एक्स्प्लोर

घुमक्कडी : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा

हरियाणात कुरुक्षेत्र जिल्ह्यात पहोवा इथं सरस्वतीच्या किनाऱ्यावर एक कार्तिकेयाचं मंदिर आहे. पृथुदक तीर्थ असं पहोवाचं पुराणकालीन नाव.  कार्तिकेय ब्रह्मचारी, त्यामुळे मंदिरात बायकांना प्रवेश नाही, हे माहीत होतंच. तरीही मी त्या मंदिरापर्यंत जाऊन तिथलं बाह्य वातावरण पाहून आले. चैत्रात इथं मोठी जत्रा भरते. घुमक्कडी : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा  कार्तिकेयाबद्दल महाराष्ट्रात विशेष प्रेम नाही, गणपतीसारखं त्याला घरोघरी आणि सार्वजनिकरीत्याही स्थान नाही. ते त्याला तमिळनाडूमध्ये मुरुगनच्या रुपात मिळालेलं आहे. तिथं तो ब्रह्मचारीही नाही. तिथं त्याचं महात्म्य फार मोठं आहे. हा शिवपुत्र स्त्रीचा अंश नसलेला निखळ पुरुष, केवळ पुरुषाचा पुत्र आहे असं म्हणतात; जसा गणपती पुरुषाचा अंश नसलेला केवळ स्त्रीचा, पार्वतीचा पुत्र आहे म्हणतात तसंच. मोर हे त्याचं वाहन. अमरकोशात त्याची भूतेश, भगवत, महासेन, शरजन्मा, षडानन, पार्वतीनन्दन, स्कन्द, सेनानी, अग्निभू, गुह, बाहुलेय, तारकजित्, विशाख, शिखिवाहन, शक्तिश्वर, कुमार, क्रौञ्चदारण ही नावं दिलेली आहेत. स्कंदपुराणात त्याची कथा विस्ताराने येते. तारकासुराचा वध करण्यासाठी देवांना शिवपुत्र हवा होता; म्हणून त्यांनी अग्निदेवाला शिवाकडे पाठवलं. शिवपार्वती कामक्रीडेत मग्न असताना तो पक्ष्याचं रूप घेऊन खिडकीत आला. त्याला पाहून शिव पार्वतीपासून दूर होऊन त्याच्याशी बोलायला निघाला. मात्र तेवढ्यावेळात त्याचा नकळत वीर्यपात झाला. ते वीर्य एका पानात घेऊन अग्नी निघाला, मात्र त्याचे तेज त्याला सहन होईना. त्यामुळे त्याने ते गंगेकडे सोपवलं. त्यामुळे गंगेचं पाणी उकळू लागलं. गंगेने सहन न होऊन ते किनाऱ्यावरील सहा कृत्तिकांना दिलं. ही सहा बालकं त्यांनी पार्वतीच्या हाती दिली, तेव्हा त्यांची मस्तकं कायम राहिली, पण सहा देह एकवटून एकच देह बनला. कृत्तिकांचा पुत्र म्हणून तो कार्तिकेय! घुमक्कडी : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा  ज्या कामासाठी त्याचा जन्म झाला होता, ते म्हणजे तारकासुराचा वध, ते त्याने पूर्णत्वास नेले. क्रौंच पर्वताला बाणाने आरपार छेदून त्यानं तारकासुराला मारलं. घुमक्कडी : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा  पृथ्वीप्रदक्षिणा करायची म्हटल्यावर गणपतीने आईभोवती फेरी मारून शर्यत जिंकली आणि असं बुद्धिचातुर्य नसल्याने कार्तिकेय मात्र निरागस गांभीर्याने अख्ख्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून खूप उशिराने परतला. परतल्यावर आपण हारलो आहोत आणि तेही शारीरिक कृतीमुळे नव्हे, तर बुद्धिचातुर्याने आपल्याला हरवलं गेलं आहे, हे त्याला समजलं. ही गोष्ट लहानपणी ऐकताना गणपतीबाप्पा कित्ती हुशार आणि कार्तिकेय कसला बुद्दू असंही वाटायचं. घुमक्कडी : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा  ब्रह्मचारी तर मारुतीही आहे, पण त्याच्या मंदिरात जातात की बायका, मग कार्तिकेयाला काय एवढा प्रॉब्लेम आहे... असा प्रश्न कुमारवयात डोकावू लागला. स्त्रियांना पाहून ऋषिमुनीच काय, पण देवही चळतात; चळत नाही तो केवळ परमेश्वर... हे समजल्यावर देवांचं लहानपणापासून मेंदूत अपलोड केलेल्या साफ्टवेअरला व्हायरसने उडवून टाकलं. स्त्रीला मार्गातली धोंड समजणं, तिला चित्रातही पाहू नये असं म्हणणं असे विचार त्यामागील इतिहासाचा विचार न करताच खटकू लागले. सगळा दोष चाळवणाऱ्या स्त्रियांचा, चळणाऱ्या पुरुषांची चूक काहीच नसते का? हा प्रश्न त्या वयात रास्तच होता. पुढे मात्र वाचन, अभ्यास वाढत गेला तसा मिथकं, पुराकथांमधली प्रतीकं, धार्मिक इतिहास समजून घेताना मतं बदलली. परमेश्वर, देव, राक्षस, असुर, गंधर्व, अप्सरा हे सारे किती विविध स्वरूपाचे काल्पनिक लोक आहेत आणि या कल्पना कोणत्या काळात, का व कशा विकसित झाल्या असाव्यात हे समजू लागलं.  विद्रोह वयानुसार ओसरून शांतपणा आलाच होता, त्याला अभ्यासाची जोड मिळाली. लोककथा, पुराणकथा, विश्वउत्पत्तीच्या कथा यांचं वाचन वेगळ्या दृष्टीने होऊ लागलं. गोष्टीपलीकडे जाऊन त्यामागील विचार, उपदेश, सार आणि मुख्य म्हणजे तत्त्वज्ञान पाहता येऊ लागलं. त्यात मजा होती. गोष्ट फुलासारखी आकर्षक असते आणि तत्त्वज्ञान मुळासारखं अनाकर्षक, बहुतेकवेळा दडून बसलेलं. कार्तिकेयाची गोष्ट पहोवामध्ये ऐकली, तेव्हा अशीच दृष्टी बदलली. घुमक्कडी : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा  पहोवामधली कार्तिकेयाची मूर्ती त्वचाहीन आहे. कोणतीही स्त्री आपलं रूपसौंदर्य पाहून आपल्याकडे आकर्षित होऊ नये, म्हणून कार्तिकेयाने आपली त्वचा फेडून आईच्या हाती दिली, अशी त्यामागची कथा आहे. कथेच्या एका आवृत्तीत असं म्हटलं आहे की, कोणत्याही स्त्रीकडे पाहिलं की त्याला आईची आठवण होई. तिची आपल्या आईशी तुलना केल्यावर ती अगदीच क्षुद्र वाटू लागे. त्यामुळे कार्तिकेय ब्रह्मचारी राहिला. घुमक्कडी : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा  कथेची दुसरी आवृत्ती मला अधिक रोचक आणि थरारक वाटली. कार्तिकेय हा युद्धखोर देव. देवांचा सेनापती. शक्तीचा अधिदेव. त्याच्या पूजेने विजय तर मिळतोच, खेरीज प्रतिष्ठाही मिळते. समाजात सुव्यवस्था व शिस्त राखली जाते. युद्धं करून करून कार्तिकेय शरीराने अधिक मजबूत बनला, पण मनाने मात्र थकला. एका युद्धानंतर रात्री तो युद्धमैदानावर गेला, तेव्हा मृत सैनिकांच्या विधवाविलापाचं एक विदारक दृश्य त्याच्या नजरेस पडलं. ते पाहून त्याची युद्धविषयक मतं बदलली. आता कोणतीही स्त्री पाहिली की ती त्याला विधवा, कुंकू पुसलेली, श्वेत वस्त्रं परिधान केलेली, आक्रोश करत शिव्याशाप देणारी, असुरक्षित, भयग्रस्त आणि कमालीची दु:खी दिसू लागे. युद्ध टाळणं का गरजेचं आहे, हे त्याला या भ्रमभासांमधून जाणवलं. त्याची युद्धपिपासा शमली, तरीही त्याच्या तनामनाचा दाह मात्र अजूनही शमलेला नाही. त्यात आपली त्वचाही उतरवून त्यानं आईकडे दिली. हा दाह शमावा म्हणून त्याच्या त्वचाहीन देहावर तेलाचा अभिषेक केला जातो आणि जगभरात युद्धात मरण पावलेल्या लोकांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते. घुमक्कडी : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा  कुरुक्षेत्रात महाभारतातल्या शेकडो कथांच्या अनेक आवृत्त्या ऐकायला मिळतात. या कथेच्याही अनेक आवृत्त्या आहेतच. कार्तिकेयाचं दर्शन घेतलं, तर सधवा स्त्रिया विधवा होतील, अशी भीती घालणारी एक कथा आहे. गणपतीला अधिक महत्त्व दिल्याने आईचा राग आल्यामुळे त्याने तिला त्वचा व मांसही उतरवून दिलं अशी अजून एक कथा आहे. स्त्रीबीज लाल आणि पुरुषबीज पांढरं म्हणून हाडं ही वडलांची देण आणि रक्त, मांस, त्वचा ही आईची... अशी एक प्राचीन समजूत आपल्याकडे होती. या मंदिराशी निगडित एक कथा आहे. महाभारत युद्ध संपलं तेव्हा अठरा अक्षौहिणीहून अधिक सैनिक धारातीर्थी पडले. युधिष्ठीर हे पाहून खचून गेला. तेव्हा त्याला कृष्णानं कार्तिकेयाच्या मंदिरात जाण्यास सांगितलं. युधिष्ठीर तिथं जाऊन कार्तिकेयाच्या मूर्तीवर तेलाचा अभिषेक आणि मृताच्या आत्म्यांना शांती मिळावी अशी प्रार्थना करून आला, तेव्हा कुठे स्वत:ला क्षमा करू शकला. इथली अखंड ज्योत युधिष्ठिरानेच चेतवलेली आहे, असं सांगितलं जातं. युद्धखोर लोकांनी, ते अस्तिक असोत वा नास्तिक, एकदा हे मंदिर जरूर पाहावं आणि कथा ऐकून किमान विचार करावा... इतकीच आता प्रार्थना.

घुमक्कडीमधील याआधीचे ब्लॉग :

घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना

घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !

घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!

घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून

घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं

घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!

घुमक्कडी (30) : पलाशधगधगती अग्निफुले

घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट

घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Embed widget