एक्स्प्लोर

Amul And Mother Dairy : अमूल-मदर डेअरीचं दूध स्वस्त होणार, नवे दर कधीपासून लागू होणार,दरकपातीचं नेमकं कारण काय?

Amul And Mother Dairy Milk Price : अमूल आणि मदर डेअरीकडून दूध विक्री दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी दरातील कपातीमुळं दूधाचे दर कमी केले जाणार आहेत.

मुंबई : केंद्र सरकारच्या जीएसटी कपातीच्या निर्णयानंतर जीएसटी परिषदेनं  पॅकेज्ड दूधावरील 5 टक्के जीएसटीची आकारणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. अमूल आणि मदर डेअरी सारख्या मोठ्या ब्रँडसचं दूध आता स्वस्त होईल. 22 सप्टेंबर पासून पॅकेज्ड दुधावरील जीएसटी 5 टक्क्यांवरुन शुन्यावर येईल.

केंद्र सरकारनं दूध आणि इतर दैनंदिन वस्तूंच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहव्यात यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. महागाई सातत्यानं वाढत असल्याचं चित्र आहे. अशावेळी सरकारनं पॅकेज्ड दुधावरील जीएसटी 5 टक्क्यांवरुन 0 टक्क्यांवर आणला आहे. 

सध्या अमलूच्या फूल क्रीम मिल्क (अमुल गोल्ड)ची एका लीटरची विक्री 69 रुपये तर टोंड दुधाची विक्री 57 रुपये लीटर अशी होते.  मदर डेअरीच्या फुल क्रीम दुधाची किंमत 69 रुपये तर टोंड मिल्क दुधाची किंमत 57  रुपये आहे.  म्हशीच्या दुधाची एका लीटरची किंमत 74-75 रुपये तर गायीच्या दुधाची एका लीटरची किंमत  58-59 रुपये आहे.  

पॅकेज्ड दूध विक्रीवरील जीएसटी कमी केल्यानंतर दुधाचे दर 3 ते 4 रुपयांनी कमी होतील. अमूल गोल्ड आणि मदर डेअरीचं फुल क्रीम दूध 65-66 रुपये लीटरनं तर टोंड मिल्क  54-55 रुपये दरानं मिळेल. 

अमूल आणि मदर डेअरीचे दूध विक्रीचे नवे दर : Amul and Mother Dairy Milk New Rates

अमूल गोल्ड (फुल क्रीम): एका लीटरची किंमत 69 रुपयांवरुन 65-66 रुपयांवर येईल.

अमूल फ्रेश (टोंड):एका लीटरची किंमत 57 रुपयांवरुन 54-55 रुपयांवर येईल.

अमूल टी स्पेशल:एका लीटरची किंमत 63 रुपयांवरुन 59-60 रुपयांवर येईल.

म्हैशीचं दूध:एका लीटरची किंमत 75 रुपयांवरुन 71-72 रुपये  

गायीचं दूध :एका लीटरची किंमत 58 रुपयांवरुन 55-57 रुपये

मदर डेअरी फुल क्रीम:एका लीटरची किंमत 69 रुपयांवरुन 65-66 रुपयांवर येईल.

मदर डेअरी टोन्ड मिल्कः एका लीटरची किंमत 57 किंमत 55-56 रुपयांवर येईल.

मदर डेअरी म्हैशीचं दूध:एका लीटरची किंमत  74 रुपयांवरुन 71 रुपयांवर येईल.

मदर डेअरी गायीचं दूध: एका लीटरची किंमत 59 रुपयांवरुन 56-57 रुपयांवर येईल. 

दरम्यान, केंद्र सरकारनं जीएसटीचे स्लॅब 4 वरुन 2 वर आणले आहेत. सध्या  5 आणि 18 टक्के हे दोन स्लॅब असतील. या निर्णयाची अंमलबजावणी 22 सप्टेंबरपासून होणार आहे. त्यानंतर दूध उत्पादनांवरील जीएसटी पूर्णपणे कमी होईल. यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना कमी दरात दूध मिळेल. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'

व्हिडीओ

KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी
राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला राज, मुंबई- नागपूरमध्ये महिला महापौर होणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Embed widget