Mumbai : सोमैय्या विद्याविहार विद्यापीठ भारतीय ज्ञान आणि सर्वांगीण शिक्षणाद्वारे उद्याच्या नेत्यांना घडवत आहे
Mumbai News : तंत्रज्ञानाने सर्जनशीलतेची व्याख्या बदलली आहे, जागतिकीकरणाने संस्कृतीला नवीन ओळख दिली आणि आधुनिक उद्योगांनी आता हे स्पष्टपणे मान्य केले आहे की, सर्जनशीलता, सहानुभूती, विश्लेषणात्मक विचारशक्ती आणि संस्कृतीशी असलेली नाळ ही तांत्रिक कौशल्यांएवढीच किंवा त्याहून अधिक महत्त्वपूर्ण आहे.

Mumbai News : अनेक दशकांपासून, भारतीय शिक्षणप्रणाली यशस्वी शैक्षणिक मार्गांच्या अत्यंत संकुचित मर्यादेभोवती केंद्रीत होती. अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र आणि वाणिज्य या क्षेत्रांवरच बहुतांश विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित होते, परिणामी भारताचा समृद्ध बौद्धिक आणि कलात्मक वारसा कायम दुर्लक्षित राहिला. शास्त्रीय संगीत, तत्त्वज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र, कलाइतिहास आणि सांस्कृतिक अभ्यास यांसारख्या विषयांना बऱ्याचदा गंभीर व्यावसायिक करिअर म्हणून न पाहता, केवळ वैयक्तिक आवड म्हणून बघितले गेले. जग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाने सर्जनशीलतेची व्याख्या बदलली आहे, जागतिकीकरणाने संस्कृतीला नवीन ओळख दिली आणि आधुनिक उद्योगांनी आता हे स्पष्टपणे मान्य केले आहे की, सर्जनशीलता, सहानुभूती, विश्लेषणात्मक विचारशक्ती आणि संस्कृतीशी असलेली नाळ ही तांत्रिक कौशल्यांएवढीच किंवा त्याहून अधिक महत्त्वपूर्ण आहे. हल्ली विद्यार्थी केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमच नव्हे, तर वैयक्तिक, सांस्कृतिक आणि नैतिक पाया या सर्वांशी सांगड घालणाऱ्या शिक्षणाच्या शोधात आहेत, संस्कृती आणि सर्वांगीण विकास आधारित शिक्षणाची पुन्हा नव्याने ओळख होत आहे.
सोमैय्या विद्याविहार विद्यापीठाने या बदलाची दखल घेऊन असा शैक्षणिक दृष्टिकोन विकसित केला, ज्यात भारताच्या बौद्धिक परंपरांना समकालीन शिक्षणाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. विद्यापीठाला हे पूर्णपणे ज्ञात आहे की, भारताच्या सांस्कृतिक वारशात सामावलेला दृष्टिकोन, कल्पकता हे केवळ भूतकाळापुरते मर्यादित नाहीत; उलट, झपाट्याने बदलणाऱ्या जगासाठी विद्यार्थ्यांना सज्ज करण्यास सक्षम असणारी ती आधारभूत तत्त्वे आहेत. धर्म अभ्यास, शास्त्रीय संगीत, कला, संस्कृती, इतिहास आणि प्रदर्शन कलांमधील अभ्यासक्रम हे मुख्य प्रवाहातील विषयांचे पर्याय नसून, ते समाजाशी अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठीचे शक्तिशाली माध्यम आहेत. हे कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये अर्थार्जन, नैतिक मूल्ये, तर्कशास्त्र, सौंदर्यविषयक संवेदनशीलता आणि संदर्भावर आधारित सखोल अभ्यास करण्याची क्षमता या गुणांना विकसित करतात. आधुनिक काळातील प्रगतीसाठी हे गुण अपरिहार्य बनले आहेत.
अशा अभ्यासक्रमांचे महत्त्व हे दीर्घकाळापासून रूढ असलेल्या गैरसमजांना उखडून काढण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सांस्कृतिक आणि कलात्मक विषयांना अनेकदा संकुचित किंवा मर्यादित व्याप्तीचे मानले गेले; परंतु सोमैय्या विद्याविहार विद्यापीठाने (SVU) सांस्कृतिक वारसा आणि समकालीन काळातील गरज यांना जोडणारे अभ्यासक्रम तयार करून या विचार सरणीला आव्हान दिले आहे. शास्त्रीय संगीताचा विद्यार्थी केवळ सादरीकरणाशी नव्हे, तर ध्वनी संशोधन, डिजिटल पद्धती, सौंदर्यशास्त्र आणि सर्जनशील उद्योजकतेच्या स्वरूपांशी देखील जोडला जातो. धर्म अभ्यासातील विद्यार्थी प्राचीन ग्रंथांचे वाचनच नाही तर नेतृत्व, प्रशासन, आणि जागतिक नीतिशास्त्राच्या प्रश्नांशी त्यांचा संबंध कसा आहे, हे शोधण्याचा एक प्रयत्न आहे. कला समीक्षा आणि संस्कृतीचे विद्यार्थी पारंपारिक कलाप्रकारांचा अभ्यास समकालीन माध्यमे, क्युरेटोरियल दृष्टिकोन आणि विश्लेषणासह करतात. प्रत्येक विषयात, अभ्यासक्रम अशा पद्धतीने रचला गेला आहे की, सांस्कृतिक ज्ञान जुनाट नाही, हे दाखवून दिले जाते; ते व्यावहारिक आणि आधुनिक जीवनाशी खोलवर रुजलेली आहे.
हा सर्वांगीण एकात्मिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना हे समजून घेण्यास साहाय्य करतो की त्यांची ओळख, प्रतिभा आणि महत्त्वाकांक्षा यांना वेगवेगळ्या भागांत विभागलेले असण्याची आवश्यकता नाही. येथे परंपरा ही बंधन न राहता नवसर्जनक्षमतेचा स्रोत बनते. तत्त्वज्ञानशास्त्रातील वर्गचर्चा आधुनिक नेतृत्वातील नैतिक समस्यांवर प्रकाश टाकते.शास्त्रीय कला सादरीकरण, अध्यापन, रचना आणि सांस्कृतिक संवादाचे व्यापक मार्ग उघडतात. कला आणि संस्कृतीचा अभ्यास विद्यार्थ्यांना वस्तुसंग्रहालये, सर्जनशील उद्योग, संशोधन क्षेत्रे, प्रकाशन संस्था आणि सांस्कृतिक संस्थांमधील महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होण्यासाठी तयार करतो. परिणामी, विविध विषयांच्या सीमा धुसर होत जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण, लवचिक आणि समाजाशी प्रामाणिकपणे जोडलेल्या करिअरची आखणी करता येते.
अशा सर्वांगीण शिक्षणाचा उदय जगात अधिकच प्रासंगिक बनला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कार्ये स्वयंचलित करू शकते; परंतु अर्थनिर्वचन, सर्जनशीलता, कथाकथन किंवा सांस्कृतिक बुद्धिमत्तेची प्रतिकृती तयार करू शकत नाही. या मानवी सामर्थ्यांचा उगम कला, मानवी शास्त्रे आणि तात्त्विक परंपरांमधून होतो. सोमैय्या विद्याविहार विद्यापीठाचे (SVU) कार्यक्रम विद्यार्थ्यांना सखोल विचार करण्यास, स्पष्टपणे मत मांडण्यास, जबाबदारीने प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करून या क्षमता जोपासतात. सांस्कृतिक अंतर्दृष्टी आणि समकालीन उपयोजन (अॅप्लिकेशन) यांना जोडून, विद्यापीठ असे पदवीधर तयार करते जे विश्लेषणात्मक आणि मानवी संवेदनशीलता या दोन्हींची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांमध्ये योगदान देऊ शकतात. यामध्ये वारसा व्यवस्थापन, मीडिया, धोरण क्षेत्रे, सर्जनशील उद्योग आणि संशोधन क्षेत्रे यांचा समावेश आहे.
एकंदरीत, सोमैय्या विद्याविहार विद्यापीठ (SVU) हे गहनता, संस्कृती आणि उद्देश एकत्र आल्यावर शिक्षण कायस्वरूप धारण करू शकते, याचा पुनर्शोध दर्शवते. हे विद्यापीठ भारताच्या बौद्धिक परंपरांचा गौरव करते आणि त्याच वेळी, विद्यार्थ्यांना अशा जगासाठी तयार करते जे स्पष्टपणा, जागरूकता आणि जुळवून घेण्याची क्षमता यांची सांगड घालते. करिअरचे स्वरूप बदलत असताना आणि समाज अर्थपूर्ण शिक्षणाच्या शोधात असताना, SVU एक अशी शैक्षणिक प्रतिमा प्रदान करते जे वारसा आणि समकालीन यांचे मिश्रण आहे. हे अशा व्यक्तींचे संगोपन करते जे त्यांच्या समाजातील ओळख दृढपणे रुजलेले आहेत. येथे, परंपरा ही मागे जाण्याचे पाऊल नसून; ती कल्पकतेने प्रगती करण्याचे साधन बनते. ज्ञान ही परिवर्तनकारी शक्ती बनते, आणि शिक्षण हा सांस्कृतिक खोलीने आणि भविष्याच्या तयारीने आकारलेला आजीवन प्रवास बनतो.
















