एक्स्प्लोर

BLOG : हडप्पाकालीन मूर्तीची नग्नता आणि एनसीईआरटीचा भोंगळपणा!       

BLOG : NCERT च्या नववीच्या पुस्तकात हडप्पा कालीन मूर्तीमधील नृत्य करणारी मुलगी नग्न आहे हे दिसू नये यासाठी तिच्या प्रतिमेत छातीखालचा भाग ब्लर  केला आहे; तिने कपडे घातलेत असे विद्यार्थ्यांना वाटावे असे ncert चं म्हणणं! 4500 वर्षांपूर्वीच्या या मुक्त स्वातंत्र्याच्या संस्कारांपासून आताच्या मुलांना वाचवण्यासाठी डिजिटल युगातल्या कथित संस्कृतिरक्षक सरकारने जे काही चाळे चालवले आहेत त्याच्या बिनडोकपणाला तोड नाही! स्वतःमधलं भोंगळंपण लपवण्यासाठी बायकांना कपड्यांच्या ताग्यात लपेटण्याची ही जुनाट वृत्ती विकृतच मानली पाहिजे!

नग्नतेकडे कसे पाहिले पाहिजे हेच ह्यांना ठाऊक नाहीये ही किती खेदाची बाब आहे! उद्या उठून खजुराहोमधील विख्यात लेण्यांना देखील हे वस्त्रात बंदिस्त करतील! जैनांच्या नग्न मुर्त्यांना देखील कपड्यात दाखवतील! मुळात माणूस जन्माला आलाय तो वस्त्रहीनच; मात्र मानवी जीवनातील लैंगिक भावना निकोप राहाव्यात तसेच लज्जा, आदर भाव ह्यांचे संवर्धन करण्यासाठी वस्त्रांचा वापर सुरु झाला. 

आता कपड्यांची बंधने स्त्रियांवर लादून समाज नामानिराळा झाला आहे! घरोघरच्या पिंट्या, भाई, बंटी ह्यांना आवर घालण्याऐवजी साऱ्या मर्यादांचे ओझे बायकांवर ढकलून लोक मोकळे झालेत. साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या जेमतेम साडेदहा सेंटीमीटर उंचीच्या तांब्याच्या काळसर मुर्तीमधील नग्नता कशी काय छळू शकते? त्यात आक्षेपार्ह काय आहे? त्याने कोणता वाद उद्भवणार आहे आणि जरी उद्भवलाच तर त्याचे शमन करण्याची ताकद संबंधितांत नाहीये का? की, वाद उद्भवेल ह्या खोट्या सबबीखाली ह्यांनाच त्या मुर्तीमधील नग्नता नकोशी झालीय? 

असे असेल तर देशात अशी अनेक पेंटिंग्ज सापडतील ज्यात नग्न मुर्त्या आहेत, नग्न व्यक्ती आहेत! अशी अनेक शिल्पे आढळतील ज्यात नग्न देवी देवता आहेत, नग्न अवस्थेतील स्त्री पुरुष आहेत! ह्या सर्वांचे पुस्तकी उल्लेख करताना त्यांना झाकण्याचा पराक्रम हे करणार का? काय खुळचटपणा आहे हा?                       

खरे तर हडप्पा काळात पुरुष आणि स्त्रिया कमरेच्यावरती आत्ता उपरण्यासारखे दिसणाऱ्या कपड्यांचा वापर करत तर धोतराचा वापर कमरेपासून खाली कपडे म्हणून केला जात असे. या काळातील लोक कापड विणण्यात अतिशय पारंगत होते. सामान्यत: पुरुष धोतर तर स्त्रिया परकरसारख्या वेशभूषा दैनंदिन जीवनात वापरत असत. मात्र सर्व व्यक्ती वस्त्र घालत नसत!

काही शिल्पं आणि चित्रांनुसार तत्कालीन महिला फक्त कमरेच्या खाली झाडांच्या पानाचा वापर करत असत. अशोका या झाडाची पाने, तसेच पुन्नैच्या फुलांचा वापर करुन परकर बनवले जात. काही शिल्पांमध्ये स्त्रिया ‘कलिंगम’ नावाचं वस्त्र पुर्ण शरीर झाकण्यासाठी करत असत असं दाखवण्यात आलं आहे. मात्र अनेकदा वस्त्र परिधान करण्याऐवजी केवळ आभूषणे घातली जात. 

एनसीईआरटीला जिच्यामुळे संस्कृतीरक्षणाची दाट उबळ दाटून आली ती मूर्ती मोहेंजो-दारो येथे सापडलेल्या दोन कांस्य मूर्तींपैकी एक आहे. ही मूर्ती एका मुलीची आहे. कांस्यशिल्पातली ही मुलगी नग्न आहे, तिने अनेक बांगड्या आणि एक हार घातला आहे, आणि तिला एका हाताने कमरेवर ठेवून नैसर्गिक उभ्या स्थितीत चित्रित केले आहे. 

तिच्या डाव्या हातात 24 ते 25 बांगड्या आहेत आणि उजव्या हातात 4 बांगड्या घातल्या आहेत. तिने डाव्या हातात एक वस्तू धरली आहे, हा हात तिच्या मांडीवर टेकलेला आहे; तिचे दोन्ही हात असामान्यपणे लांब आहेत. तिच्या हाराला तीन मोठे पेंडंट आहेत. तिने आपले लांब केस एका मोठ्या अंबाड्यात बांधले आहेत जो तिच्या खांद्यावर रेललेला दिसतो. 

इतक्या दुर्मिळ आणि देखण्या शिल्पाकडे पाहून ज्याच्या मनात काही विवादास्पद गोष्टी येत असतील तो विकृतच म्हटला पाहिजे, साडेचार हजार वर्षांपुर्वी ज्याने हे शिल्प बनवले ती व्यक्ती, जिचे हे शिल्प आहे ती मुलगी आणि त्या काळातल्या तमाम लोकांचा लैंगिक आणि देहिक दृष्टिकोन निकोप आणि सदृढ होता असे म्हणताना आताच्या ह्या गणंगांची लाज वाटते!    

एक तरुण मुलगी, तिचा हात कमरेवर ठेवून अर्ध-विश्रांतीच्या स्थितीत, आणि तिचा पाय किंचित पुढे ठेवून ती संगीताच्या तालावर पाय हलवत आहे, त्यामुळेच ह्या शिल्पाला नर्तकी असे नाव देण्यात आले! 'सिंधू संस्कृतीच्या उत्खनन स्थळावरील सर्वात मनमोहक कलाकृती' असं ह्या शिल्पकृतीचे वर्णन केले जाते! 

आपल्या समृद्ध पूर्वजांचा हा वारसा पुढे नेण्यात आपल्यातले काही लोक असमर्थ ठरताहेत कारण त्यांच्या मनात सदैव खुळचट संस्कृतीमधल्या कथित लज्जारक्षणाचे शेण्मूत्र साठून असते! 

काळाची चक्रे उलटी फिरवण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या मनात उचित भावना निर्माण व्हाव्यात आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी कसे पाहावे ह्याच्या निकोप दृष्टिकोनाचे धडे शिकवले पाहिजेत! सगळे नीतीमत्ता पाठ मुलींना शिकवण्याची जी पुरुषी वर्चस्ववादी वृत्ती आहे त्या वृत्तीने साडेचार हजार वर्षापूर्वीच्या नग्न मूर्तीला कपडे घातलेले दाखवावेत ही अतिशय शरमेची बाब आहे! 

आसपास इतकं काही उघडं नागडं सुरु असतं त्याला हे सरकार आणि ह्यातले हे भुक्कड लोक आळा घालू शकतील का? 

समजा एनसीईआरटीच्या एखाद्या पुस्तकात कुंभमेळ्याची माहिती देण्याचा विषय असेल तर त्या फोटोमध्ये गांजाफुक्या नागा साधूंना नागडं दाखवण्याऐवजी एडिट करून पॅन्टशर्टमध्ये दाखवतील का? 

एका बेजान शिल्पाला तुम्ही कपडे घालू शकता कारण तिच्या बाजूने बोलणारे कुणी नाही मात्र नागड्या फिरणाऱ्या अनेक साधू महंतांना तुम्ही अटकाव करू शकता का, ह्याचे उत्तर नाही असेच येईल! 

अकलेची दिवाळखोरी दर्शवणारे हे दुटप्पी वागणे बंद करावे. ज्या पुस्तकात हा उद्योग केला आहे ते पुस्तक नववीच्या विद्यार्थ्यांचे आहे. म्हणजे ही पौगंडावस्थेतली मुलं आहेत. झाकलेली वस्तू काय आहे हे पाहण्याची जिज्ञासा मानवी स्वभावात अधिक आढळते. इंटरनेटपासून ते हजारो साधनांत ही मूर्ती ह्या मुलांना नग्न दिसेल तेव्हा त्यांचे चित्त विचलित होणार नाही का, काहीतरी वाद होणार नाही का? उलट हेच वय आहे अशा गोष्टी नेटक्या पद्धतीने समजावून सांगण्याचे!

आपल्या देशात मोठ्या प्रमाणात जे बलात्कार होतात, चिमुरड्या मुलींचे शोषण होते, वृद्ध बायका देखील त्यातून सुटत नाहीत, कोणत्याही स्त्रीमध्ये मादी शोधण्याची एक विकृती जडून आहे, वखवखलेल्या नजरेने फिरणारे वासनेने लाखो बुभुक्षित पुरुष मोकाट फिरत असतात! ह्याचे मुख्य कारण माहिती आहे का? आपल्या देशात अनेक मुलांना, पुरुषांना आपल्या लैंगिक भावनांचे योग्य शमन कसे करायचे हेच ठाऊक नाही! त्या भावनांना कसे हाताळले पाहिजे ह्याचे ज्ञान त्यांना नसते! 

उद्दीपित झालेल्या पुरुषांना आवरण्यासाठी मुले विद्यार्थी दशेत असतानाच ह्याची वैचारिक जडणघडण निकोप आणि सदृढ करता येते! त्यासाठी हजारो वर्षांपूर्वीच्या मूर्तीला कपडे घालणे हा निव्वळ बिनडोकपणा आणि वैचारिक मागासलेपणा आहे! 

ह्या निर्णयाचा फेर विचार करुन हा अगोचरपणा रद्द केला पाहिजे. कधीकधी अशा छोट्या छोट्या घटना लिटमस टेस्ट म्हणूनही केलेल्या असतात, लोक गप्प बसले तर ह्यातल्या पुढच्या टप्प्यांना हात घालणे त्यांना सोपे जाते! म्हणून अशा गोष्टींना विरोध केलाच पाहिजे! 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग;  नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग;  नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Embed widget