एक्स्प्लोर

ती सध्या बलात्कार झेलतेय...!

'ती सध्या काय करतेय' नावाचा चित्रपट सध्या फारच गाजतोय. खरं तर चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीपासून 'ती सध्या काय करतेय'चा ट्रेंड सोशल मीडियामध्ये फारच धुमाकूळ घालत आहे. ट्रेलर आल्यापासून तिच्या सध्याच्या कामाचे विविध गमतीशीर मेसेज व्हायरल झाले आहेत. #ती_सध्या_काय_करते असा हॅशटॅग प्रचंड गाजतोय. तिच्याबरोबरच तो सध्या काय करतोय? याचीही चिंता तमाम नेटकरी अभिजनांना लागून राहिली आहे. आपल्या सामान्य जिंदगीपासून ते राजकारण, प्रेम, मैत्री तसेच समाजात होणाऱ्या उलथापालथीचे प्रतिबिंब या मेसेजेसमध्ये दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे 'ती'चा भोग तसेच तिला होणारा त्रास आणि तिच्या 21 व्या शतकातही सुरक्षेचा उभा असलेला सवाल देखील या निमित्ताने फार मोठ्या प्रमाणावर समोर येताना दिसत आहे. ती सध्या काय करतेय? वर फेसबुकच्या दुनियेत मोठ्या प्रमाणात गाजत असलेली सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्यजनाची जाण असलेले अॅड. महेश भोसले यांनी लिहिलेल्या काही ओळी तिच्या अवस्थेवर अचूक भाष्य करतात असं वाटतं. त्यातल्या काही ओळी इथं देतोय. ते म्हणतात,

''ती सध्या काय करते...?

ती गर्भात असतानाच तपासली जाते,

एखादीच ती अनेक यातनातुन जन्म घेते,

मग ती जीवंतपणी बनते गुलाम पुरुष नावाच्या प्राण्याची,

पण ती थांबली नाहीये ती लढलीय आणि लढतेय देखील,

विनाकारण होणाऱ्या स्पर्शासोबत, ती लढतेय छाताडावर टपलेल्या वासनांध नजरेसोबत,

हल्ली ती फक्त गर्भातच नाही मारली जात

तर ती रोज मारली जातेय परंपरेने,

तीच्यावर कुठला एक नराधम नाही करत बलात्कार,

त्या नराधमाने केलेल्या बलात्काराची पायरी करुन

चढतात तीच्यावर हजारो राजकीय इमले.''

