Bank Holiday List : जून महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार? सुट्ट्यांची यादी पाहून बँकेतील कामांचं नियोजन करा
June Bank Holiday List:जून महिना आजपासून सुरु झाला आहे. या महिन्यात बँकांना 12 दिवस सुट्टी असेल. मात्र, या वेळेत ऑनलाईन बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा एटीएमद्वारे आर्थिक कामं करता येऊ शकतात.

June Bank Holiday List: जून महिना आजपासून सुरु झाला आहे. आर्थिक कामं पूर्ण करण्यासाठी जून महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जून महिन्यातील आर्थिक नियोजन करण्यासाठी कोणत्या दिवशी सुट्टी असणार हे माहिती असणं आवश्यक आहे. चेक बँकेत जमा करणे, पासबूक अपडेट करणं याशिवाय शाखेत जाऊन इतर कामं पूर्ण करण्यासाठी बँकेत जाणं महत्त्वाचं असतं. बँकेत गेल्यानंतर आपली कामं लगेचच पूर्ण होण्यासाठी या महिन्यात बँकेला कोणत्या दिवशी सुट्टी आहे, हे माहिती असणं आवश्यक आहे.
जून महिन्यात 12 दिवस बँकांना सुट्टी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार जून 2025 मध्ये वेगवेगळ्या राज्यात बँका 12 दिवस बंद राहतील. रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. काही सार्वजनिक आणि प्रादेशिक सुट्ट्यांचा समावेश देखील त्यात आहे. त्यानुसार जून महिन्यात 12 दिवस बँका बंद राहणार असल्या तरी त्या वेगवेगळ्या भागात बंद असतील. पूर्ण भारतभर या सुट्ट्या लागू नसतील. काही राज्यामध्ये बँकांना सुट्ट्या असतील तर काही राज्यात बँका सुरु असतील.
जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी
1 जून: रविवार असल्यानं बँका संपूर्ण देशभरात बंद असतील.
6 जून: शुक्रवारी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद निमित्त बँका काही राज्यांमध्ये बंद असतील.
7 जून: शनिवारी बहुतांश राज्यात बकरी ईद किंवा ईद-उज-जुहा ची सुट्टी असेल.
8 जून: बँकांना रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल.
11 जून: बुधवारी संत गुरु कबीर जयंती आणि सागा दावा निमित्त सिक्किम आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.
14 जून: महिन्यातील दुसरा शनिवार असल्यानं बँका बंद राहतील.
15 जून:रविवारी बँका बंद राहतील.
22 जून: रविवार असल्यानं बँका संपूर्ण देशभरात बंद असतील.
27 जून:शुक्रवारी रथ यात्रा किंवा कांग निमित्त ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँका बंद राहतील.
28 जून :चौथ्या शनिवारी बँका बंद राहणार
29 जून:रविवार असल्यानं बँका संपूर्ण देशभरात बंद असतील.
30 जून: सोमवारी मिझोरममध्ये रेमनानिमित्त बँका बंद राहतील.
























