आठवड्यातून फक्त 5 दिवस बँका उघडणार? तुमच्या काय परिणाम होणार का?
आठवड्यातून दोन दिवस बँका बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत बँका जर आठवड्याला 5 दिवस उघडल्या तर त्याचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होईल? यासंदर्भाती माहिती आपण पाहुयात.
Bank : लवकरच देशातील सर्व बँकामध्ये (Bank) आठवड्यातून फक्त 5 दिवस कामकाज होण्याची शक्यता आहे. आता दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. पण आता आठवड्यातून दोन दिवस बँका बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत बँका जर आठवड्याला 5 दिवस उघडल्या तर त्याचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होईल? यासंदर्भाती माहिती आपण पाहुयात.
कॉर्पोरेट जगतातील बहुतांश कार्यालयांपासून ते सरकारी खात्यांपर्यंत आणि शेअर मार्केटमध्येही केवळ आठवड्यातून पाच दिवस काम केले जाते. अशा स्थितीत बँकांमध्ये 6 दिवस कामकाज कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळं लवकरच देशातील बँका आठवड्यातून फक्त 5 दिवस उघडतील अशी शक्यता आहे. असे झाले तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? 'इंडियन बँक्स असोसिएशन' (IBA), भारतात कार्यरत असलेल्या सर्व व्यावसायिक बँकांच्या संघटनेने अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आहे की बँकांसाठीही कामकाजाचे पाच दिवस द्यावेत. आता यावर अंतिम निर्णय अर्थ मंत्रालयाला घ्यायचा आहे. दरम्यान, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत IBA कडून असा प्रस्ताव मिळाल्याबद्दल सांगितले आहे.
सध्या ही यंत्रणा बँकांमध्ये कार्यरत
सध्या देशातील सर्व बँकांमध्ये महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाच दिवसांचा कार्य सप्ताह म्हणून काम केले जाते. सध्या दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. बँका दर रविवारी आगाऊ बंद राहतात. आयबीए आणि बँक युनियनकडून यासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे, मात्र याबाबत सरकारची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासामध्ये वाढ होणार
बँकांमध्ये कामाचे दिवस हे सूत्र स्वीकारले, तर आठवड्याच्या उरलेल्या दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांमध्ये नक्कीच वाढ होईल. यामुळं सामान्य लोकांना अतिरिक्त बँकिंग तासांमध्ये त्यांचे काम पूर्ण करण्याची सुविधा मिळू शकते. याचा अर्थ सामान्य लोकांसाठी बँका इतर दिवशी जास्त तास सुरू राहू शकतात. त्याचा एक तोटा काम करणाऱ्या लोकांसाठी असू शकतो. नोकरदार लोक, जे पूर्वी बँकेशी संबंधित काम महिन्यातून 2 शनिवारी पूर्ण करू शकत होते, त्यांना आता ते फक्त आठवड्याच्या दिवशीच करावे लागेल. मात्र, आता बँकेचे बहुतांश कामकाज ऑनलाईन झाले असल्याने त्याचा कितपत परिणाम होईल, हे पाहावं लागेल.
बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार
बँक कर्मचाऱ्यांसाठी (Bank Employees) एक दिलासादायक बातमी आहे. लवकरच बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. कारण, इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटना यांच्यात पगारात 17 टक्के वाढ करण्याचा करार झाला आहे. हा करार 1 नोव्हेंबर 2022 पासून प्रभावी मानला जाईल. तसेच पुढील पाच वर्षांसाठी लागू राहील. त्यानुसार, पगारवाढीमुळं एसबीआयसह सर्व सरकारी बँकांवर 12 हजार 449 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून पगारवाढीची मागणी करत होते. आता ही मागणी पूर्ण झाली आहे. याचा फायदा अंदाजे 9 लाख कर्मचारी आणि 3.8 लाख अधिकाऱ्यांना होणार आहे. मात्र, यामुळं सर्व सरकारी बँकांवर 12 हजार 449 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
पगारात 17 टक्के वाढ होणार
या करारानुसार सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांमध्ये 17 टक्के पगारवाढ होणार आहे. यासाठी 12449 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सुमारे 9 लाख कर्मचारी आणि 3.8 लाख अधिकाऱ्यांना नवीन कराराचा फायदा होणार आहे. 7 डिसेंबर रोजी आयबीए आणि कर्मचारी संघटना यांच्यात चर्चा झाली. पगारवाढीबाबत सामंजस्य करारही करण्यात आला. नवीन पगारवाढीची प्रक्रिया 6 महिन्यांत पूर्ण होईल.
महत्त्वाच्या बातम्या: