एक्स्प्लोर

राजकारणातील 'गंगा' लुप्त!

संघर्ष, जिद्द, मेहनत, अभ्यासूपणा, प्रामाणिकपणाच व्यक्तीला समर्थकांबरोबरच विरोधकांकडूनही मानसन्मान मिळून देते. सुषमाजींमधल्या याच गुणांमुळे विरोधकही त्यांचं नाव आदराने घेतात.

भारतीय महिला कशी असावी? तिचं बोलणं, वागणं, तिचा पेहराव, तिची निर्णय घेण्याची क्षमता कशी असावी? याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज. नेहमी साडीतच वावरणाऱ्या, भांगेत, कपाळावर मोठं कुंकू..त्यांच्याकडे पाहिल्यावरच प्रसन्न वाटायचं. 21व्या शतकातल्या महिलांचा पेहराव पाहिला की एक महिला राजकीय व्यक्ती म्हणून सुषमा स्वराज नेहमीच वेगळ्या आणि प्रभावशील वाटायच्या. त्यांचा प्रभाव हा फक्त त्यांच्या कपड्यातूनच नाही तर त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वातूनही पडायचा. सुषमा स्वराज संसदेत बोलायला उभ्या राहिल्या की त्यांचं मुद्देसूद बोलणं, बोलण्यातला करारीपणा भल्याभल्यांना गार करायचा. भाजपमधल्या अटलबिहारी वाजपेयींनंतरच्या प्रभावी वक्त्या म्हणून सुषमा स्वराज यांच्याकडे पाहिलं जायचं. संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला दिलेलं रोखठोक प्रत्युत्तर असो की देशाची कन्या 'गीताला'  पाकिस्तानातून परत आणणं असो.. एका स्त्रीचा कडकपणा आणि तिच्यातलं ममत्व याचं दर्शन घडलं ते सुषमा स्वराज यांच्यात.. संघर्षातून केलेली वाटचाल, घरदार, सामाजिक भूमिका, देशाच्या मंत्री म्हणून जबाबदाऱ्या सांभाळणं हे किती आव्हानात्मक असू शकतं हे एक महिला म्हणून मी कल्पना करु शकते. राजकारणातली महिला म्हटलं की तिच्याकडे पाहण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही. मात्र स्वच्छ प्रतिमेच्या सुषमा स्वराज यांनी पुरुषप्रधान संस्कृतीत आपलं वेगळेपण ठसवलं, दाखवून दिलं. परदेश दौरे करताना आपल्या वेशभूषेत बदल न करता समोरच्याचाही आदर ठेवत कसं वागावं बोलावं हे खरंच सुषमाजींनी शिकवलंय. भाजपच्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असो वा केंद्रातल्या विविध पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी अगदी सक्षमपणे सांभाळल्या. प्रेमाने बोलणं, प्रेमाने समजून घेणं हा त्यांचा स्वभावच प्रत्येकाला आपलंसं करायचा. कदाचित त्यामुळेच ट्विटरवर, सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात नव्हे त्यांच्या समर्थनार्थच प्रतिक्रिया जास्त दिसायच्या. त्या सक्रीय राजकारणात नसल्या तरी त्यांची सामाजिक मुद्द्यांवरची सक्रीयता सतत दिसून आलीय. संघर्ष, जिद्द, मेहनत, अभ्यासूपणा, प्रामाणिकपणाच व्यक्तीला समर्थकांबरोबरच विरोधकांकडूनही मानसन्मान मिळून देते. सुषमाजींमधल्या याच गुणांमुळे विरोधकही त्यांचं नाव आदराने घेतात. गंगेला आपण पावन, निर्मळ मानतो. सुषमा स्वराज या राजकारणातल्या 'गंगा' मला वाटतात. एक कर्तृत्ववान भारतीय महिला राजकारणी ही कशी असते.. हे सुषमा स्वराज यांनी जगाला दाखवून दिलं. भारतीय महिला शक्तीचं प्रेरणादायी उदाहरण असलेल्या सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 :  मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Embed widget