अमूलचे चॉकलेट खाणाऱ्यांसाठी 'बॅड' न्यूज, किंमत 10-12 टक्क्यांनी महागणार, कडवट निर्णयाचं कारण काय?
अमूलचे चॉकलेट्स महागण्याची शक्यता आहे. ही वाढ थेट 10 ते 20 टक्के असू शकते. म्हणजेच चॉकलेट खरेदीसाठी तुमच्या खिशाला आणखी झळ बसू शकते.
![अमूलचे चॉकलेट खाणाऱ्यांसाठी 'बॅड' न्यूज, किंमत 10-12 टक्क्यांनी महागणार, कडवट निर्णयाचं कारण काय? amul chocolate may get increase by 20 percent due to price hike in cocoa beans अमूलचे चॉकलेट खाणाऱ्यांसाठी 'बॅड' न्यूज, किंमत 10-12 टक्क्यांनी महागणार, कडवट निर्णयाचं कारण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/d5823e802c858ceb32cdbe90f48bc9971712561070176988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : चॉकलेट हा असा खाद्यपदार्थ आहे, जो थोरामोठ्यांपासून सर्वांनाच आवडतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून चॉकलेट्स महागले (Choca) आहेत. चॉकलेट तयार करण्यासाठी लागणाऱ्या कोको बिया महागल्यामुळे चॉकलेट्सही महागले आहे. दरम्यान, चॉकलेटनिर्मितीत (Amul Chocolate) आघाडीवर असलेली भारतातील अमूल (Amul) ही कंपनी आपल्या चॉकलेटच्या किमतीत वाढ करणार आहे. अमूलसह बस्किन रॉबिन्स, केल्लानोवा या कंपन्यादेखील चॉकलेटची किंमत वाढवण्याचा विचार करत आहेत.
चॉकलेट्स 10 ते 20 टक्क्यांनी महागणार
अमूल हे ब्रँड गुजरातस्थित गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या (जीसीएमएमएफ) मालकीचे आहे. जीसीएमएमएफचे एमडी जयेन मेहता यांनी अमूलच्या चॉकलेटचे दर हे 10 ते 20 टक्के वाढण्याचे संकेत दिले आहेत.
कोको बिया महागल्या म्हणून चॉकलेट महागणार
"एक किलो कोको बियांचा भाव 800 रुपये झाला आहे. हा दर अगोदर 150-250 रुपये होता. या भाववाढीमुळे चॉकलेट निर्मितीवर संकट आले आहे. डार्क चॉकलेट निर्मितीमध्ये आम्ही आघाडीवर आहोत. या क्षेत्रात आमचा बाजारातील वाटा सर्वाधिक आहे. डार्क चॉकटेल तयार करताना कोको बियांची मदत घ्यावी लागते. मात्र या बियाच महाग झाल्यामुळे आता चॉकलेटचा दर वाढवावा लागेल. दोन महिन्यांत याबाबत निर्णय घ्यावा लागू शकतो," असं जयेन मेहता म्हणाले आहेत.
कोको बिया महागण्याचे कारण काय?
भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चॉकलेट्स महागले आहेत. या भाववाढीमुळे गोड लागणारे चॉकलेट्स आता कडवट लागतं की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. जगभरात कोको बियांची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी चॉकलेटनिर्मितीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कोको बिया महागल्या आहेत. चॉकलेटनिर्मिती करायची असेल तर त्यासाठी प्रकिया केलेल्या कोकोच्या बिया लागतात. झाडांपासून काढलेल्या कोकोच्या बिया थेट वापरता येत नाहीत. सध्या कोकोच्या बियांची किंमत थेट दुपटीपेक्षाही जास्त झाली आहे. परिणामी प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना या बियांची खरेदी करणे परवडेनासे झाले आहे. त्याचा थेट फटका चॉकलेट निर्मितीवर झाला असून जगभरातील चॉकलेट निर्मिती करणारे कारखाने चॉकलेट्सचे भाव वाढवत आहेत.
हेही वाचा :
'पिंक टॅक्स' म्हणजे काय रे भाऊ? महिलांना कसं लुटलं जातं? वाचा...
सोने तारण ठेवून कर्ज घ्यावं का? नेमकी काय काळजी घ्यावी? सोप्या भाषेत जाणून घ्या RBI चे नियम!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)