एक्स्प्लोर

30 डिसेंबरला पहिल्या अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण, मात्र इतर ट्रेनच्या तुलनेत प्रवास महाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे देशातील पहिल्या अमृत भारत ट्रेनला (Amrit Bharat Train) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मात्र, या ट्रेनचा प्रवास इतर ट्रेनच्या तुलनेत महाग असणार आहे.

Amrit Bharat Train Fare: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे देशातील पहिल्या अमृत भारत ट्रेनला (Amrit Bharat Train) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 30 डिसेंबर 2023 रोजी हा कार्यक्रम होणार आहे. श्रीरामनगर अयोध्येपासून (ayodhya) ते बिहारच्या दरभंगा जिल्ह्यासाठी ही ट्रेन धावणार आहे. ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक किलोमीटर ते 50 किलोमीटरच्या प्रवासासाठी, किमान भाडे 35 रुपये आकारणार आहे. ज्यामध्ये आरक्षण शुल्क आणि इतर प्रकारचे शुल्क समाविष्ट नसल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली आहे. मात्र, इतर रेल्वेच्या तुलनेत या अमृत भारत ट्रेनचा प्रवास 17 टक्के महाग होणार आहे. 

रेल्वे बोर्डाने सर्व झोनला एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये अमृत भारत ट्रेनच्या भाडे संरचनेची माहिती दिली आहे. ज्यामध्ये अंतर स्लॅबसह भाडे टेबल जोडलेले आहे. ज्यामध्ये द्वितीय श्रेणी आणि स्लीपर-क्लासचे भाडे दिले आहे. 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवणाऱ्या पहिल्या अमृत भारत ट्रेनला फक्त द्वितीय श्रेणी आणि स्लीपर श्रेणीचे डबे आहेत. एसी कोचचे भाडे रेल्वे बोर्डाने अद्याप ठरवलेले नाही.

अमृत भारत ट्रेनचे भाडे 15 ते 17 टक्क्यांनी महाग

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमृत भारत ट्रेनच्या सेकंड आणि स्लीपर क्लासच्या भाड्याची तुलना इतर मेल किंवा एक्स्प्रेस ट्रेनच्या भाड्याशी केली तर अमृत भारत ट्रेनचे भाडे 15 ते 17 टक्क्यांनी महाग होईल. इतर गाड्यांमध्ये, 1 ते 50 किलोमीटरच्या प्रवासाचे भाडे आरक्षण शुल्क आणि इतर शुल्क वगळून 30 रुपये आहे. तर अमृत भारत ट्रेनचे भाडे 35 रुपये म्हणजेच 17 टक्के महाग आहे.

परिपत्रकात रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की, या गाड्यांमध्ये सवलतीचे तिकीट स्वीकारले जाणार नाही. विशेषाधिकार पास, PTO (प्रिव्हिलेज तिकीट ऑर्डर), रेल्वे कर्मचार्‍यांसाठी ड्युटी पासची पात्रता मेल/एक्स्प्रेसमधील पात्रतेच्या समतुल्य असेल. परिपत्रकानुसार, खासदारांना जारी केलेले पास, आमदार-एमएलसी यांना जारी केलेले रेल्वे प्रवास कूपन (TRC) आणि स्वातंत्र्य सैनिकांना दिलेले पास यांच्या आधारे तिकीट बुक करण्याची परवानगी दिली जाईल. कारण त्यांची परतफेड करण्याची तरतूद आहे. रेल्वे बोर्डाने CRIS ला अमृत भारत ट्रेन आणि त्यांच्या भाड्यांबाबत सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्यास सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Train Cancelled List: प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या; 26 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान अनेक ट्रेन रद्द

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025Sushma Andhare on Holi | देवाभाऊ, देवतारी त्याला कोण मारी, अंधारेंकडून फडणवीसांना अनोख्या शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget