एक्स्प्लोर

खादाडखाऊ : पुण्यातले इराणी

आपल्याकडे इराणी-पारसी रेस्टॉरंट्सची परंपरा बरीच जुनी. सततच्या आक्रमणांना कंटाळून पर्शियामधून(इराण) पारसी-इराणी भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथे यायला लागले. मुख्यत्वे नवसारी-डहाणूच्या बाजूने मुंबई-पुण्यात आलेले पारसी जुन्या आख्यायिकेत सांगितलेल्याप्रमाणे, दुधात साखर मिसळावी तसे भारतातल्या संस्कृतीत मिसळून गेले. आणि त्यांनी चटक लावलेल्या इराणी चहा, ब्रेडआम्लेटमध्ये इथली प्रजा कधी गुंतली त्यांनाही समजलं नाही.

आजच्या स्टार्टअपच्या जमान्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्या तशी नवीन हॉटेल्स सुरु होतात. नवी नवलाई संपल्यावर दोनचार महिन्यात चालेनाशी होतात आणि अखेर वर्ष सहा महिन्यात बंदही होतात. काही हॉटेल्स मात्र लोकांच्या मनात ध्रुवासारखं अढळपद मिळवतात. पुण्याच्या लेखी इराणी रेस्टॉरंटची तीच जागा आहे. आपल्याकडे इराणी-पारसी रेस्टॉरंट्सची परंपरा बरीच जुनी. सततच्या आक्रमणांना कंटाळून पर्शियामधून(इराण) पारसी-इराणी भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथे यायला लागले. मुख्यत्वे नवसारी-डहाणूच्या बाजूने मुंबई-पुण्यात आलेले पारसी जुन्या आख्यायिकेत सांगितलेल्याप्रमाणे, दुधात साखर मिसळावी तसे भारतातल्या संस्कृतीत मिसळून गेले. आणि त्यांनी चटक लावलेल्या इराणी चहा, ब्रेडआम्लेटमध्ये इथली प्रजा कधी गुंतली त्यांनाही समजलं नाही. इराणी हॉटेल्सची ओळख व्हायला सहसा कॉलेजचे दिवस उजाडायला लागतात. अगदी आमच्या पिढीपर्यंत कित्येकांनी आम्लेट-खिम्याची चव पहिल्यांदा लकी, गुडलक, एनसीआर सारख्या इराणी रेस्टॉरंट मध्येच घेतली आहे. पहिली बिर्याणी दोराबजी मध्ये खाल्ली आहे. ’कँप’हे नाव निघायचा अवकाश, कॅफे नाज-महानाझ सारख्या इराणी हॉटेल्समध्ये,“समोर आलेल्या डिशमधले 8-10 सामोसे, पेस्ट्रीज एकत्र बघून आम्ही कसे खुश झालो आणि बिल आल्यावर आमचे डोळे कसे विस्फारले गेले होते,” ,ह्याच्या हजारो स्टोरीज पुण्यात आजही सहज ऐकायला मिळतील. शिकायच्या नावाखाली पुण्यातल्या पेठेत तारे तोडताना, हॉटेलमधलं खाणं म्हणजे मिसळ, वडा-सँपल इतपतच माहिती असलेल्या माझ्यासारख्या अनेकांना, लकडीपुलाच्या पल्ल्याडच्या कॉलेजमध्ये गेल्यावर वैशाली, रुपाली, सवेरासारख्या हॉटेल्सची माहिती झाली. पण तिथे आत जायला लागणारे पैसे फारच कमी वेळा खिशात निघायचे. अशावेळी माझ्यासारख्या अनेकांना चहा, मस्काबन खिलवणारे आमचे हे इराणी चाचा लोक हळूहळू आमचे दोस्त कसे बनत गेले ते मला समजलंच नाही. लकीचा अंकल, एनसीआरचा मामू, गुडलकचा कासम शेठ, वहुमनचा बाबाजी अश्या इराणी बाबाजींची आठवण झाली की स्साला आजही डोळ्यात पाणी तरारतं. यातले काही जण बोलायला गोड तर कासमशेठ एकदा ओळख झाली की हक्कानी शिव्या घालणाऱ्यापैकी, वहुमनचा बाबाजी तर पक्का शिवराळ, पण ह्या लोकांसारखी प्रेमळ माणूस सापडणे आता मुश्कील नही नामुन्कीन है भैय्या! बोलायला फटकळ असलेले हे स्साले इराणी स्वभावानी मात्र एकजात दिलदार. ‘अरे क्या मस्ती करता है रे तुम पंटरलोक’? ’पंटरलोक’ हा कॉलेजमधल्या पोरांसाठी कासमशेठचा कायम फेव्हरेट शब्द असायचा. अडीनडीच्या प्रसंगी नेहमीच्या ‘पोरांचे’ चहाचे वगैरे पैसे उधार ठेवायचा पण सिगारेट्स,गुटखा(त्यावेळी म्हणजे 95-96 सालाच्या सुमारास गुडलकमध्ये गुटखाही विकला जात असे)अशा व्यसनांना उधारी कोणालाही मिळायची नाही. पण या गोष्टी विकून पैसे घेताना नेहमीच्या मुलांना ‘ए साला ये पुडी क्यू खाता है रे तुम पंटरलोक?” असा भाबडा प्रश्नही विचारायचा. नंतर त्याला एका डॉक्टरकडून गुटख्याचे दुष्परिणाम समजल्यावर त्याने गुटख्यावर बंदी यायच्या आधीच, गुडलकमध्ये गुटखा विकणे कायमचे बंदही करून टाकले. cafe goodluck pune-compressed पण इतरवेळी “घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या?” यावर ‘शोलेच्या बसंती’पेक्षा जास्ती विश्वास. त्या वयातही रोज सकाळी एकदा गुडलकच्या किचनमध्ये चक्कर मारल्यावर काऊंटरला 6-7 तास सलग उभा राहायचा आणि अविरत काम सुरु. एकीकडे ओळखीच्या प्रत्येकाशी काहीनाकाही बोलणाऱ्या कासमशेठच्या एकेका शब्दावर वेटर लोक फटाफट काम करायचे. गुडलकची सर्व्हिस आजही कायम ‘फास्ट’ असण्यामागे त्यावेळी कासमशेठनी घालून दिलेली शिस्तच आहे. दुपारी जेवायला कधी गुडलकमध्ये गेलो तर हाच कासमशेठ बाहेरच्या बाजूच्या त्याच्या नेहमीच्या टेबलावर निवांत जेवत बसलेला दिसायचा. अशावेळी त्याला उगाचच कोणाची लुडबुडही खपायची नाही, अगदी नेहमीच्या गिऱ्हाईकाचीही नाही. जवळच्या टेबलावर बसलो तर लांबूनच हात दाखवून आपला ‘कासमखाना’ खात बसायचा. “तू तुझं जेव, मी माझं जेवतो”, ही ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ (आणि अस्सल पुणेरी) वृत्ती. दोस्तीच्या नावाखाली उगाच समोर दिसेल त्याला हात धरून जेवायला बसवणारा कासमशेठ माझ्या तरी बघण्यात कधीच नव्हता. जेवायच्या वेळी उगाचच पुढेपुढे करणाऱ्या एका अस्सल ‘फुकट्या’ मुलाचा कासमशेठनी शेलक्या शब्दात केलेला जाहीर अपमान केल्याचा किस्सा आठवून, तो मुलगा दिसल्यावर कट्ट्यावर आमच्या कित्त्येक संध्याकाळी हसत जायच्या. आपण काय जेवतो ते (भोचकपणे) बघणाऱ्यांसाठी त्यांनी स्वतःच्या जेवणालाच ‘कासमखाना’ नाव देऊन टाकलं, जी आजही गुडलकच्या स्पेशालिटी डिशमधली एक आहे. अनेकांना उफराट्या वाटणाऱ्या अशा कासमशेठची, प्रा.गंगाधर गाडगीळांसारख्या मराठी साहित्यिकांशी असलेली जिगरी दोस्ती अनेक पुणेकरांच्या कुतूहलाचा विषय होता. कासमशेठ गेल्यावर (कै) गाडगीळांनी वर्तमानपत्रात त्यांच्या मैत्रीवर लिहिलेला सुंदर लेख वाचल्याचे आठवतंय. vahuman cafe (new) pune तर काऊंटरवर खाली मान घालून सतत कॅश मोजत बसलेला समोरच्या ‘लकी’चा अंकल हे एक वेगळच प्रकरण, अगदीच मितभाषी. कोणी आलं-गेलं तर त्याचं फार सुखदुःख नाही. पण त्याला बोलतं करायचा मला अपघाताने सापडलेला पासवर्ड म्हणजे देव आनंद आणि गुरुदत्त. त्यातही देव आनंदवर अंकलची माया जास्ती. देव आनंदला पुण्याची आठवण आली की लकी आठवतं,ह्याचा त्याला प्रचंड अभिमान. एकदा गप्पांच्या मूड मध्ये आला की त्यांच्या उमेदवारीच्या दिवसातले ’प्रभात’चे,एफटीआयचे दिवस, तिथे काम करणारे, शिकणारे एकेकाळचे सिनेसृष्टीतील स्ट्रगलर्स नंतर स्टार कसे झाले, ह्याच्या आठवणी सांगणार. आम्ही डेक्कनला फिरताना त्यावेळी 4-5 रुपयात मिळणारे ताजे गरम ब्रेड पुडिंग खायला उगाचच ‘लकी’ मध्ये शिरायचो. एकदा असंच अंकलशी बोलताना असाच त्याच्या ‘देव आनंद’ या सॉफ्ट कॉर्नरचा शोध मला लागला. “अगली बार तुझे एक फोटो दिखाताहुं”, म्हणाला. पुढच्या वेळी गेल्यावर अंकलनी देव आनंदनी कित्त्येक वर्षांनी ज्यावेळी ‘लकी’ला भेट दिली त्यावेळेचा दोघांचा एकत्र काढून घेतलेला पोस्टकार्ड साईझ फोटो दाखवला. तो फोटो अभिमानानी दाखवताना, त्या म्हाताऱ्या चेहऱ्यावर असलेले निष्पाप हास्य अजूनही लक्षात आहे. आजच्या सेल्फीच्या जमान्यात वाढलेल्या पिढीला तशा फोटोचं महत्त्व कदाचित नाही लक्षात येणार. पण त्यावेळी लकीच्या भिंतीवरच्या लावलेल्या दस्तुरखुद्द देव आनंदच्या सुंदर लाईफ साईझ फोटो मधलं हास्यही त्याच्यापुढे फिकं पडेल. या इराणी चाचा लोकांच्या आठवणी सांगताना त्यांच्याकडच्या खाण्यावर लिहायलाच लेखाची जागा कमी पडते,त्यामुळे त्याबद्दल पुढच्या लेखात.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget