एक्स्प्लोर
खादाडखाऊ : तंदूर में तंदूर रेड्डीज की तंदूर

पुण्यात तंदूर सर्वात प्रथम सुरु करण्याचा मान कोणाकडे जाईल हे सांगणे अवघड आहे,त्यात मतांतरे असू शकतात.पण अस्सल पंजाब्यांची सद्दी समजल्या जाणाऱ्या तंदूरच्या प्रांतात,रत्नैय्या आक्की रेड्डी नावाच्या हैदराबादी तरुणाने सादलबाबाच्या दर्ग्याजवळ (डेक्कन कॉलेजजवळ) २५ वर्षांपूर्वी ‘रेड्डीज’ नावानी अस्सल पंजाबी चवीची तंदूर द्यायला सुरुवात केली.
त्यावेळच्या नगररस्त्याजवळ राहणाऱ्या लोकांना तंदूरमधे बनेलेले पदार्थ चाखण्याची सोय नव्हती.‘रेड्डीज’नी त्यांना अस्सल चवीच्या तंदूरी चिकनची सवय लावली.’रेड्डीज’चा जम बसायला मग फार वेळ लागला नाही.साधारण १२ वर्षांपूर्वी ही भाड्याची जागा कमी पडायला लागल्याने रत्नैय्या आण्णानी जुनी जागा सोडून विमाननगरमधे ‘रेड्डीज तंदूर’ ह्या नव्या नावानी आपले हॉटेल सुरु केले.काही वर्षात शेजारच्याच कल्याणीनगरलाही विस्तार केला.
पुणे शहरात राहण्र्यांर्यांना ‘रेड्डीज तंदूर’च्या चवीची भुरळ पडली नसती तरच नवल होतं.पण शहरात राहणाऱ्यांना हे दोन्ही भाग तसे गैरसोयीचे.त्यासाठी ‘रेड्डीज तंदूर’ची पुण्यातली ब्रँच सुरु झाली.‘रेड्डीज तंदूर’च्या पुण्यातल्या ह्या ब्रँचला पुणेकरांनी अल्पावधीतच डोक्यावर घेतलंय.
तंदूरमधे शेकल्या जाणाऱ्या कुठल्याही साध्या पदार्थाची चवही खरतर कायमच न्यारी असते.पण मांसाहारी पदार्थांच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचे असतात,त्यांना लावले जाणारे मसाले. रेड्डीज मध्ये मिळणारी तंदूर आणि इतर ठिकाणी मिळणारी तंदूर ह्यात नेमका हाच फरक आहे.
‘रेड्डीज’ची खरी ओळख म्हणजे इथल्या पदार्थांना लावले जाणारे मसाले.त्यामुळे इथल्या तंदूरमधे भाजला जाणारा प्रत्येकच मांसाहारी पदार्थ इतर ठिकाणी मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा वेगळा.
रत्नैय्या आण्णांच्या अनुभवातून बनलेला पंजाबी पद्धतीचा मसाला, दह्यात मुरवून कमीतकमी दहा-बारा तास ठेवला जातो.कितीही गर्दी असली तरी,प्रत्येक तंदूरी डिश,अनुभवी शेफच्या देखरेखीखाली कमीतकमी १२-१५ मिनिटांचा वेळ भाजून (खरतर शेकून हाच त्याला योग्य शब्द) मगच ग्राहकाच्या समोर पेश केली जाते.त्यावर पसरलेला चाट मसाला तंदुरीची चव जास्तीच चटपटीत करतो.तंदुरीकरता काहीवेळ थांबल्याचे समाधान,खाणाऱ्याला मात्र प्रत्येक घासागणिक मिळतं.
रेड्डीजच्या चिकन तंदुरी,कबाबचा चाहता तर प्रत्येकजण एकदा आला तरी होतोच,तसाच मीही होतो.पण ह्या ब्रँचमधे मिळणाऱ्या मुघलाई डिशेस मला तेवढ्याच आवडल्या.इथल्या दम बिर्याणीला पर्याय नाही.फक्त पुण्यातच असं नाही तर समस्त महाराष्ट्रात बहुसंख्य ठिकाणी बिर्याणीच्या नावाखाली तिखट फासलेले चिकन/मटण घालून शिजवलेला भात आवडीने खाणारया खवैय्यांना तर इथली बिर्याणी वेड लावेल.इथले मुर्ग मुसल्लम,चिकन अंगारा,बटर चिकन,फक्त क्वालिटीच नाही तर क्वांटीटीच्या बाबतीतही पुण्यातल्या अनेक हॉटेलला मागे टाकेल,ह्याच्या बाबतीत माझ्या मनात जराही शंका नाही.इथली अस्सल मुस्लीम स्पेशालिटी डिश ‘मटण दालचा’ही ह्या ब्रँचची अजून एक स्पेशालिटी.
त्यामुळे इथे आल्यावर सगळ्यात आधी काय घ्यावं हा मला पडणारा कायमचा प्रश्न.इथे यावं तर पोटात रग्गड भूक आणि सोबतीला तबियतीनी जेबणारे निदान ५-६ जणं घेऊन.मग त्या प्रश्नावरच उत्तर सोपंय.आपल्याला घाई नाही हे आधी वेटरपाशी डिक्लेअर करून निवांत वेळ घेऊन आलेल्या चिकन तंदुरीनी बिस्मिल्ला करावा.मेन कोर्स म्हणून दोन मुघलाई डिश मागवाव्या.किंचित तिखट पाहिजे असेल तर चिकन अंगारा,नको असेल तर मुर्ग मुसल्लम किंवा बटर चिकन.जोडीला एखाद दोन प्लेट कबाब.(इथले कस्तुरी कबाब मला आवडले)त्यासोबत रोटी/नान/कुलचे काहीही मागवा,परफेक्ट जोडी.दोनदोन रोट्या आणि त्यावर सगळ्यामध्ये एक किंवा दोन बिर्याणी.एक दालचा घेतलात तर साताठ जणात सहज पुरतो !वरती इथल्या मेन्यूकार्ड वर अजूनही न आलेलं कॅरॅमल कस्टर्ड खाणं म्हणजे मैफलीची गोड भैरवी.
रेड्डीज तंदूरच्या शहरातल्या ब्रँचची गरज होती स्वतःची चांगली क्वालिटी तशीच लोकापर्यंत नेणाऱ्या पार्टनरची.ती गरज शेखर जावळकर ह्यांच्या रूपानी पूर्ण झाली.शेखर जावळकर गेले दहा वर्षे हॉटेल व्यवसायातच.त्यांचे स्वतःचे हॉटेल पौड रस्त्यावर आहेच.त्त्यामुळे ‘रेड्डीज’ला स्वतःची क्वालिटी तेवढ्याच मनापासून देणारा पार्टनर मिळाला.जावळकरांच्या जोडीला त्यांचे मित्र नितीन गोडांबेही दिवसभर असतात.’रेड्डीज तंदूर’च्या ह्या ब्रँचचे नाव वाढवायचे श्रेय ह्या दोघांकडे जातं.
पुण्यात तंदूर तर आपल्याला गल्लीबोळात मिळेल.पण ‘रेड्डीज तंदूर’ मध्ये एकदा खाल्लेली व्यक्ती नंतर इतर ठिकाणी तंदूर,मुघलाई खातानाही ‘रेड्डीज तंदूर’ ची आठवण नक्की काढेल हे नक्की.रेड्डीजचंच नाही तर कुठल्याही चांगल्या हॉटेलचं हे सगळ्यात मोठं लक्षण आहे.
पत्ता – रेड्डीज तंदूर
म्हात्रे पूल-राजाराम पूल डीपी रस्ता
वेळ सकाळी ११ ते ३ आणि संध्याकाळी ७ ते रात्री ११.३०

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग:
खादाडखाऊ : मावळचा रिफ्रेशिंग टर्निंग पॉईंट
खादाडखाऊ : वाडेश्वर भुवन
खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम
खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल
खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा
ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी
खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!
खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा
View More
Advertisement
Advertisement