एक्स्प्लोर

RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी

RBI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एमिरेट्स एनबीडीच्या भारतातील शाखा आरबीएल बँकेत विलीन करण्यास मंजुरी दिली आहे. एमिरेटस एनबीडीनं आरबीएल बँकेत मोठी गुंतवणूक केली आहे.

RBI नवी दिल्ली : भारतीय बँकिग क्षेत्रात सध्या मोठ्या घडामोडी सुरु आहेत. केंद्र सरकारनं आयडीबीआय बँकेतील 60 टक्क्यांहून अधिक भागीदारी कॅनडातील फेअरफॅक्स समुहाला विकण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. आता दुबईतील मोठी बँक एमिरेट्स एनबीडीच्या भारतातील शाखा आरबीएल बँकेत विलीन होतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दोन्ही बँकांच्या भारतीय शाखांच्या विलिनीकरणाला मंजुरी दिली आहे. हा निर्णय 1 डिसेंबर 2026 पासून लागू होईल. तेव्हापासून एमिरेट्स एनबीडीच्या भारतातील शाखा आरबीएल बँकेच्या शाखा म्हणून काम करतील.  

दुबईतील एमिरेट्स एनबीडी या बँकेच्या शाखा रत्नाकर बँक लिमिटेड म्हणजेच आरबीएल बँकेत विलीन झाल्यानं काय बदलणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.  

आरबीआयच्या निर्णयानुसार एमिरेटस एनबीडी बँकेच्या भारतातील शाखा आरबीएल बँकेत विलीन होतील, हा निर्णय  1 डिसेंबर 2026 पासून लागू होईल. भारतात एमिरेटस एनबीडीच्या तीन शाखा आहेत. मुंबई, चेन्नई आणि गुरुग्राममध्ये त्या शाखा आहेत. विलिनीकरणानंतर या तीन शाखा आरबीएल बँकेचा भाग म्हणून काम करतील.  

एमिरेटस एनबीडीच्या भारतातील तीन शाखा आता आरबीएलमध्ये विलीन होती. यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे एमिरेटस एनबीडीनं आरबीएलमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. एमिरेटस एनबीडी आरबीएल बँकेतील प्रमुख भागीदार बनली आहे. एमिरेटसनं जून 2026 मध्ये आरबीएल बँकेत 26000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या डीलद्वारे एमिरेटस एनबीडीला आरबीएल बँकेची 60 टक्के भागीदारी मिळाली होती. या डीलची घोषणा ऑक्टोबर 2025 मध्ये झाली होती.  यानंतर नियामक संस्थांकडून मंजुरी मिळवण्यात आली आणि जून 2026 मध्ये गुंतवणूक पूर्ण झाली. आता भारतीय शाखांचं विलिनीकरण हा पुढील टप्पा आहे. या डीलमुळं आरबीएल बँकेला भांडवल मिळणार असून व्यवसाय वाढ देखील करता येईल.  

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

जर तुमचं खातं एमिरेटस एनबीडीच्या भारतातील कोणत्याही शाखेत असेल तर आरबीएल बँकेकडून 1 डिसेंबरपासून जारी करण्यात येणाऱ्या निर्देशांकवर लक्ष ठेवा.  सध्या आरबीआयनं एमिरेटस एनबीडी आणि आरबीएलच्या विलिनीकरणाबाबत जी माहिती दिलीय त्यात ग्राहकांच्या खात्यात, कार्ड, कर्ज आणि इतर बदलांबाबत माहिती देण्यात आलेली नाही. खातेदारांना त्यासाठी बँकेच्या अधिकृत सूचनांची वाट पाहावी लागू शकते.

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित पर्याय, दरमहा फक्त 5000 रुपये जमा करा, 16 लाख रुपये मिळवा, नेमकी काय आहे योजना? 
मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित पर्याय, दरमहा फक्त 5000 रुपये जमा करा, 16 लाख रुपये मिळवा, नेमकी काय आहे योजना? 
Modern Office Setup Cost : 100 कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक ऑफिस उभारायला किती खर्च येतो? फर्निचर, इंटीरियर ते स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंत जाणून घ्या संपूर्ण बजेट
100 कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक ऑफिस उभारायला किती खर्च येतो? फर्निचर, इंटीरियर ते स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंत जाणून घ्या संपूर्ण बजेट
अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री,  पवई पोलिसांची मोठी कारवाई, 4500 लिटर डिझेल जप्त, तीन आरोपींना अटक
अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री,  पवई पोलिसांची मोठी कारवाई, 4500 लिटर डिझेल जप्त, तीन आरोपींना अटक
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
Advertisement

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Embed widget