एक्स्प्लोर

रिलायन्सचा नवा आरोग्य विमा, जगात कुठेही घ्या उपचार; कंपनी देणार 8.3 कोटी रुपयांचा विमा

अनिल अंबानी (Anil Ambani) यांची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्सने (Reliance general insurance) नवीन आरोग्य विमा पॉलिसी लॉन्च केली आहे. त्यात अनेक मोठे आजार आणि त्यांच्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.

Anil Ambani : मुकेश अंबानी यांचे बंधू उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्सने (Reliance general insurance) नवीन आरोग्य विमा पॉलिसी लॉन्च केली आहे. त्यात अनेक मोठे आजार आणि त्यांच्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, विमा घेणाऱ्या व्यक्तीला जगात कुठेही उपचार घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.  

कर्करोग किंवा बायपास शस्त्रक्रियेचा खर्च समाविष्ट 

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने भारतीय ग्राहकांसाठी 'रिलायन्स हेल्थ ग्लोबल' पॉलिसी लाँच केली आहे. त्याच्या मदतीने भारतीय लोक जागतिक स्तरावरील आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकतील. ही पॉलिसी केवळ भारतातच नाही तर जगभरातील ग्राहकांना सर्वसमावेशक आरोग्य कवच प्रदान करते. मिळालेल्या माहितीनुसार, या आरोग्य विम्याअंतर्गत लोकांना कॅन्सर आणि बायपास सर्जरीसारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठीही कवच ​​मिळणार आहे. असा आजार केवळ देशातच नाही तर परदेशातही आढळल्यास त्याच्या उपचाराचा खर्च या विम्यांतर्गत कव्हर केला जाणार आहे.

8.3 कोटी रुपयांपर्यंत कव्हर 

'हेल्थ ग्लोबल' पॉलिसीमध्ये ग्राहकांना 1 दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे कव्हर मिळू शकते. रुपयात ही रक्कम 8.30 कोटी रुपये येते. विम्याच्या रकमेव्यतिरिक्त, निवास, प्रवास आणि परदेशात व्हिसा संबंधित मदत देखील या पॉलिसीचा एक भाग असणार आहे.

एअर अॅम्ब्युलन्सपासून ते अवयवदानापर्यंत

या पॉलिसी अंतर्गत, तुम्ही उपचारासाठी खासगी खोली देखील बुक करु शकता, कारण खोलीच्या भाड्यावर कोणतीही निश्चित मर्यादा नाही. त्याचवेळी, ग्राहकांना एअर अॅम्ब्युलन्स आणि अवयव दात्याकडून अवयव खरेदीवर झालेल्या खर्चावर विमा संरक्षण देखील मिळेल. कंपनीचे सीईओ राकेश जैन म्हणतात की, भारतात आता जागतिकीकरण होत आहे. देशातील अनेक लोक परदेशात जातात. अशा परिस्थितीत त्यांना या पॉलिसीमधून चांगले आरोग्य कवच मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या:

17 महिन्यात 156 कोटींचं अर्थसहाय्य, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा आलेख चढता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Horoscope Today 23 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Income Tax Raid At Pushpa 2 Director House: 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Horoscope Today 23 January 2025 : आजचा गुरुवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा गुरुवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget