एक्स्प्लोर
Advertisement
खान्देश खबरबात : कर्जमाफीसारखा पाऊसही लांबतोय !
महाराष्ट्रातील जवळपास 89 लाख शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांची सरकारी कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केला आहे. ही कर्जमाफी 40 टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करेल फडणवीसांचा दावा आहे. सरकारने ही कर्जमाफी जवळपास वर्षभरापासून ताणून धरली होती. जीएसटीच्या मंजुरीसाठी झालेल्या विशेष अधिवेशनानंतर शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर आले. अखेर शेतकरी प्रतिनिधींसोबतच्या 3 बैठकांसह थेट शिवसेना नेते उध्दव ठाकरे व जेष्ठ नेते शरद पवार यांच्या दारात जावून चर्चा केल्यानंतर बहुप्रतिक्षीत कर्जमाफी सरकारने शनिवारी जाहिर केली. दुसरीकडे लांबलेल्या कर्जमाफी प्रमाणेच पावसानेही ताण दिल्यामुळे खान्देशात पेरणीचे चक्र बेभरवशाचेच झाले आहे.
कर्जमाफीसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ जाहिर करुन सरसकट दीड लाख रुपयांचे कर्जमाफ केले. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाच्या 25 टक्के रक्कम (25 हजार रुपये कमाल मर्यादा) अनुदान म्हणून देण्याचे म्हटले आहे. जून पर्यंत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. कर्जमाफीचा हा दिलासा शेतकऱ्यांना असला तरी आता पाऊस लांबल्यास दुबार पेरण्यांचे संकट खान्देशावर आहे.
सरकार कर्जमाफी देईल आणि पाऊस येईल या दोन्ही गोष्टींकडे शेतकरी आशाळभूत नजरेने पाहत होता. आता पदरात अंशतः का होईना कर्जमाफी आली आहे पण पाऊस वेळेवर व पुरेसा आणण्याचे कोणतेही नियोजन सरकारकडे नाही. यावर्षी कृत्रिम पध्दतीने पाऊस पाडता येईल असेही नियोजन नाही. दोनवर्षांपूर्वी कृषिमंत्रीपदी एकनाथ खडसे असताना त्यांनी कृत्रिम पध्दतीच्या पावसाचे नियोजन केले होते.
खान्देशातील जळगाव जिल्ह्यात मागीलवर्षीही पाऊस बरा होता. मात्र, धुळे व नंदुरबार हे जिल्हे दुष्काळीच होते. तेथे आजही टॅकरने पाणी पुरवठा सुरू आहे. दोन्ही जिल्ह्यात आजही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. पेरण्यांच्या लायक एकही पाऊस झालेला नाही. यंदा जून 2017 च्या पहिल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. आतापर्यंत जवळपास 70 मिलीमीटर पाऊस झाला. पण, त्यानंतर पेरण्या जगू शकतील असा पाऊस नाही.
ज्या शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व किंवा अवकाळी पावसाच्या भरवशावर पेरणी केली त्यांची अवस्था आता दुबार पेरणी करण्यावर आली आहे. महागडे बियाणे आणि स्त्री-पुरूष मजुरांचा रोजंदारी खर्च यामुळे पुन्हा शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पावसाची पहिली हजेरी सुद्धा नाही. या वर्षीचे खरीप कर्ज अद्याप तरी शेतकऱ्यांच्या हाती पडलेले नाही. सरकारने सरसकट 10 हजार रुपये देण्याचे सांगितले होते. आता कर्जमाफीची पूर्ण योजनाच जाहिर झाल्यानंतर यातही काही बदलांची शक्यता असून रक्कम वाढेल असे शेतकऱ्यांना वाटत आहे.
कर्जमाफी लवकर मिळेल असे वातावरण शेतकरी संघटनांच्या आंदोलकांनी निर्माण केले होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही हवा भरली. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेने आशाळभूत होता. दुसरीकडे अलनिनो घटकांचा यावर्षी प्रभाव नसल्यामुळे पाऊस चांगला राहिल असा नेहमीचा चुकणारा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यापेक्षा जळगाव जिल्ह्यास लागून बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ घाट मांडणीचे निष्कर्ष विश्वासाचे वाटत असून पाऊस मध्यम राहिल असे तेथील घटनायकाने म्हटले आहे. जून महिन्याची 23/24 दिनांक उजाडूनही पेरणीलायक पाऊस झालेला नाही.
खान्देशात गेल्या काही वर्षांत खरीप पिकांचा पॅटर्न बदलला आहे. केळी, कपाशी आणि ऊसाच्या पलिकडे जावून शेतकरी आता सोयाबिन, मका व पारंपरिक ज्वारी, बाजरीकडे वळतो आहे. मात्र, या पिकांसाठी पावसाची आवश्यकता निश्चित वेळेवर असावी लागते. त्यामुळेच पाऊस जसा जसा ताण देईल त्या त्या प्रमाणात शेतकऱ्यांची चिंता वाढते आहे. खान्देशात अलिकडे सोयाबिन क्षेत्र वाढते आहे. जवळ लागून असलेल्या विदर्भाने सोयबिन खान्देशला दिले. गतवर्षी सोयाबिनचे क्षेत्र धुळे जिल्ह्यात 183 टक्के, नंदुरबार 279 टक्के, तर जळगाव जिल्ह्यात 180 टक्के नियोजनाच्या तुलनेत होते. मक्याचे क्षेत्र धुळे जिल्ह्यात 95 टक्के, नंदुरबार 134 टक्के आणि जळगाव जिल्ह्यात 131 टक्के नियोजनाच्या तुलनेत होते. सोयाबिन व मक्याच्या तुलनेत ज्वारी, बाजरीचे क्षेत्रही जास्त असले तरी ते कमी होते आहे. यावर्षी वाढलेले तूर उत्पादन आणि घसरलेला भाव यामुळे डाळींचे क्षेत्रही घटण्याची शक्यता आहे.
धुळे जिल्ह्यात शिरपूर, साक्री व शिंदखेडा तालुक्यात कुठेही पावसाना हजेरी लावलेही नाही. कापडणे परिसरात तर दुबार पेरणीही अडचणीत आल्याचे सांगण्यात येते. नंदुरबार जिल्ह्यातही धडगाव, शहादा, अक्क्लकुवा, तळोदा तालुक्यात पावसाची हजेरी नाही. पेरण्यांचा पत्ताच नाही.
जळगाव जिल्ह्यात जुनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. जवळपास 70 हजार हेक्टरवरील पीके धोक्यात आली आहेत. जळगाव, धरणगाव, एरंडोल, भुसावळ आणि यावल तालुक्यात गंभीर स्थिती आहे.
अशा चिंताग्रस्त वातावरणात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमा आली आहे. गतवर्षी पीक व फळ पीक विम्यापोटी 25 कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सुमारे 35 हजार शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अद्याप पीक विमा रक्कम वर्ग झालेली नाही. शेतकऱ्यांच्या पातळीवर एकूणच वातावरण चिंताजनक आहे.
‘खान्देश खबरबात’ सदरातील याआधीचे ब्लॉग :
खान्देश खबरबात : शिवसेना खान्देशात नक्कीच वाढू शकते...
खान्देश खबरबात : कागदोपत्री आपत्ती व्यवस्थापन उघडे !
खान्देश खबरबात : शेतकरी संपाने खान्देशला काय दिले ?
खान्देश खबरबात : आदिवासींचा विकास घोटाळ्यातच!
खान्देश खबरबात : हैदोस घालणारा “दादा” समर्थक!
खान्देश खबरबात : खान्देश होणार मेडिकल हब !
ब्लॉग : जळगाव जिल्हा परिषदेत ‘काँग्रेसयुक्त’ भाजप
आमदार निलंबन की मॅच फिक्सिंग !
खान्देश खबरबात : डॉक्टरांना सामाजिक व कायदेशीर संरक्षण हवेच !
यशवंतराव ते पर्रिकर व्हाया पवार !
खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी
खान्देशवासी मोकाट कुत्र्यांनी त्रस्त
खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर
खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !!
खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर
खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन
खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे
खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार
खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार
खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ
खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!
खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे
खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?
खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा
खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…
खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री
खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!
खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…
खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर
खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल
खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!
खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र
खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?
खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट
खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा
खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी
खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
क्राईम
Advertisement