success story : दोन शिलाई मशीनपासून सुरुवात, आज 1400 कोटींची कंपनी; कपडे व्यवसायात स्वत:चा ब्रँड
एका अशाच महिलेनं गरीब परिस्थितीतून कपड्यांच्या व्यवसायात आपलं नावं कमावलं आहे. अनिता डोंगरे असे त्यांचे नाव आहे.
success story : सध्याच्या युगात महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटवला आहे. एका अशाच महिलेनं गरीब परिस्थितीतून कपड्यांच्या व्यवसायात आपलं नावं कमावलं आहे. अनिता डोंगरे असे त्यांचे नाव आहे. दोन शिलाई मसीनपासून सुरु झालेल्या त्यांचा प्रवास आज 1400 कोटी रुपयापर्यंत पोहोचला आहे.
अनिता डोंगरे एक सेलिब्रिटी डिझायनर आहे. अनिताचा हाऊस ऑफ अनिता डोंगरे नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे. आज त्यांची कंपनी सुमारे 1400 कोटी रुपयांची आहे. परंतू परिस्थिती त्यांच्यासाठी नेहमीच अशी नव्हती. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी हे उभं केलं आहे. फक्त 2 शिलाई मशीनपासून हा प्रवास सुरु झाला होता. संघर्षाच्या काळात त्यांना आईची पूर्ण साथ मिळाली. अनिता डोंगरे यांनी आईच्या पाठिंब्याने स्वत: फॅशनचे साम्राज्य उभे केले आहे.
अनिता डोंगरेंच्या ग्राहकांमध्ये कतरिना कैफसह आंतरराष्ट्रीय पॉप गायिका बेयॉन्सेचा समावेश
अनिता डोंगरे आज देशातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत फॅशन डिझायनर्सपैकी एक आहे. त्याच्या ग्राहकांमध्ये कतरिना कैफ आणि आंतरराष्ट्रीय पॉप गायिका बेयॉन्से यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिता डोंगरे यांच्या ब्रँडचे कपडे आणि अॅक्सेसरीज खूप महाग आहेत.
अनिता डोंगरे यांची आई एका कपड्याच्या दुकानात शिंपी म्हणून काम करायची. इथून अनिताची कपड्यांबद्दलची आवड वाढू लागली. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
अनिताच्या कुटुंबात याला खूप विरोध होता. नातेवाईकांचे टोमणे त्याला ऐकावे लागत होते. पण अनिताला आईची पूर्ण साथ मिळाली. त्यानंतर अनिताने फक्त 2 शिलाई मशीन घेऊन काम करायला सुरुवात केली. वर्षभरानंतर ती आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र झाली.
कसा झाला ब्रँडचा जन्म
फॅशन इंडस्ट्रीत महिलांची संख्या कमी असल्याचे अनिता डोंगरे यांच्या लक्षात आले. यामुळे अनिताला खूप वाईट वाटले आणि तिने स्वतःच्या शैलीत अनोखे कपडे डिझाइन करायला सुरुवात केली. त्यांनी भारतीय चालीरीतींमध्ये पाश्चात्य कपडे शिवण्यास सुरुवात केली. त्यांनी दोन्ही संस्कृतींच्या फॅशन एकत्र करून कपडे तयार केले. मात्र, कपडे विकण्याची वेळ आली तेव्हा जवळपास सर्वांनीच त्यांचे कपडे घेण्यास नकार दिला. यातून त्याचा ब्रँड प्रवास सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आज 270 स्टोअरपर्यंत कंपनीचा प्रवास झाला आहे. तर आज कंपनीचे मूल्य अंदाजे 1 हजार 400 कोटी रुपये आहे.