एक्स्प्लोर

कुणीही ती कुणीही तो

ती : तुझ्याशी बोलण्यात न् काही अर्थच नाहीय.तो : नको बोलूस न मग ठेव फोन.ती : तुला तेवढंच पाहिजे ना. कळलंय आता मला. तुला ना आधीसारखा इंट्रेसच नाही वाटत माझ्याशी बोलण्यात.

वेळ - रात्रीचे अकरा --------------------------------------------------------------------------------

ती : कधीपासून फोन करतेय मी. उचलत का नव्हतास. किती काळजी वाटली माहितय. कुठे ठेवला होतास फोन?

तो : जवळच होता. सायलेंट मोडवर ठेवलेला. दिसलेत मला तीस मिनिटांत पस्तीस मिसकॉल पडलेले. काही महत्वाचं बोलायंय का बोल पटकन.

ती : एकतर दिवसभरात एकही कॉल केलेला नाहीयेस. किंवा साधा एक मेसेजही केलेला नाहीयेस. आणि आता म्हणतोयस पटकन बोल म्हणून.

तो : तुला काल रात्रीच सांगितलेलं आज माझी महत्वाची मिटींग होती बॉस बरोबर. तुझ्या लक्षात कसं राहत नाही. आणि एखादा दिवस नाही केला मेसेज फोन तर काय बिघडलं.

ती : तुझ्याशी बोलण्यात न्  काही अर्थच नाहीय.

तो : नको बोलूस न मग ठेव फोन.

ती : तुला तेवढंच पाहिजे ना. कळलंय आता मला. तुला ना आधीसारखा इंट्रेसच नाही वाटत माझ्याशी बोलण्यात.

तो : दुसरी ही महत्वाची कामं असतात. आणि हो सारखं सारखं काय अस्तं बोलायचं.

ती :  माझ्यापेक्षा तुला काम महत्वाचं वाटतं. कामच करत बस.

तो : आता तू मला अधिकचं इरिटेट करू नको. झोपतो मी माझं डोकं दुखतंय.

ती :  काय झालं? वेळेवर जेवला नाहीस का? का पावसात भिजलास? तुला हजारदा सांगितलंय छत्री घेऊनच बाहेर पडत जा. गोळी घे असेल तर किंवा बाम लाव.

तो :  फक्त डोकं दुखतय गं. किती सूचना देतेयस. झोपतोय मी आता. तू ही झोप. बोलू सकाळी. बाय.

ती : बाय. टेक केअर. मिस यू. लव यू.

तो : हं. गुड नाईट. ---------------------------------------------------------------------------

वेळ - पहाटेचे तीन

ती : तू अॉनलाईन काय करतोयस. डोकं दुखतंय नं तुझं.

तो : हं. मित्राशी बोलतोय गं मिटिंगबद्दल. झोप तू.

ती : मित्राशीच नं नक्की.

तो : नाही मैत्रीणीशी बोलतोय. झालं समाधान?

ती :  तरीच

तो : तरीच काय तरीच. गैरअर्थ काढायची सवयच लागलीय तुला.

ती : आणि तुला खोटं बोलायची.

तो : काय खोटं बोललोय मी.

ती : हेच ना. झोपतो म्हणालास आणि जागा आहेस. ते ही अॉनलाईन.

तो : झोप नाही लागली त्याला मी काय करू?

ती : मला काळजी वाटते रे. तिथं नाहीये नं तुझी काळजी घ्यायला कुणी.

तो : मी लहान बाळ नाहीय. आपण आपली काळजी घ्यायला सक्षम असावं.

ती : हम्म. झालं का डोकं दुखायचं कमी. आणि प्लिज जागरण नको करूस ना.

तो : होईल कमी. तू झोप. बाय.

ती : टेक केअर.बाय. आणि जागू नकोस जास्त.

---------------------------------------------------------------------------

वेळ - दुसरा दिवस सकाळचे नऊ 

ती :  गुड मॉर्निंग. राहिलं का डोकं दुखायचं?

तो : गुड मॉर्निंग. नाही अजून कमी झालं.

ती : केलस नं जागरण. आता आल्याचा चहा घे. बरं वाटेल आणि आंबट किंवा अॉयली वगैरे काही खाऊ नकोस निदान आज तरी का मी घेऊन येऊ डबा अॉफिसवर.

तो : नको नको. मी खाईन लाईट काहीतरी. बरं. मला अॉफिसला उशीर होतोय निघतो मी. बाय.

ती : बाय. सी. यू.

---------------------------------------------------------------------------

वेळ - दुपारचा एक

ती : वाटतंय का काही कमी?

तो : काय?

ती : डोकं?

तो : हो आहे जरा कमी.

ती : खाल्लयंस का काही?

तो : हो समोसा खाल्लाय.

ती : काय हे? तुला सकाळीच सांगितलं ना. अॉयली काही खाऊ नको म्हणून.

