एक्स्प्लोर

Cash Deposit By UPI : आता बँकेत जाण्याची कटकट मिटणार! UPI च्या मदतीने पैसे खात्यात जमा करता येणार; जाणून घ्या संपूर्ण माहिती

आता प्रत्यक्ष बँकेत न जाताही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करता येणार आहेत. त्यासाठी लवकरच नवी प्रणाली चालू करता येणार आहे.

मुंबई : तंत्रज्ञानामुळे बँकिंगचे व्यवहार फार सुलभ झाले आहेत. बँकेत पैसे टाकायचे असतील किंवा काढायचे असतील तर कित्येक तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागायचे. आता मात्र आपल्या हातातील मोबाईलच्या माध्यामातून आपण बरेच व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. बँकेत जाण्याची आता बऱ्याचदा गरज भासत नाही. यूपीआयच्या सुविधेमुळे तर पैशांचे व्यवहार फारच सोपे झाले आहेत. दरम्यान, याच यूपीआयच्या (UPI) मदतीने आता बँकेत न जाता तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे टाकता येणार आहेत. 

आता डेबीट कार्ड नसले तरी सीडीएममध्ये पैसे जमा करता येणार

बँकेत किंवा एटीएमच्या बाजूलाच आता सीडीएम (कॅश डिपॉझिट मशीन) उपलब्ध आहेत. या सीडीएमद्वारे आपण प्रत्यक्ष बँकेत न जाताही आपल्या खात्यात पैसे टाकू शकतो. त्यासाठी आपल्याकडे डेबिट कार्ड असणे गरजेचे असते. आता मात्र सोबत डेबिट कार्ड (Debit Card) नसले तरीही सीडीएमच्या माध्यमातून बँक खात्यात पैसे जमा (Cash Deposit In Bank) करता येणार आहेत. 

डेबिट कार्ड नसतानाही एटीएममधून पैसे काढता येतात

देशात ठिकठिकणी एटीएम मशीन्स आल्यानंतर अगोदर डेबिट कार्डच्या माध्यमातूनच या मशीन्समधून रोख रक्कम काढता यायची. आता मात्र आपल्याकडे डेबिट कार्ड नसले तरी यूपीआय प्रणालीच्या माध्यमातून आपण एटीएममधून पैसे काढू शकतो. त्यासाठी आपल्याकडे फक्त आपला मोबाईल असणे गरजेचे आहे. अशीच काहीशी पद्धत आता आपल्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्यासाठी लागू केली जाणार आहे. यूपीआय प्रणालीद्वारे आता डेबीट कार्ड नसले तरीही तुम्हाला बँक खात्यात पैसे जमा करता येणार आहेत. 

पैसे कसे जमा करता येणार? 

यूपीआयद्वारे सीडीएममध्ये पैसे कसे जमा करायचे? याची निश्चित पद्धत समोर आलेली नाही. खरं म्हणेज ही सुविधा सध्या चालू नाहीये. पण आगामी काळात लवकरच ही सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यानंतर सीडीएम मशीन्सवर यूपीआयचा ऑप्शन दिला जाणार आहे. आरबीआयने ही पद्धत लागू करण्यासाठी काम चालू केलेले असून लवकरच ते प्रत्यक्ष कार्यान्वित केले जाईल. याच यूपीआयच्या मदतीने पैसे जमा करण्याची संभाव्य पद्धत जाणून घेऊ या...

  • आपला मोबाईल फोन घेऊन कॅश डिपॉझिट मशीनजवळ जा
  • या मशीनच्या स्क्रीनवर असलेल्या यूपीआय कॅश डिपॉझिट ऑप्शनवर क्लीक करावे. 
  • ज्या बँक खात्यात पैसे जमा करायचे आहेत, तो खाते क्रमांक टाकावा
  • बँक खाते क्रमांक टाकल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला एक क्यूआर कोड दिसेल. 
  • त्यानंतर तुमच्याजवळ असलेले यूपीआय अॅप उघडा आणि क्यूआर कोड स्कॅन करा.
  • सीडीएम मशीनमध्ये पैसे टाका आणि पैसे जमा करण्याची अनुमती द्या.
  • त्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. तसा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. 

दरम्यान, आरबीआयने यूपीआयद्वारे बँकेत पैसे कसे जमा करावे, याबाबतच्या स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. अद्याप ही कार्यप्रणाली सुरू झालेली नाही. मात्र लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्लाUddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहनNitin Gadkari on Forest Officers : माझ्या तावडीत अधिकारी सापडल्यास धुलाई करेन- नितीन गडकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget