एक्स्प्लोर
खान्देश खबरबात : जळगाव महापौरांची अकाली पोलिटीकल एक्झिट
आघाडीचे राजकारण आणि सत्तेचा टेकू या दोन गोष्टींमुळे जळगावच्या महापौरपदाचा नितीन लढ्ढा यांनी राजीनामा दिला. उर्वरित वर्ष-सव्वा वर्षाच्या काळासाठी विद्यमान उपमहापौर व मनसेचे नेते ललित कोल्हे यांची महापौरपदी वर्णी लागेल. खाविआचे नेते रमेश जैन यांनी ललित कोल्हे यांना महापौरपदाच्या उर्वरित कार्यकाळात वाटेकरी होण्याचा शब्द दिला होता.
खान्देशात जळगाव आणि धुळ्यात महानगरपालिका आहेत. जळगावमध्ये खान्देश विकास आघाडी आणि धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सत्ताधारी आहेत. दोन्ही ठिकाणी सत्ताधारी मंडळींचे भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी फारसे सख्य नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधी किंवा योजनांबाबत सवतासुभा असतो. जळगावात खान्देश विकास आघाडीची सत्ता ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्यावर टीकून आहे. धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्ण बहुमत आहे.
आघाडीचे राजकारण आणि सत्तेचा टेकू या दोन गोष्टींमुळे जळगावच्या महापौरपदाचा नितीन लढ्ढा यांनी राजीनामा दिला. उर्वरित वर्ष-सव्वा वर्षाच्या काळासाठी विद्यमान उपमहापौर व मनसेचे नेते ललित कोल्हे यांची महापौरपदी वर्णी लागेल. खाविआचे नेते रमेश जैन यांनी ललित कोल्हे यांना महापौरपदाच्या उर्वरित कार्यकाळात वाटेकरी होण्याचा शब्द दिला होता. श्री. लढ्ढा यांनी तो शब्द पाळण्यासाठी राजीनामा दिला. श्री. लढ्ढा यांची ही अकाली पॉलिटीकल एक्झीट जळगावकरांना अस्वस्थ करणारी नक्कीच आहे. याचे कारण म्हणजे, श्री. लढ्ढा यांना महापौरपदावरुन पायउतार करताना खाविआने निश्चितपणे लगीनघाई केली. शिवाय, खाविआ अंतर्गत श्री. लढ्ढा यांना योग्य पद्धतीने निरोप दिला गेला नाही. या बाबी सर्वसामान्य जळगावकरांना खटकणाऱ्या आहेत. श्री. लढ्ढा हे केवळ महापौर नव्हते तर ते खाविआच्या उभारणीतील एक आधारस्तंभ आहेत. आघाडीतील अनुभवी व ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांच्या निरोपाची एक्झीट ही सन्मानातूनच व्हायला हवी होती.
मनसे सोबतच्या राजकिय तडजोडीतून श्री. लढ्ढा यांना महापौरपद सोडावे लागणार हे जवळपास महिनाभरापासून चर्चेत होते. महापौर लढ्ढा आणि उपमहापौर कोल्हे यांच्या जोडगोळीची जळगावकरांना सवय झाली होती. दोघेही सभागृहात एकमताने कामकाज करीत होते. श्री. लढ्ढा हे ज्येष्ठ व वडिलांचे मित्र म्हणून काकाच्या नात्याने श्री. कोल्हे त्यांच्याशी वागत होते. राजकारणाच्या एका वळणावर खांदेपालट होईल आणि श्री. कोल्हे हे श्री. लढ्ढांना टेकओव्हर करतील हा अंदाज होता. फक्त, श्री. लढ्ढा यांचा राजीनामा घेताना खाविआत जे घडले ते घडायला नको होते.
साधारणतः सव्वा वर्षापूर्वी (10 मार्च 2016) श्री. लढ्ढा हे खाविआकडून महापौरपदी विराजमान झाले. श्री. लढ्ढा यांच्यासोबत मनसेचे श्री. कोल्हे हे उपमहापौर झाले होते. खाविआ व मनसेची थेट युती, जनक्रांती आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळवून भक्कम बहुमत घेत लढ्ढा-कोल्हे यांनी सत्तापदे प्राप्त केली. पण, तेव्हाही राज्य सरकार पातळीवर राजकिय स्थिती प्रतिकूल होती.
जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे राज्याच्या मंत्रिमंडळात 12 खाती सांभाळणारे मंत्री होते. त्यांची खाविआ आणि त्यांच्या नेत्यांवर पूर्वीपासून वक्र दृष्टी होती. त्यामुळे मनपाच्या विविध कामात जिल्हा प्रशासन व नगरविकास विभागाचे हवे ते सहकार्य मिळत नव्हते. उलटपक्षी मनपाशी संबंधित अनेक विषयांत सरकारी हस्तक्षेप वाढून काम प्रलंबित कशी राहतील याचेच नियोजन केले जात होते. मनपाच्या बोकांडी हुडकोचे कर्ज, मनपाच्या मानगुटावर जिल्हा बँकेचे कर्ज, मनपाकडे दिलेले आयुक्त हे विरोधकांचेच प्रतिनिधी, व्यापारी गाळ्यांचे प्रलंबित लिलाव, निधी अभावी ठप्प झालेले स्वच्छतेचे ठेके अशा अनंत अडचणीत लढ्ढा-कोल्हे यांचे काम सुरू झाले.
जळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी जाहीर केलेला 25 कोटींचा निधी आजही मनपाला मिळू शकलेला नाही, या एका उदाहरणातून राज्य सरकारी यंत्रणा व सत्ताधारी गटातील ताणलेल्या संबंधांची कल्पना यावी. व्यापारी गाळ्यांच्या लिलावाच्या प्रश्नात खडसे यांनी महसूलमंत्री म्हणून नवा ट्विस्ट आणला. त्यांनी व्यापारी गाळ्यांची जागा महसूलची आहे, हा मुद्दा मांडून संपूर्ण प्रक्रिया अधांतरी केली. अशा वातावरणात लढ्ढा-कोल्हे यांना केवळ मनपात येवून बसणे याशिवाय दुसरे काम नव्हते. मनपा प्रशासनाचे प्रमुख असूनही तेव्हाच्या आयुक्तांची भूमिका विरोधकाचीच होती. त्यामुळे मनपाच्या विविध सभांमध्ये श्री. लढ्ढा व आयुक्तांचे खटके उडत. या निराशाजनक स्थितीत जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनीही वेगळीच दिशा धरली. त्यांच्या पत्रापत्रीमुळे मुख्यमंत्री निधीतील कामे रेंगाळली. पण, काळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. मंत्रीपदावरुन खडसे पायउतार झाले आणि जळगाव जिल्हा प्रशासनानेही रंग बदलला.
तेव्हाच्या जिल्हाधिकारी यांच्याशी जुळवून घेण्यात श्री. लढ्ढा यांनी समन्वयाची भूमिका घेतली. स्थायी समिती सभापती नितीन बरडे हे मध्यस्थ झाले आणि जळगावच्या विकासाचे काही प्रकल्प पुढे सरकू लागले. सुदैवाने विरोधकाच्या भूमिकेतील आयुक्तांची बदली होवून सर्वांशी समन्वय साधू शकतील असे आयुक्त जीवन सोनवणे आले. श्री. लढ्ढा यांनी लोकसहभागातून नागरी विकास कामांचा नवा प्रयोग सुरू केला. त्याचे पहिले उदाहरण होते, मेहरुण तलावातून गाळ काढणे. यासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाने यंत्रणा दिली. खाविआचे नेते सुरेशदादा जैन व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील जुनी मैत्री यासाठी कामी आली.
जलसंपदा विभागाच्या यंत्रणेसह काही उद्योगांनी व सहकारी संस्थांनी मदत केली. त्यामुळे मेहरुण तलाव खोलीकरण झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने तलाव परिसर नुतनीकरण सुरू झाले. इतरही कामे मार्गी लागली. यात भाऊंचे उद्यानाची उभारणी हा विषय लक्षवेधी ठरला. जैन उद्योग समुहाच्या आर्थिक पाठबळाने, मनपाच्या संमतीने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जागेत एक नितांत सुंदर उद्यान उभे राहिले. असाच विषय गांधी उद्यानाच्या नुतनीकरणाचा आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरण व समांतर रस्त्यांचा प्रश्न चर्चेत आला. बजरंग बोगद्याचे विस्तारीकरण सुरू झाले.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली आणि नवे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर आले. त्यांचे मनपा पदाधिकाऱ्यांशी चांगलेच ट्युनिंग जमले. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या विषयातून मनपा पदाधिकारी त्यांच्या जवळ गेले. मनपा आयुक्त निवृत्त झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडेच मनपा आयुक्ताचा प्रभारी पदभार आला. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांत प्रभारी आयुक्त राजे निंबाळकर, लढ्ढा, कोल्हे या त्रिकुटाने विविध नागरी सुविधांच्या कामाला हात घातला. महामार्गावरील अतिक्रमण काढणे (अजिंठा चौफुली), व्यापारी संकुलांची सफाई (गोलाणी, फुलेमाक्रेट), उद्यानांचे नुतनीकरण (गांधी उद्यान), रुग्णालयाचे लोकसहभागातून खासगीकरण (शाहू रुग्णालय), जलतरण तलावाचे नुतनीकरण, मनपाच्या बंद शाळांचे लोकसहभागातून खासगीकरण, चौकांचे व शास्त्री टॉवरचे सुशोभिकरण, अतिक्रमण करणाऱ्यांना पर्यायी जागा देणे, काव्यरत्नावली चौकातील जागेचे हस्तांतरण, ट्राफिक गार्डन विकास असे अनेक विषय मार्गी लागले. अर्थात, यासाठी अनुभव, विषयांचा पाठपुरावा, कायद्याचे पूर्ण ज्ञान व प्रशासकिय व्यवस्था या गुणांच्या बळावर श्री. लढ्ढा यांनी अडचणीतही लक्षवेधी काम केले. येथे एक गोष्ट नमुद करावी लागेल ती म्हणजे, श्री. लढ्ढा यांनी महापौर म्हणून मनपाची गाडी व इंधन कधीही वापरले नाही. इतर वेगळ्या प्रकारच्या अर्थकारणाचा दुरान्वये संबंध सुद्धा नाही.
अशा एकूणच सकारात्मक वातावरणात राजकिय तडजोड पूर्ण करण्यासाठी श्री. लढ्ढा यांना महापौरपद सोडावे लागणार हे निश्चित होते. पण, त्यासाठी निर्माण केलेली स्थिती खाविआसाठी समर्थनीय नाही.
श्री. लढ्ढा यांचे खाविआ नेते रमेश जैन यांच्याशी अलिकडे जमेनासे झाले होते. स्मारकाची कोनशिला बदलणे, मनपा इंटरनेट सेवेचा ठेका आदी विषय दोघांमध्ये कळीचे ठरले होते. सभागृहातही खटके उडालेले अनुभवले होते. त्यामुळे श्री. लढ्ढा यांच्या सन्मानाचा निरोप हा गच्छंती प्रकारात बदलण्याचा खलनायकीपणा रमेश जैन यांनी केला असे चित्र आज तरी जळगावकरांनी पाहिले आहे. श्री. लढ्ढा हे राजीनामा देण्यासाठी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा त्यांनी गाडीवरील महापौर ही पाटी काढली. जिल्हाधिकारी यांनी श्री. लढ्ढांचा राजीनामा घेत त्यांच्या गौरवाचे भाषणच केले. त्यामुळे श्री. लढ्ढा गहिवरले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी हे श्री. लढ्ढा यांना सोडायला कार्यालयाच्याबाहेर वाहनाजवळ गेले. बहुधा श्री. लढ्ढा यांच्याविषयी सर्व सामान्यांच्या मनांत असलेला आदर यातूनच स्पष्ट होतो. श्री. लढ्ढा यांनी महापौरपदावर बसताना व्यक्तिमत्व निर्माण केले आणि त्या पदावरुन उतरताना ते नम्रता, विश्वास व अनुभवाचे ब्रॅण्ड झाले आहेत. म्हणूनच त्यांचे पदावरुन जाणे अस्वस्थ करणारे आहे.
संभावित महापौर ललित कोल्हे यांची कार्यशैली स्वतंत्र आहे. त्यांचा जनसंपर्क आगळा वेगळा आहे. महापौर म्हणून ते सुद्धा प्रभावशाली काम करतील, या विषयी शंका नाही.
धुळ्यात महापौरपद अस्थिर होण्याचे कोणतेही कारण नाही. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. सध्या सौ. कल्पना महाले या महापौर आहेत. त्यांच्या अगोदर त्यांच्या सुनबाई सौ. जयश्री अहिरराव या महापौर होत्या. महाले यांच्या कार्यकाळातही सत्तेचा वाटा पडू शकला असता. मात्र, उर्वरित काळासाठी दावेदार होवू शकतील अशा सौ. मनिषा सतीष महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. म्हणूनच धुळ्यात महापौरपद अस्थिर नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला राज्य सरकारकडून अडथळे आणण्याचे काम भाजपचे स्थानिक नेते करीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजवर्धन कदमबांडे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी थेट संबंध असल्यामुळे अनेक अडथळे नंतर दूर होतात ही बाब अलहिदा ...
आनंददायी समारोप ...
एबीपी माझाच्या वेबपोर्टलवर गेले वर्षभर खान्देश खबरबात हे वार्तापत्र प्रसिध्द झाले. हा आजचा शेवटचा भाग. समारोपाचे वार्तापत्र. एबीपी माझामुळे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक सामायिक विषयांवर लिहायची संधी मिळाली. जवळपास ६० लेख प्रसिध्द झाले. ५४ नियमित व ६ विशेष लेखांचे होते. प्रींटसोबत वेबसाठी लेखनाचा हा प्रयोग आनंद देणारा होता. एखाद्या पाप्युलर चैनलची वेब आवृत्तीसुध्दा वाचक तेवढ्याच संख्येने वाचतात याचा अनुभव घेता आला. खान्देशातील नागरीप्रश्न, कायदा सुव्यवस्था, राजकारण, रोजगार, सिंचन, सहकार अशा अनेक विषयांवर लेखन केले. त्यावर मिळणारा प्रतिसाद हा व्हॉट्स ॲप, फेसबुकवर भरभरुन अनुभवला. वर्षभराचे वर्तुळ पूर्ण झाल्यानंतर आज खान्देश खबरबातला पूर्णविराम देत आहोत.
‘खान्देश खबरबात’ सदरातील याआधीचे ब्लॉग :
खान्देश खबरबात : मेहता, देसाईंपेक्षा खडसेंचा अपराध मोठा कसा?
खान्देश खबरबात : मिसाबंदीजनांच्या मानधनाचे घोंगडे भिजतच
खान्देश खबरबात : भविष्य अंधारलेल्या बाजारपेठा
खान्देश खबरबात : खान्देशातील नदीजोड प्रकल्प मार्गी लागावेत!
खान्देश खबरबात : जळगावात जिल्हाधिकाऱ्यांचे ऊलगुलान!
खान्देश खबरबात : बदनामीच्या फेऱ्यात धुळे, जळगाव जिल्हा परिषदा
खान्देश खबरबात : जीएसटीसह व्यापारही बाळसे धरणार !
खान्देश खबरबात : खडसेंच्या वापसीची तूर्त आशा!
खान्देश खबरबात : शिवसेना खान्देशात नक्कीच वाढू शकते…
खान्देश खबरबात : कागदोपत्री आपत्ती व्यवस्थापन उघडे !
खान्देश खबरबात : शेतकरी संपाने खान्देशला काय दिले ?
खान्देश खबरबात : आदिवासींचा विकास घोटाळ्यातच!
खान्देश खबरबात : हैदोस घालणारा “दादा” समर्थक!
खान्देश खबरबात : खान्देश होणार मेडिकल हब !
ब्लॉग : जळगाव जिल्हा परिषदेत ‘काँग्रेसयुक्त’ भाजप
आमदार निलंबन की मॅच फिक्सिंग !
खान्देश खबरबात : डॉक्टरांना सामाजिक व कायदेशीर संरक्षण हवेच !
यशवंतराव ते पर्रिकर व्हाया पवार !
खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी
खान्देशवासी मोकाट कुत्र्यांनी त्रस्त
खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर
खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !!
खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर
खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन
खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे
खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार
खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार
खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ
खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!
खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे
खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?
खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा
खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…
खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री
खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!
खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…
खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर
खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल
खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!
खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र
खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?
खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट
खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा
खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी
खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement