एक्स्प्लोर

दिंडी गूगल भाषांतराची…

वाढत्या स्पर्धेच्या काळात आपल्या मायमराठी भाषेच्या समृद्धीचा वेग वाढवा, याच अनुषंगाने मराठीभाषेची व तिच्या समृद्धीस असलेल्या अनेक सेवांची अधिकाधिक जनजागृती व्हावी, हा ‘गूगल भाषांतर दिंडी’मागचा उद्देश.

आंतरजालावर मराठी भाषेचे अस्तित्व असणे आणि ती दिवसेंदिवस समृद्ध होत जाणे, यामागे आपल्यापैकीच अनेकांनी दिलेल्या योगदानाची पार्श्वभूमी आहे. कारण ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’. या विचारांनी वाढत्या स्पर्धेच्या काळात आपल्या मायमराठी भाषेच्या समृद्धीचा वेग वाढवा, याच अनुषंगाने मराठीभाषेची व तिच्या समृद्धीस असलेल्या अनेक सेवांची अधिकाधिक जनजागृती व्हावी, हा ‘गूगल भाषांतर दिंडी’मागचा उद्देश. येत्या 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2018 पर्यंत म्हणजे नव्या वर्षातील तब्बल दोन आठवडे म्हणजेच पहिला पंधरवडा ‘मराठी भाषा पंधरवडा’ म्हणून साजरा केला जातो. शासकीय ते शाळास्तरांपर्यंत या पंधरवड्यात अनेक उपक्रम आपापल्या परीने राबविले जातात, जसं की ग्रंथदिंडी, व्याख्यान, निबंधमाला, शुद्धलेखन स्पर्धा, प्रदर्शन, वादविवाद स्पर्धा आयोजन आणखी बरंच काही... तर सांगायचा मुद्दा हा की, ट्विटरवर मराठी भाषेसाठी काम करणारे @MarathiWord म्हणजेच आजचा शब्द आणि मराठी रिट्विट @MarathiRT हे आपले जे मित्र आहेत. ते यंदाचा 'मराठी भाषा पंधरवडा'निमित्त एक उपक्रम राबवू पाहत आहेत. हा उपक्रम सोशल मीडियावर आवडीने मराठी लिहिणाऱ्या व वाचणाऱ्या आपल्या मराठीप्रेमी मित्रांसाठी आहे. ज्यात आपल्या सर्वांना आणि जास्तीत जास्त लोकांना समाविष्ट होऊन भाषांतराचे योगदान द्यायचे आहे. दिंडी गूगल भाषांतराची… यात गूगलतर्फे भाषांतराची जी सेवा जगभरातल्या भाषा समृद्ध करण्यासाठी वापरली जाते, त्यात मराठी भाषेत भाषांतर करण्याची सोय उपलब्ध आहे. आज इंटरनेटवर मराठी भाषेत योगदान देणारे अनेक समूह आहेत, जे आपापल्यापरीने नेहमीच योगदान देत असतात, परंतु मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने आपल्यालाही येते 15 दिवस योगदान देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला जात आहे. 15 दिवसांनंतर प्रत्येकाने पुढे आपापल्या परीने सुरु ठेवायचा प्रयत्न तर करुयातच. तूर्तास उपक्रमाच्या निमित्ताने यात माझ्यासाहित तुम्ही कसं सहभागी व्हायचं हे तुम्हाला सांगण्याचा या व्हिडीओच्या निमित्ताने एक छोटासा प्रयत्न... या उपक्रमात तुम्हाला मोबाईल संगणक जिथून शक्य असेल तिथून सहभागी होऊ शकता. जर मोबाईलवर असाल तर तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमधून प्ले स्टोअर आणि आयफोन असेल तर अॅपस्टोअरमध्ये जायचंय आणि गूगलचं क्राऊडसोर्स हे अॅप शोधायचं आहे आणि स्थापित(install) करायचं आहे. क्राऊडसोर्स अनुप्रयोग - https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.village.boond अॅप इन्स्टॉल झाल्यावर गूगल खात्याने लॉग इन आपोआप होईलच, नाही झाल्यास तुम्हाला तुमच्या गूगल खात्याने  लॉग इन करायचं आहे, आणि पुढे इंग्रजी हा डिफॉल्ट पर्याय असेल त्या सोबत मराठी भाषेची निवड करायची आहे. अॅप सेट केल्यावर अनेक पर्यायांपैकी ट्रान्सलेशन/भाषांतर आणि ट्रान्सलेशन व्हॅलीडेशन पर्याय आपल्याला महत्वाचे आहेत. यापैकी ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला एक इंग्रजी वाक्य मिळेल, त्या इंग्रजी वाक्याला तुम्हाला समजलेल्या आणि सुचत असलेल्या अचूक मराठी भाषेत टाईप करुन आणि तपासून ते सबमिट करायचं आहे. एक भाषांतर सबमिट केल्यावर तुम्हाला पुढचं वाक्य दिलं जातं. असे करत अनेक वाक्य व शब्द आपण भाषांतरित करत जातो. दिंडी गूगल भाषांतराची… दुसऱ्या पर्यायात म्हणजे ‘ट्रान्सलेशन व्हॅलीडेशन’मध्ये तुम्हाला एका इंग्रजी वाक्याचे 2 किंवा 4 पर्यायी आपल्यापैकीच याआधी अनेकांनी करुन ठेवलेल्या भाषांतराचेच मराठी वाक्य दिली जातात आणि त्याच्यापुढे आपल्याला चूक/बरोबर किंवा होय/नाही असे पर्याय दिले जातात.. जर तुम्हाला ते भाषांतर योग्य वाटत असेल तर तुम्ही होय निवडू शकता आणि जर भाषांतर चूकीचे वाटत असेल तर तुम्ही ते नाही असं निवडून पुढे जाण्याचा पर्याय (Submit) दाबू शकता. असं करत, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलेशन व्हॅलीडेशन या दोन्ही पर्यायांमध्ये आपल्याला येणारे पुढचे 15 दिवस किमान 150 शब्द/वाक्यांचं योगदान देण्याचा प्रयत्न करायचा आहे. येत्या 15 दिवसात आपल्याला एकत्र मिळून किमान एक लाख शब्द/वाक्यांचं योगदान द्यायचे आहेत. त्यापेक्षा जास्त जर आपण करु शकलो तर अतिशय उत्तम होईलच, नाहीच तर किमान एक लाखाचा पल्ला गाठायचा आहेच. भाषांतर उपक्रम करण्याचा फायदा असा की गूगलतर्फे यात प्रत्येक भाषांतराला एक गुण दिला जातो, यात ठराविक गुणांना लेव्हल वाढत जाते. आणि जितके जास्त गुण असतील तितक्या लवकर आपल्या भाषांतराचे व्हॅलीडेशन गूगलतर्फे करुन वापरात आणले जाते. हा मायमराठी साठी काहीतरी करूयात या दृष्टिकोनातून @MarathiWord आणि @MarathiRT सोबत आपणही सारे या अभिनव उपक्रमाचा भाग होऊयात आणि इंटरनेट/आंतरजालावर आपल्या योगदानाद्वारे दिवसेंदिवस अचूक होत जाणाऱ्या मायमराठीचा झेंडा आपण सगळेच मिळून ‘अटकेपार’ नेऊयात.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Embed widget