Bajaj Housing Finance IPO : पैसे तयार ठेवा, नवा IPO येतोय; Bajaj चा 'हा' आयपीओ बाजारात येण्याच्या तयारीत, साईज 6500 कोटी
Bajaj Housing Finance IPO : गेल्या अनेक दिवसांपासून बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओची (Bajaj Housing Finance IPO) गुंतवणूकदार वाट पाहत होते. आता त्यांची प्रतिक्षा संपली आहे.
IPO Alert Bajaj Housing Finance: मुंबई : आयपीओमध्ये (IPO) पैसे टाकायचेत आणि त्यासाठी चांगल्या IPO ची वाट पाहताय? मग आणखी थोडे दिवस थांबा. एक मोठी कंपनी बाजारात आपला आयपीओ घेऊन येत आहे. त्यामुळे तुम्हाला कमाई करण्याची नामी संधी आहे. कारण IPO मार्केटमध्ये 6 हजार 500 कोटी रुपयांचा मोठा इश्यू उघडणार आहे. देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेला बजाज ग्रुप (Bajaj Group) आपला आयपीओ बाजारात घेऊन येत आहे. बजाज ग्रुपची बजाज हाऊसिंग फायनान्स (Bajaj Housing Finance Limited) ही कंपनी येत्या 9 सप्टेंबर रोजी गुंतवणुकदारांसाठी आयपीओ बाजारात घेऊन येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओची (Bajaj Housing Finance IPO) गुंतवणूकदार वाट पाहत होते. आता हा बहुप्रतिक्षित IPO गुंतवणूकदारांसाठी लवकरच खुला होणार आहे. 9 सप्टेंबर 2024 पासून बोली लावता येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुंतवणूकदारांना यामध्ये पैसे गुंतवण्यासाठी तीन दिवसांचा अवधी असेल आणि तो 11 सप्टेंबर रोजी बंद होईल. दरम्यान, कंपनीनं अद्याप प्राईज बँड (Bajaj IPO Price Band) जाहीर केलेला नाही.
प्राईज बँकची घोषणा कधी?
बजाज हाऊसिंग फायनान्सनं आपल्या प्रायमरी स्टेकहोल्डिंगचा काही भाग विकून आयपीओमार्फत मार्केटमध्ये 6 हजार 560 कोटी रुपये जमा करण्याची योजना आखली आहे. या मोठ्या आयपीओमध्ये गुंतवणुकीसाठी 3 हजार 560 कोटी रुपये वॅल्यूचे प्रेश शेअर्स जारी केले जाणार आहेत. याव्यतिरिक्त 3 हजार कोटी रुपयांचे शेअर्स कंपनीचे प्रमोटर्स आणि सध्याच्या शेअरहोल्डर्सद्वारे ऑफर-फॉर-सेल (OFS) मार्फत विकले जाणार आहेत. या IPO साठी प्राइस बँड दोन दिवसांनंतर 3 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केला जाईल, तर हा इश्यू अँकर गुंतवणूकदारांसाठी शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी उघडला जाईल.
शेअर बाजारात लिस्टिंग कधी?
9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरपर्यंत खुले झाल्यानंतर कंपनी शेअर्सच्या अलॉटमेंटची प्रोसेस 12 सप्टेंबर रोजी आणि रिफंड प्रोसेस 13 सप्टेंबरपर्यंत होणार आहे. यासोबतच बोली लावणाऱ्या गुंतवणुकदारांचे डीमॅट अकाउंट शेअर क्रेडिट करण्याची प्रक्रिया 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कंपनीच्या वतीनं शेअर बाजारात (Stock Market) कंपनी शेअर्सच्या संभाव्य लिस्टिंगसाठी 16 सप्टेंबर 2024 ची तारीख ठरवण्यात आली आहे.
ग्रे मार्केटमध्ये आतापासूनच धमाल
बजाज हाऊसिंग फायनान्सचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) इश्यूच्या प्राइस बँडची घोषणा होण्यापूर्वीच प्रति शेअर 65 रुपयांपर्यंत वाढला. कोटक महिंद्रा कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज इंडिया, ॲक्सिस कॅपिटल, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, एसबीआय कॅपिटल मार्केट्स, जेएम फायनान्शियल आणि आयआयएफएल सिक्युरिटीज यांचा समावेश आहे.
कंपनीच्या 20 राज्यांमध्ये 215 ब्रांच
बजाज हाउसिंग फायनान्सची स्थापना 2008 मध्ये झाली आणि 2015 मध्ये राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत (NHB) नोंदणी झाली. यानंतर, 2018 पासून, ही कंपनी मालमत्तांवर तारण कर्ज किंवा कर्ज देण्याच्या कामात व्यस्त आहे. ही हाउसिंग फायनान्स फर्म बजाज ग्रुपचा भाग आहे. अहवालानुसार, 31 मार्च 2024 पर्यंत, बजाज हाउसिंग फायनान्सचे 3,08,693 सक्रिय ग्राहक होते, त्यापैकी 81.7 टक्के गृहकर्ज ग्राहक होते. कंपनीचे 20 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 174 ठिकाणी 215 शाखांचे मोठे नेटवर्क आहे.
(वरील बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, त्यानंतरच पाऊल उचलावं.)