तो : माझं डोकं दुखतय. मला खोकला नाही लागलेला. प्लिज तू माझी डॉक्टर बनू नकोस.

ती :  तरी काळजी घ्यावी आपण.

तो : हं.

ती : हं काय हं. मी मूर्ख म्हणून तुझी काळजी करतेय. घे तब्येत बिघडवून अजून.

तो : बाई माझं फक्त डोकं दुखतय मला ब्रेन ट्युमर नाही झालेला.

ती : अरे असलं काय अभद्र बोलतोयस. तुला काहीच कसं वाटत नाही असं बोलताना.

तो : आता रडून माझा मूड खराब करू नकोस. मला खूप काम आहे अॉफिसमध्ये.

ती : जा तुला नाही कळणार.

तो : बरं. ठेवतोय फोन मी. लंचटाईम संपला माझा. बाय.

---------------------------------------------------------------------------

वेळ -  सायंकाळचे पाच

ती : निघालास का अॉफिसमधून? झालं न पूर्ण कमी डोकं दुखायचं?

तो : हो बरचसं कमीय आता.

ती : अॉफिसवरुन जाताना मी येऊ का घरी?

तो : कशाला.

ती : कशाला म्हणजे काय? भेटायला.

तो : आज नको. मित्रांचं ठरलंय भेटायचं.

ती : हम्म. तुला मित्रांना भेटायला वेळ आहे आणि मला नाही.

तो :  तुला आठवत नसेल तर सांगतो. आपण भेटून दोन दिवसच झालेत. महिना दोन महिने झालेत असं का वागतीयस.

ती : हम्म. बरं.

तो : चल करतो कॉल रात्री. बाय.

ती. :  बाय. सी. यू. ---------------------------------------------------------------------------

वेळ - रात्रीचे दहा

ती : तू रात्री कॉल करतो म्हणालेलास ना. शेवटी मीच केला.

तो :  हो म्हणालेलो पण कामात विसरलो. आणि तू केलास तर बिघडलं कुठे?

ती : जावू दे काय करतोयस.?

तो : काम करतोय.

ती :  कामात तुला माझी आठवणही येत नाही नं?

तो : कॉन्सनट्रेशनने केलं तरच काम चांगलं होतं.

ती : माझ्याकडे लक्ष नाही दिलं तर चालतय नं?

तो : हे बघ माझा भांडणाचा मूड नाहीय. मला उद्या प्रोजेक्ट सबमीट करायचाय.

ती :  ओके ओके. नाही भांडतेय. झालं का डोकं दुखायचं कमी.

तो : होय. बऱ्यापैकी.

ती :  गुड. पण एखादी गोळी घे आजही. आणि होता होईल तेवढं लवकर झोप. उगाच जागत बसू नको. आणि थंडीत बाहेर नको जाऊस. थंड पाणी सुद्धा पिऊ नकोस.

तो : हे बघ. स्वतः इतकं पझेसिव व्हायची आणि मलाही इरिटेट करायची अजिबात गरज नाहीय. मी ओके आहे. मी उशीरपर्यंत काम करत बसेन. डिस्टर्ब करू नकोस बाय.

ती : हम्म. बाय.टेक केअर.

---------------------------------------------------------------------------

वेळ - पुढचा दिवस सकाळचे आठ

ती :  गुड मॉर्निंग. कसा आहेस?

तो : एकदम फ्रेश.

ती : आज जरा कणकणी वाटतेय अंगात.

तो : कालचं जरासं काम पेंडींग आहे. लवकर उठून करत बसलोय.

ती :  हम्म. ओके.

तो : बाय. बोलू दुपारी. -------------------------------------------------------------------------------

वेळ - दुपारचे दोन 

ती :  जेवलास का? काय करतोयस?

तो :  हो जेवलो. तू?

ती :  खाल्लं थोडं. काही खावंसं वाटेना. अंग दुखतंय सकाळपासून आणि आता डोकंही दुखायलंय.

तो : वेट मला मित्राचा फोन येतोय. बोलतो पुन्हा. ---------------------------------------------------------------------------

वेळ - रात्रीचे नऊ

ती :  कुठेयस ? काय करतोयस ? जेवलास का ?

तो :  हो जेवलो.. तू काय करतीयस ? जेवलीस का ?

ती  :  भूक नाहीय आज. खाईन काहीतरी थोडंफार. डोकं भणभण करतंय.

तो : माझं डोकं एकदम व्यवस्थित आहे आता. एखादी फिल्म बघत बसेन.

ती : माझं डोकं दुखतंय म्हणतेय मी. तुझं नाही विचारलं.

ती : दुसऱ्याचं डोकं कमी खावं नं मग.

ती:  तू नं खडूस आहेस. प्रचंड.

तो : शांत झोप आता. उद्या संध्याकाळी सहा. नेहमीचं कॉफी शॉप. बाय.

- कविता ननवरे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 :  मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget