Burger King Share Price | बर्गर किंगची धमाकेदार ओपनिंग, गुंतवणूकदारांना मिळाला बंपर प्रीमियम
Burger King Share Price : बर्गर किंगच्या शेअर्सना भारतीय शेअर मार्केमध्ये 90 टक्क्यांहून जास्त प्रीमियमसोबत धमाकेदार लिस्टिंग पाहायला मिळाली आहे.
Burger King Share Price : बर्गर किंगच्या शेअर्सची भारतीय शेअर बाजारात लिस्टिंग झाली आहे. बर्गर किंगच्या शेअर्सना भारतीय शेअर मार्केटमध्ये 90 टक्क्यांहून जास्त प्रीमियमसोबत धमाकेदार लिस्टिंग पाहायला मिळाली आहे. बीएसईवर बर्गर किंगचा शेअर 115.35 रुपयांवर लिस्ट झाला आहे. त्याचसोबत बर्गर किंगच्या शेअरची ओपनिंग 92.25 टक्के प्रीमियमवर झाली होती. बर्गर किंग आयपीओला किरकोळ गुंतणवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
बर्गर किंगच्या आयपीओची प्राइज बँड 59-60 रुपये होती. दरम्यान याची लिस्टिंग बीएसईवर 115.35 रुपयांवर झाली आहे. याव्यतिरिक्त सुरुवातीच्या टप्प्यातच बीएसईवर बर्गर किंगचा शेअर 119.80 रुपयांच्या उच्च दरावर पोहोचला होता. तसेच याची लो प्राइज 108.40 रुपये होती.
यापूर्वी किरकोळ गुंतवणूकदारांकडून संस्थात्मक आणि गैर संस्थात्मक, दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांचा याला मोठा प्रतिसाद मिळाला. चार डिसेंबर रोजी आयपीओ सब्सक्राइब करण्याचा शेवटचा दिवस होता. बर्गर किंगच्या आयपीओला मिळेली मागणी हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कंपनीने जेवढे शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध केले होते, त्यापेक्षा आयपीओला 156.65 पट जास्त मागणी आली आहे. 7.44 कोटी शेअर विक्रीसाठी उपलब्ध असताना 11.67 कोटी शेअर्ससाठी मागणी आली. आपल्या शेअर मार्केटमधील दमदार परफॉर्मंन्समुळे ते 2020 मधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मागणी मिळालेले आयपीओ बनले आहेत.