एक्स्प्लोर

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असणार? महागाई भत्ता शून्यावर येणार

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.

8th Pay Commission नवी दिल्ली : केंद्र सरकारनं अखेर आठव्या वेतन आयोगातील सदस्यांची नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठव्या वेतन आयोगाचं कामकाज पूर्ण होईल. आयोगात एकूण तीन सदस्या आहेत. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सादर करण्यास 18 महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. या आयोगाच्या शिफारशी सरकारनं स्वीकारल्यांतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. हा आयोग सरकारी कर्मचाऱ्यांचं आणि पेन्शनधारकांचं वेतन आणि भत्ते यांचं समीक्षण करेल आणिशिफारशी केंद्राला करेल. आठव्या वेतन आयोगाचा लाभ 50 लाख कर्चमारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना होईल.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार?

केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित केल्या आहेत. त्यानुसार सध्याची पगाररचना, सेवा नियम, निवृत्तीनंतरचे लाभ या गोष्टींचा समावेश आहे. देशाची आर्थिक स्थिती, महागाईचा दर आणि आर्थिक विकास या गोष्टी लक्षात घेऊन आयोगाला शिफारशी कराव्या लागणार आहेत वेतन आयोगात सरकारवरील आर्थिक भार आणि कर्मचाऱ्यांचं नियमित उत्पन्न संतुलित ठेवण्यावर भर दिला जाईल. वेतन आयोग दर 10 वर्षांनी स्थापन केला जातो.महागाई आणि इतर घटकांनुरुप सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा उद्देश असतो.

सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आला होता. त्यानुसार आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल,अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकार जेव्हा वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारेल आणि त्या लागू करेल तेव्हा त्यांना फरकाची रक्कम दिली जाईल. आयोग 18 महिन्यांच्या कालावधीत विविध मंत्रालयं, विभाग, कर्मचारी संघटना यांच्याशी चर्चा करुन रिपोर्ट देईल.

आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार?

सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के होता. तर, आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.8 टक्के ते 3 टक्के राहू शकतो. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 18000 रुपये असेल आणि आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3 झाल्यास मूळ वेतन 54000 रुपयांवर पोहोचेल. वेतन आयोगाकडून मूळ वेतन निश्चित करताना त्यावेळी असणाऱ्या महागाईचा विचार केलेला असतो. त्यामुळं वेतन आयोग लागू होतो तेव्हा महागाई भत्ता शून्य असतो. वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर भत्ते यामध्ये बदल केले जातात.

आठव्या वेतन आयोगाचं ध्येय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढ आर्थिकदृष्ट्या शाश्वत असावी. सरकारच्या बजेटवर अधिक भार पडू नये आणि कर्मचाऱ्यांचं देखील नुकसान होऊ नये असा समतोल आयोगाला साधावा लागणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना त्याचा फायदा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget