेरिएबलची रक्कम घेतील. ती रक्कम कंपनीचं संचालक मंडळ निश्चित करेल.
दीपिंदर गोयल यांच्याकडे झोमॅटोचे 4.18 टक्के शेअर आहेत. याची किंमत 10 हजार कोटी रुपये आहे. झोमॅटोच्या शेअरमध्ये एका वर्षात 140 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. आज बाजार बंद झाला तेव्हा झोमॅटोच्या शेअरची किंमत 277.35 रुपये होती.
झोमॅटोचं बाजारमूल्य 26 नोव्हेंबर दुपारी 1 वाजेपर्यंत 2,45,243 कोटी रुपये आहे. झोमॅटोची स्पर्धक कंपनी असलेल्या स्विगीचं बजारमूल्य 99845 कोटी रुपये आहे.
मान्यताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 8500 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा निर्णय झोमॅटोनं घेतला आहे. याला अजून मंजुरी मिळाली नाही. याशिवाय बीएसईवर स्टॉक 30 सेन्सेक्समध्ये कंपनी सहभागी झाली आहे. झोमॅटोनं क्यूआयपीद्वारे निधी उभारणीसाठी प्रतिसमभाग 265.91 रुपये रक्कम निश्चित केली आहे.
झोमॅटोनं यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार क्यूआयपीद्वारे मिळालेली रक्कम संस्था त्यांचा ताळेबंद भक्कम करण्यासाठी वापपरणार आहे. कंपनी त्यांची उपकंपनी ब्लिंकिटच्या विस्तारीकरणाबाबत देखील विचाार करत आहे. सध्या ब्लिंकिट कंपनी झेप्टो आणि स्विगीच्या पुढे आहे.
इतर बातम्या :
बापरे बाप...मुंबईतल्या वरळीत एका घराची किंमत तब्बल 105 कोटी, सुविधा वाचून व्हाल थक्क!
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)