एक्स्प्लोर
सिनेमेनिया : द पोस्ट’ - हिंमतीची कहाणी
राजकारण आणि पत्रकारिता यांचा खूप जवळचा संबंध आहे. दशक कोणतेही असो, कालखंड कुठलाही असो, पत्रकारिता करताना कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडला सत्य जगासमोर आणलं पाहिजे. याच विषयावर द पोस्ट चित्रपटाची निर्मिती झाली आणि 1971 ची ही घटना चित्रपटासाठी कथानक परिपूर्ण ठरलं.

सत्तरचं दशक...देशातल्या सर्वात महत्वाच्या वर्तमानपत्रांपैकी एक...
त्याच वर्तमानपत्राची मालक... वर्तमानपत्राचा संपादक...
आणि त्यांचं सरकारविरोधातलं सर्वात मोठं धाडस...
गोष्ट आहे स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्या द पोस्ट सिनेमाची, अर्थात वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राच्या मालकीनीनं दाखवलेल्या धाडसाची. टॉम हँक्स, मेरील स्ट्रीप दोघांनी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचं कथानक सत्य घटनेवर आधारीत असलं, तरी 2018 मध्ये पूर्णपणे 1971 सालचा फील द पोस्ट पाहताना येतो.
सत्तरच्या दशकात अमेरिकेत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘न्यूयॉर्क टाईस्म’ ही दोन बडी वर्तमानपत्रे होती. त्यांची सतत एकमेकांशी स्पर्धा असायची. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला एक महत्वाची बातमी मिळाल्याचं ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या पत्रकारांना कळते. मात्र बातमी कोणती ते कळत नसते. बातमी न मिळाल्यामुळे वॉशिंग्टन पोस्टला मात्र तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या मुलीच्या लग्नाची बातमी घ्यावी लागते.
‘न्यूयॉर्क टाईम्स’ वर्तमानपत्रात त्याचदिवशी ‘पेंटागॉन पेपर्स’ मधील अनेक खळबळजनक गोष्टी छापल्या जातात. त्या गोष्टी वाचून अमेरिकन नागरिकांमध्य़े मोठा संताप उसळतो. तितकाच संताप वॉशिंग्टन पोस्टचा संपादक ब्रेडली अर्थात टॉम हँक्स करतो.
त्या खळबळजनक बातमीमध्ये 1945 ते 1967 दरम्यान झालेल्या अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यातील युद्धाची गोपनीय माहिती होती. व्हिएतनाम युद्धात अमेरिकेचे अनेक तरुण जवान ठार झाले होते. त्यामुळे अमेरिकेत हा विषय फार संवेदनशील होता. पेंटागॉन सारख्या गुप्तहेर विभागाची कागदपत्रं उघड झाली आणि हे युद्ध म्हणजे फक्त सत्ताधाऱ्यांनी जनतेला फसवल्याचं अथवा जनतेशी खेळल्याची जन भावना उसळली.
एकीकडे न्यूयॉर्क टाईम्समध्ये ही कागदपत्रे छापली जाऊ लागली, तर दुसरकीडे देशातील वातावरण तापू लागले. शेवटी सरकारनं कारवाईकर न्यूयॉर्क टाईम्स वर्तमानपत्रावपर बंदी आणली. या बातम्यांमुळे न्यूयॉर्क टाईम्स वर्तमानपत्राचा खप मात्र कमालीचा वाढला होता. त्यामुळे वॉशिंग्टन पोस्टचे संपादक ब्रेडली (टॉम हँक्स) चांगलेच अस्वस्थ होते.
हँक्स आणि त्यांच्या टीमने ती खळबळजनक कागदपत्र शोधून काढली. पण न्यूयॉर्क टाईम्सला बंदी घातल्यानंतर कागदपत्रातील माहिती छापायची का? हा प्रश्न निर्माण झाला होता. न्यूयॉर्क टाईम्सवर देशद्रोहाचा आरोप करून ते वर्तमानपत्र छापण्यास बंदी आणली होती. आणि वॉशिग्टन पोस्ट वर्तमानपत्राच्या कायदेतज्ज्ञांनी बातमी छापू नये अशी मतंही दिली.
पण ही कागदपत्रे नाही छापली तर लोकांचा पत्रकारितेवरचा किंबहुना सगळ्या लोकशाहीवरचा विश्वास उडेल आणि त्यातबरोबर वॉशिंग्टन पोस्ट वर्तमानपत्राच खपही वाढेल यावर संपादक ब्रॅडले ठाम होता. एक वेळ अशी येते की हँक्स आणि त्याची टीम राजीनामा देण्याची धमकी मेरील स्ट्रीप यांना देतात. याबाबतचा सर्वस्वी निर्णय मालकीन कॅथरीन गॅरहम म्हणजेच मेरील स्ट्रीप यांच्या कोर्टात येतो. कॅथरीन गॅरहम यांनी त्यांच्या पतींच्या निधनानंतर वर्तमानपत्राचा नुकताच पदभार स्वीकारला होता. शेवटी कॅथरीन यांनी धाडस दाखवले आणि ही कागदपत्रे ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रसिद्ध होऊ लागली. चित्रपटात हा सगळा सिक्वेन्स पाहताना आपल्याला स्पिलबर्ग टच नक्कीच अनुभवायला मिळेल.
न्यूयॉर्क टाईम्सनंतर वॉशिंग्टन पोस्ट वर्तमानपत्रानं ही माहिती छापल्यानंतर अमेरिकन सरकारने या वर्तमानपत्रावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण न्यायालयात जाते. ‘वॉशिंग्टन पोस्ट’वर बंदी येऊ शकत होती. त्याचवेळी नेमका न्यायालयाचा निर्णय आला आणि ही कागदपत्रे छापणे देशद्रोह नाही, असा निर्णय कोर्टाने दिला. त्यानंतर मात्र देशभरात आणि जगभरात वॉशिग्टन पोस्ट वर्तमानपत्राची प्रतिमा एका उंचीवर जाऊन पोहोचली.
राजकारण आणि पत्रकारिता यांचा खूप जवळचा संबंध आहे. दशक कोणतेही असो, कालखंड कुठलाही असो, पत्रकारिता करताना कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडला सत्य जगासमोर आणलं पाहिजे. याच विषयावर द पोस्ट चित्रपटाची निर्मिती झाली आणि 1971 ची ही घटना चित्रपटासाठी कथानक परिपूर्ण ठरलं. चित्रपटाचं थ्रिल कुठंही कमी पडलेले नाहीय, त्यामुळे कोणत्याही देशात आणि कोणत्याही भाषेच्या प्रेक्षकाला चित्रपट बांधून ठेवणार हे नक्की.

View More