एक्स्प्लोर

Election Result Share Market : विधानसभा निवडणूक निकालाचा असा झाला होता शेअर बाजारावर परिणाम

Share Market And Election Result : देशातील निवडणूक निकालांचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो. याआधीच्या निवडणूक निकालांचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले होते.

Share Market And Election Result : देशातील निवडणूक निकालांचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो. आज 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी समजली जात आहे. याआधी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला होता. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणूक निकालांचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले होते. त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप...

उत्तर प्रदेश सन २०१७ मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा समाजवादी पक्ष सत्तेवर होता. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीमध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली होती. तर, एक महिन्यानंतर सरासरी 3.4 टक्क्यांनी वाढ झाली. 

गुजरातमध्ये 2017 मध्ये झालेल्या निवडणुकांचे अनेकांचे लक्ष होते. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर ही निवडणूक झाली होती. ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. भाजपने आपली सत्ता कायम राखली. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीमध्ये १ टक्के वाढ झाली होती. तर, महिनाभरानंतर निफ्टी 4 टक्क्यांनी वधारला होता.
 
सन २०१८ मध्ये मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका चुरशीच्या झाल्या होत्या. काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीच जागांचे अंतर राहिले होते. निवडणूक निकालानंतर भाजप सत्तेतून पायउतार झाली आणि काँग्रेसने सत्ता हाती घेतली. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीमध्ये 1.8 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर महिनाभरात 2.3 टक्क्यांनी निफ्टी वधारला.  राजस्थान विधानसभेची निवडणूक २०१८मध्ये पार पडली. भाजपला पराभूत करत काँग्रेसने सत्ता मिळवली. निकाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीत 1.8 टक्क्यांनी वाढ झाली. तर, एका महिन्यात 2.3 टक्क्यांनी वाढ झाली. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सन २०१९ मध्ये पार पडली होती. निवडणुकांच्या दिवशी भाजप आणि शिवसेना सत्तेवर होती. निकालानंतर नाट्यमय राजकीय घडामोडी झाल्या आणि भाजप सत्तेतून पायउतार झाला. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टी 1 टक्क्यांनी घसरला होता. त्यानंतर एका महिन्यानंतर निफ्टीत एक टक्क्यांनी वाढ झाली. 

सन 2020 मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने सत्ता कायम ठेवली. सन 2015 झालेल्या निवडणुकीत राजद आणि जनता दल युनायटेड यांनी सत्ता स्थापन केली होती. मात्र, नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी फारकत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली.  सन 2020 च्या निवडणुकीत भाजप-जनता दल युनायटेडने सत्ता कायम ठेवली. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीत एक टक्क्यांनी वाढ झाली होती. एक महिन्यानंतर निफ्टी 6.7 टक्क्यांनी वधारला होता. मागील वर्षी पश्चिम बंगालची निवडणूक पार पडली होती. तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीत बदल झाला नाही. तर, एक महिन्यानंतर सरासरी 6.5 टक्क्यांनी निफ्टी वधारला होता. 

शेअर बाजारावर निवडणूक निकालांप्रमाणे इतर घटकही परिणाम करत असतात. यामध्ये देशातंर्गत राजकीय परिस्थिती, सरकारचे धोरण, जागतिक पातळीवर होणारे बदल आदी घटकांचाही समावेश असतो.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?

व्हिडीओ

Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Embed widget