एक्स्प्लोर

Railway Budget 2023 Maharashtra : परळी वैजनाथ-बीड-नगर नवीन रेल्वे मार्ग होणार; रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 13 हजार कोटींची तरतूद

Railway Budget 2023 Maharashtra :  रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 13 हजार 539 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परळी वैजनाथ-बीड-नगर यासह इतर नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे.

Railway Budget 2023 Maharashtra : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेसाठी मोठी तरतूद केली. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी केली. वर्ष 2013 च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात 9 पटीने वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे अर्थसंकल्पात राज्यासाठी 13 हजार 539 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मराठवाड्यासाठी रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भुसावळ विभागासाठी 1470.94 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

अर्थसंकल्पानंतर रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेला किती रक्कम, प्रकल्प आले याची अनेकांना उत्सुकता लागली होती. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प आणि इतर कामांसाठी 13 हजार 539 कोटींचा निधी दिला आहे. आतापर्यंतहा महाराष्ट्रासाठी सर्वाधिक निधी असल्याचा दावा रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी केला. आज, दिल्लीतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले की, यंदाच्या अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटीचा निधी महाराष्ट्राला दिला आहे. वर्ष 2009 ते 2014 या दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्रासाठी 1170 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्या तुलनेत महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी यंदा मोठी तरतूद आहे. 

रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटले की, वंदे मेट्रो या वर्षी डिझाइन केली जाणार आहे. दोन शहरांना जोडण्याचं काम ही ट्रेन करणार आहे. त्याशिवाय, याच वर्षात हायड्रोजन ट्रेन तयार केली जाणार आहे. सध्या त्याच्यावर काम सुरू आहे. डिसेंबर 2023 पर्यंत हायड्रोजन ट्रेन तयार होणार आहे. 

महाराष्ट्रासाठी प्रमुख प्रकल्प 

> नांदेड-देगलूर-बिदर नवीन रेल्वेमार्गसाठी 100 कोटी रुपये तरतूद
> अंकाई-संभाजीनगर दुहेरीकरण मंजुरी नाहीच
> नांदेड - यवतमाळ -वर्धा नवीन रेल्वेमार्ग 850 कोटी  रुपये
>  परळी वैजनाथ - बीड-नगर नवीन रेल्वेमार्ग 400 कोटी 95लाख रुपये
> दौंड - मनमाड दुहेरीकरण 430  कोटी रुपये
>  लोंढा-मीरज-पुणे दुहेरीकरण 900 कोटी रुपये
> कल्याण - कसारा तिसरी लाईन 90 कोटी रुपये
> मनमाड-जळगाव तिसरी लाईन 350 कोटी रुपये
>  वर्धा-नागपूर तिसरी लाईन 150 कोटी रुपये
>  वर्धा - बल्हारशहा तिसरी लाईन 300 कोटी रुपये
> नागपूर-इटारसी तिसरी लाईन 310 कोटी रुपये
> वर्धा -नागपूर चौथी लाईन 150 कोटी रुपये
> अकोला-खंडवा-महू गेज कनव्हर्जन साठी 700 कोटी रुपये
> सोलापूर -तुळजापूर-धाराशिव 110 कोटी तरतूद
>  धुळे -नरडाणा 100 कोटी रुपयांची तरतूद

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं

व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Embed widget