(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Union Budget 2023: कांजिवरम ते पोचमपल्ली; 5 अर्थसंकल्प अन् 5 साड्या, अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांचा खास पेहराव
Nirmala Sitharaman Saree: 2019 पासून 2023 पर्यंत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण खास पेहरावात दिसून आल्या. त्यांच्या या लूकची चर्चा सध्या होताना दिसतेय.
Union Budget 2023 Live : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी यावर्षी यंदाच्या कार्यकाळातील पाचवा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे (India Budget 2023) लागले आहे. अर्थसंकल्पातून मोदी सरकारच्या (Modi Government) पोतडीतून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. पण यंदाच्या अर्थसंकल्पात एक वेगळीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. ती चर्चा म्हणजे, निर्मला सीतारमण यांच्या साडीची. आज अर्थसंकल्पाचं बहिखातं आणि अर्थमंत्र्यांच्या साडीचा रंग सारखाच होता. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या लूकनं सर्वांचंच लक्ष वेधलं.
2019 ते 2022 या अर्थसंकल्प दिवसांपर्यंत निर्मला सीतारमण यांच्या साड्या नेहमीच चर्चेत राहिल्यात. बऱ्याचदा निर्मला सीतारमण हातमागावरील साड्या परिधान करताना दिसून आल्यात...
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काळ्या रंगाची बॉर्डर असलेली लाल रंगाची साडी नेसली होती. लाल रंगातील अर्थसंकल्पाचं बहिखातं आणि अर्थमंत्र्यांची साडी यंदा चर्चेचा विषय होता. लाल रंग शौर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. 2019 पासून आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांचा लूक कसा होता, हे जाणून घेऊयात...
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना हटके लूक केला होता. त्यांच्या साडीनं सर्वांचंच लक्ष वेधलं. 2023-24 चा अर्थसंकल्प लाल रंगाच्या संबलपुरी सिल्क साडीत सादर केला, ज्याला टेम्पल साडी देखील म्हटलं जातं.
निर्मला सीतारमण यांच्या लूकबाबत बोलायचं झालं तर, त्या नेहमी हातमाग आणि सिल्कच्या साड्यांचा वापर करताना दिसतात. 26 जानेवारीला, त्या अर्थसंकल्पापूर्वी पार पडलेल्या हलवा समारंभात हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या कांजीवरम साडीत दिसल्या होत्या. विशेष प्रसंगी, त्या संबलपुरी, इकत, कांजीवरम साड्यांमध्ये दिसून येतात.
2022 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी कॉफी कलरची साडी नेसली होती. ज्यावर सोनेरी रेषा होत्या. या साडीला बोमकाई किंवा सोनपुरी साडी असंही म्हणतात. डार्क मरून रंगाचा पदर आणि ब्लाउज असलेली ही हातमागाची सिल्क साडी होती.
2021 मध्ये निर्मला सीतारामन यांनी बंगालची प्रसिद्ध पोचमपल्ली साडी नेसली होती. ही साडी ऑफ व्हाईट रंगाची होती आणि त्या साडीला लाल प्रिंटेड बॉर्डर होती. बंगालची पोचमपल्ली साडी ही एक खास साडी आहे. साधारणतः ही साडी पांढरी किंवा ऑफ व्हाईट असते, ज्यावर रुंद लाल बॉर्डर असते.
2020 मध्ये अर्थमंत्र्यांची साडी चांगलीच चर्चेत होती. त्यांनी पिवळ्या रंगाची कांजीवरम सिल्क साडी नेसली होती. त्यां साडीला सोनेरी काठ होते. त्यावर्षी 29 जानेवारीला वसंत पंचमी साजरी झाली. वसंत पंचमीनंतर दोन दिवसांनी, जेव्हा अर्थमंत्र्यांनी पिवळ्या साडीत अर्थसंकल्प सादर केला तेव्हा त्यांचा लूक विशेष चर्चेत होता.
2019 मध्ये निर्मला सीतारमण यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी त्यांनी गडद गुलाबी रंगाची मंगलगिरी साडी नेसली होती आणि या साडीवर गोल्डन बॉर्डर होती. त्याच वर्षी सीतारामन यांनी लेदर बॅग ऐवजी बहिखात्याचा वापर केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :