एक्स्प्लोर

Budget 2022 : अर्थसंकल्पातून पुढील 25 वर्षांच्या विकासाचे नवे गाजर : अशोक चव्हाण  

Budget 2022 : " यंदाच्या अर्थसंपल्पातून नवीन काहीच देण्यात आले नाही. देशाची दिशाभूल करण्यासाठी या अर्थसंकल्पातून पुढील 25 वर्षांच्या विकासाचे नवे गाजर दाखवण्यात आल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली. 

Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. "या अर्थसंकल्पातून नवीन काहीच देण्यात आले नाही. शिवाय देशाची दिशाभूल करण्यासाठी या अर्थसंकल्पातून पुढील 25 वर्षांच्या विकासाचे नवे गाजर दाखवण्यात आल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

अशोक चव्हाण म्हणाले, " या आधी केंद्र सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. परंतु, त्या घोषणांची अद्याप अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार, देशात शंभर स्मार्ट सिटी उभारणार, 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था, महागाईवर नियंत्रण, प्रत्येक बेघराला घर, ‘मेक इन इंडिया’तून उत्पादन क्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा 25 टक्क्यांवर नेणार, अशा अनेक घोषणा केंद्र सरकारने केल्या होत्या. परंतु, यातील एकही घोषणा अद्याप पूर्ण झालेली नाही "

"यंदाचा अर्थसंकल्प पोकळ"
यंदाचा अर्थसंकल्प पोकळ असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. "यंदाच्या अर्थसंकल्पाला भाजपचे अनेत नेते ऐतिहासिक अर्थसंकल्प म्हणत आहेत. परंतु, यंदाचे अर्थसंकल्पीय भाषण गेल्या अनेक वर्षातील सर्वात लहान भाषण आहे. केंद्र सरकारकडे भरीव काही नाही, असते तर अर्थसंकल्पीय भाषणातून ते सांगितले असते. परंतु, सांगण्यासारखे काहीच नसल्याने हे भाषण संक्षिप्त झाले असावे. शेतकरी, बेरोजगार, नोकरदार, लहान-मोठे व्यावसायिक व उद्योजक आणि गरिबांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पातून काहीच देण्यात आले नाही. त्यामुळे हा एक पोकळ अर्थसंकल्प ठरला आहे, असा हल्लाबोल अशोक चव्हाण यांनी केला.  

अशोक चव्हाण म्हणाले,  "केंद्र सरकार दावा करत आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा 8 ते 9 टक्क्यांच्या वेगाने विकास होत आहे. जानेवारी 2022 मध्ये 1 लाख 40 हजार कोटींचे विक्रमी जीएसटी संकलन झाले. जर हे खरे असेल तर देशाच्या या वाढत्या उत्पन्नाचा अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना थेट भरीव आर्थिक लाभ का मिळाला नाही? याचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे.  

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget