एक्स्प्लोर

BLOG : डॉक्टर माणूस...!

घरी पाहुणे आल्यावर लहान मुलांना एक प्रश्न हमखास विचारला जातो, "बाळा, तुला मोठ्ठं झाल्यावर काय व्हायचंय?" आणि त्या वेळी "मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचंय," असं उत्तर शंभरातल्या ऐंशी टक्के मुलांना देताना मी पाहिलंय. पण, मला मात्र डॉक्टर व्हावंसं कधी वाटलंच नाही. ना मी लहानपणी भातुकलीसारखं डॉक्टरसेटसोबत खेळलेलं मला आठवतयं. याला कारणं अनेक असतील मग त्यात इंजेक्शनबद्दल असलेली भीती, विज्ञान नावडता विषय बेडूक वगैरे प्राण्यांना फाडावं लागतं असं काय काय...

भारतामध्ये 1 जुलै हा दिवस 'राष्ट्रीय डॉक्टर दिवस' म्हणून साजरा केला जातो. प्रामुख्याने हा दिवस इंडियन मेडिकल असोसिएशनकडून साजरा केला जातो. आज समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात डॉक्टरांना सलाम करणाऱ्या पोस्ट, फोटो, व्हिडिओ, शुभेच्छापत्रं शेअर होत आहेत. 365 दिवस दिवसरात्र झटणाऱ्या या डॉक्टर माणसाला एक दिवस तर थँक्यू म्हटलंच पाहिजे. मागील दीड वर्ष कोरोना संकटाशी सामना करताना डॉक्टरांचे योगदान, त्यांची सेवाभावी वृत्ती प्रकर्षानं जाणवली.

कोरोना संकटाशी लढा देत असताना स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरच आघाडीवर होते. सध्याच्या काळात आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी, आपलं आरोग्य सुदृढ बनविण्यासाठी डॉक्टरच झटत आहेत. कोरोना जर या जगात नसताच, सगळं ठीक असतं तर आजच्या दिवसासारखे डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे लेख, फोटो, पोस्ट मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेच नसते. पण, कोरोनासारख्या सूक्ष्म विषाणूने हे सगळे बदल घडवून आणले. डॉक्टर या व्यवसायाचं महत्त्वं अचानक वाढलं. केवळ डॉक्टरच नाहीत तर वैद्यकीय पेशातले सर्वच आपला जीव धोक्यात घालून आजही कोरोनासोबत मुकाबला करीत आहेत. 

माझी एक खूप जवळची मैत्रीण वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिच्यासोबत राहताना, बोलताना डॉक्टर होताना काय काय गोष्टींचा सामना करावा लागतो हे कळत असतं. त्यांची कसरत ही हवं ते वैद्यकीय महाविद्यालय निवडण्यापासूनच सुरू होत असते. हवं असलेलं वैद्यकीय महाविद्यालय मिळालं तर ठीक नाहीतर इतर कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. घरच्यांपासून दूर असल्याने महाविद्यालय, हॉस्टेल आणि अभ्यास या त्रिसूत्रींत हे विद्यार्थी अडकतात. मानव शरीराचे प्रत्येक अंग, प्रत्येक आजाराची लक्षणे लक्षात ठेवणे, रुग्णावर योग्य उपचार करण्यासाठी किमान पाच वर्षे अध्ययन करणे, निपुणता प्राप्त होईपर्यंत किंबहुना त्यानंतरदेखील प्रशिक्षण घेणे. अशी त्यांची कसरत शेवटपर्यंत सुरूच राहते. 

नॉर्मल सर्दी, खोकला, तापापासून ते एखाद्या गंभीर आजारावरचा रामबाण उपाय म्हणजे डॉक्टर. आज डॉक्टरांना देवदूत म्हटलं जातंय. दरवर्षी राष्ट्रीय डॉक्टर दिवस येतो आणि या डॉक्टरांचं महत्त्व फक्त या एका दिवसापुरतंच राहतं. आणि परत वर्षानुवर्षे चालत आलेल्या घटना मग त्यात डॉक्टरांना मारहाण, शिवीगाळ, हल्ले, रुग्णालय, दवाखाने फोडणे सुरू राहतं...

माझ्या बाबांचे एक मित्र आहेत डॉ. अविनाश भागवत. जे महाराष्ट्र सरकारच्या पब्लिक हेल्थ विभागाचे मेडिकल ऑफिसर आहेत. आमचा चांगला घरोबा असल्याने त्यांना मी लहानपणापासूण बघत आली आहे. आज एवढ्या मोठ्या पदावर असूनही त्यांना मी कधी शांत, स्वस्थ बसून राहिलेलं आठवत नाही. त्यांच्या अंगी असलेली सेवाभावी वृत्ती नेहमी प्रेरित करीत राहते. आजही ते वेगवेगळ्या परीक्षा देत उत्तीर्ण होत आहेत. त्यांच्या अंगी असलेला विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची ऊर्मी ही नेहमी इतरांना प्रवृत्त करीत असते. 

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात आपण सर्वांनी थाळी, टाळी वाजवून या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले होते. डॉक्टरांकडे रुग्ण दाखल झाल्यानंतर तो रुग्ण बरा कसा होईल, हा एकच ध्यास हाती घेतलेल्या डॉक्टरांच्या कार्याला सलाम...

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
ABP Premium

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case :  115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget