CNG : सीएनजीसंदर्भात अजित पवारांची मोठी घोषणा, गॅसचा भाव कमी होण्याची शक्यता
Ajit Pawar Announsment on CNG: अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. त्यांनी सीएनजी (CNG) संदर्भात मोठी घोषणा केली आहे.
Ajit Pawar Announsment on CNG: विधानसभेत आज (Maharashtra Vidhan Sabha) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. त्यांनी सीएनजी (CNG) संदर्भात मोठी घोषणा केली आहे. यामुळं सीएनजी आणि घरगुती पाईप गॅसचा दर कमी होण्याची शक्यता आहे. पर्यावरणास पूरक असणाऱ्या नैसर्गिक वायुचा घरगुती पाईप गॅस, सीएनजीवर चालणारी मोटार वाहने, ऑटो रिक्षा, टॅक्सी, खाजगी वाहने यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. पर्यावरण पूरक असणाऱ्या नैसर्गिक वायुच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक वायुवरील मूल्यवर्धित कराचा दर हा 13.5 टक्क्यांवरुन कमी करुन 3 टक्के कमी करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळं राज्याला अंदाजे 800 कोटींची महसुली घट होणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
नैसर्गिक वायूवरील कर, मुद्रांक शुल्कात सवलती प्रस्तावित
महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क थकबाकी तडजोड 2022 अभय योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेमुळे वस्तू आणि सेवा कर लागू होण्यापूर्वी विक्रीकर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध करांवरील सवलती संदर्भात विचार केला जाईल. ही योजना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी असेल. पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक वायुवरील मूल्यवर्धीत कर 13.5 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर आणला जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलती प्रस्तावित करण्यात आल्या असून जल वाहतुकीवरील करात पुढील तीन वर्ष सवलत देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून आकारण्यात येणाऱ्या करास पुढील 3 वर्षांसाठी सूट
तसेच राज्यात जलवाहतुकीस चालना देण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अंतर्गत 1 जानेवारी 2022 पासून सुरु नव्यानं सुरु झालेल्या जलमार्गांवरील चालणाऱ्या फेरीबोट, रो रो बोटी यामधून प्रवास करणारे प्रवासी, पाळीव प्राणी, वाहने, मालांवरील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून आकारण्यात येणाऱ्या करास पुढील 3 वर्षांसाठी सूट देण्यात येत आहे, अशी घोषणा अजित पवारांनी केली.
संबंधित बातम्या