  महेश दादांच्या या ओळी 'ती'च्या वास्तविकतेवर नेमकं बोट ठेवतात. महिला सबलीकरण, स्त्री-मुक्तीच्या बाता करणाऱ्या या जगात अजूनही दोन आणि पाच महिन्याच्या निरागस चिमुरडीवर बलात्कार केला जातो, ही सकल समाजासाठीच अत्यंत शरमेची गोष्ट आहे. खरतर आपल्या समाजात कुठलीही बलात्काराची घटना घडल्यानंतर त्याला धर्म, जाती, समुदायनिहाय पाहण्याची घाणेरडी मानसिकता प्रचंड प्रमाणात फोफावली आहे. नजीकच्या काळातलं चित्र बघितलं तर दिल्लीत बसमध्ये निर्भयासोबत झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर अख्खा भारत देश रस्त्यावर उतरला. त्यावेळी लोकांच्या मनातील आग पाहून असं वाटत होतं की, आता देशात बलात्कार होणारच नाहीत. मात्र बलात्कारी तर तिच्या निषेधाच्या मोर्चात देखील असावेत असंच वाटायला लागलंय. कारण मुलींच्या छेडछाडीच्या घटना आणि बलात्काराचे प्रमाण थांबण्याचे नावच घेत नाहीये. सगळीकडेच वासनांध नजरा आणि पाशवी किडे आपले लक्ष्य शोधत आणि ते लक्ष्य इमाने-इतबारे पूर्ण करताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रातच बोलायचं झालं तर कोपर्डीची आग कमी होत नाही तोवर नाशिक, सांगली, नागपूर, सोलापूरच्या घटना समोर आल्या. अगदी विकृत पद्धतीने बलात्कार केला जातो आणि सहजच तिला मारून देखील टाकले जाते. मग मीडियात बातमी येते, सोशल मिडीयावर भडास निघते. या प्रत्येक स्तरावर एक वेगळा बलात्कार तिच्यासोबत होत राहतो. अनेकदा तिच्या बलात्काराचे राजकारण देखील होते. अर्थातच यासाठी प्रशासनव्यवस्था किंवा सुरक्षा व्यवस्था काय करत आहे?, हा प्रश्न उभा राहतोच. मात्र बलात्कार प्रकरणात ओळखीच्या नराधमाकडूनच जास्त प्रमाणात अशा प्रकाराला अंजाम दिला जात असल्याने घटना रोखण्यात ही व्यवस्था काही करू शकत नाही. मग यावर उपाय काय होऊ शकतो? या गंभीर प्रश्नावर कुटुंबामध्ये चर्चा होणे अपेक्षित आहे. अवघ्या पाच महिने किंवा पाचवी, सहावीच्या वर्गापर्यंतच्या चिमुरड्या ज्यांना स्पर्शदेखील समजत नाही. अगदी निरागस विश्वात जगणाऱ्या चिमुरड्यासुद्धा काही घटनांमध्ये बळी पडत आहेत, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. बलात्कारासारखी घटना घडल्यावर सुद्धा मुलगी कोणत्या जातीची आहे? हे सर्च करणारा दुसरा बलात्कारी वर्ग सुद्धा इथे उपलब्ध आहे. अशांना खरं तर माणूस म्हणवून घेण्याचा काहीही अधिकार नाही. या सगळ्या गोष्टींना भोगणारा स्त्री हा आजच्या घडीला सर्वात उपेक्षित घटक आहे. स्त्री-सबलीकरणाच्या नावावर सरकार किंवा सामाजिक कार्यकर्ते भलेही बड्या-बड्या बाता मारत असतील मात्र याच्याने बुडाखालचा अंधार कायम आहे. यासाठी आता स्त्रीने स्वतः किमान स्वतःपुरते सक्षम होणे आवश्यक आहे. 'सुलतान', 'दंगल' यांसारखे किंवा स्त्री-पात्र हिरो म्हणून बनवले गेलेले सिनेमे पाहून तेवढ्यापुरतेच प्रभावित होणारे अनेक आहेत. पोरींनी असं बनावं असे म्हणणारे पालक असतील किंवा स्वतः ती पोरगी असेल तिने खरंच आज या भयंकर विक्षिप्त असलेल्या जगात आपलं स्थान मजबूत करणे आवश्यक आहे. परंपरा आणि सामाजिक व्यवस्थेचं लोढणे आपल्या गळ्यात बांधून घेऊन देखील पुरुषी मानसिकतेच्या दलदलीत पहिल्यापासूनच स्वकर्तृत्वाचे कमळ तिने फुलविले आहे. निश्चितच स्त्री आज कुठेच कमजोर नाही, हे स्पष्ट आहे आणि हे माहिती असतानाही केवळ ज्ञान देऊन किंवा नुसते दिखाऊ सबलीकरणाचे कार्यक्रम राबवून काही अर्थ नाही. वासनांध पुरुषी नजरा रोखणे कठीण आहे, म्हणूनच प्रत्यक्ष वैयक्तिकरीत्या महिलेने मजबूत होणे हाच सशक्त परिणाम आहे. अन्यथा 'ती'चा शारीरिक आणि सामाजिक बलात्कार होतच राहील. आपल्याच लुटलेल्या अब्रूचं राजकारण तिला बघत बसावे लागेल आणि'तो' पूर्वापारपद्धतीने जमेल तसं बलात्कार करत राहील. बयो, दे हे ओझं झटकून आणि व्यवस्थेवरच उलट बलात्कार करण्याची क्षमता ठेव तुझ्यात, म्हणजे 'ती सध्या काय करतेय?' हा सवाल तुला विचारला जाणार नाही.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget