एक्स्प्लोर

इंग्लंडशी सामना, रोहितसेना विजयाचा षटकार मारणार का ?

IND vs ENG, World Cup 2023 : पाच सामने, पाच विजय, १० गुण. अंगावर शहारे आणणारी, मनाला प्रचंड सुखावणारी आकडेवारी. विश्वचषक क्रिकेटमधील रोहितसेनेच्या दमदार कामगिरीमुळे आपल्याला पाहता येतेय. आता उद्याच्या रविवारी लखनौच्या मैदानात बटलरच्या इंग्लिश आर्मीशी आपल्याला दोन हात करायचेत. गतविजेते असं बिरुद मिरवत या वर्ल्डकपमध्ये उतरलेल्या इंग्लंडला सलामीच्याच लढतीत किवींनी चारीमुंड्या चीत केलं आणि त्या धक्क्यातून ते सावरुच शकले नाहीयेत. बांगलादेशच्या एका मॅचचा अपवाद वगळता बटलरच्या टीमला प्रत्येक संघाने नाक घासायला लावलंय. त्यातला नवख्या अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव त्यांना भळभळत्या जखमेसारखा सलत असणार. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, अफगाणिस्तान, न्यूझीलंड असे पराभवाचे चार धक्के बसल्याने बटलरच्या टीमचा एक पाय मायदेशात परतणाऱ्या विमानात आहे का, अशीही चर्चा सुरु झालीय.

बटलर, स्टोक्स, मलान, बेअरस्टो, रुट ही धडकी भरवणारी बॅटिंग लाईनअप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकलेली नाही. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये त्यांना दोनदा २०० तर एकदा सव्वादोनशेचा स्कोरही पार करता आलेला नाही. यापैकी एकदा त्यांनी २२ तर एकदा ३३.२ षटकंच फलंदाजी केलीय. बटलरच्या कॅप्टन्सीचीदेखील या सामन्यात परीक्षा होणार आहे. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही सामन्यात इंग्लंडचा घात झालेला. त्यामुळे टॉसच्या निर्णयापासून, संघनिवडीपर्यंत त्याची प्रत्येक मूव्ह स्कॅनरखाली असेल हे नक्की. जी बाब फलंदाजांची तीच बाब गोलंदाजांची. इंग्लंडच्या गोलंदाजांविरोधात २८३, २८४ आणि ३९९ अशा धावा लुटण्यात आल्यात. त्यात वेगवान गोलंदाज टोपले स्पर्धेतून दुखापतीमुळे आऊट झालाय. त्यामुळे सुमार कामगिरी, दुखापती, टॉसचे चुकलेले निर्णय अशा संकटांच्या चक्रव्यूहात ते पुरते अडकलेत. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत उद्यासह पुढच्या सर्वच मॅचेसमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासाठी त्यांना बराच घाम गाळावा लागेल.

त्यांच्यासमोर या रविवारच्या मॅचमध्ये स्पर्धेतील सर्वात फॉर्मातला संघ अर्थात आपला भारतीय संघ आहे. सलग पाच वेळा धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या रोहितसेनेने सामन्यागणिक कामगिरी उंचावत नेलीय. किवींविरुद्धच्या सामन्यात काही क्षण काळजाचा ठोका चुकवणारे आले होते. पण, मिस्टर कॉन्फिडंट विराट कोहलीने जडेजाच्या साथीने जिंकून दिलं आणि आपलं वाढलेलं ब्लडप्रेशर नॉर्मलला आणलं. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या खेळाच्या तिन्ही आघाड्यांवर रोहितसेना सरस कामगिरी बजावताना दिसतेय. असं असलं तरी क्रिकेटमध्ये खास करुन वनडे क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट गृहित धरता येत नाही. त्यातही यंदा अफगाणिस्तानने इंग्लंडविरुद्ध आणि नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळवलेल्या विजयाने वनडे क्रिकेट हे अनप्रेडिक्टेबल आहे, हे आपण पाहिलंय. त्यामुळे इंग्लंड संघाला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही हे निश्चित. त्यातही स्पर्धेतल्या अस्तित्त्वाचा प्रश्न असल्याने बटलरच्या टीमकडून कडव्या प्रतिकाराची अपेक्षा आपण ठेवायला हरकत नाही. फक्त आपला फॉर्म आणि आपला खेळ ज्या उंचीवर या स्पर्धेत पाहायला मिळतोय, तसाच जर झाला, तर विजयाचा षटकार उद्या आपण मारु शकू. भारताची आघाडीची फळी जबरदस्त फॉर्मात आहे. रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये सेट होऊनच मैदानात येतोय आणि आक्रमक बाण्यात खेळतोय. षटकारांचा पाऊस पाडतोय. विशेषत: ज्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी त्याला याआधी त्रास दिलाय. त्यांना तो आता त्रास देतोय.  गिलनेही डेंग्यूतून सावरत आपला टच दाखवलाय तसाच राहुलनेही उपयुक्त खेळी करत आपला क्लास दाखवून दिलाय. श्रेयस अय्यरने मात्र मिळालेल्या संधीचं सोनंच करायला हवं. गेल्या वेळी म्हटल्याप्रमाणे मागे ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल अगदी स्पर्धक फलंदाज म्हणून पाहायचं झाल्यास सूर्यकुमार यादवही वेटिंग लिस्टवर आहे. त्यामुळे सेट झाल्यावर नाहक विकेट फेकणं म्हणजे संघातलं आपलं भक्कम होत चाललेलं स्थान धोक्यात आणल्यासारखं होईल. इथे द विराट कोहलीबद्दलही बोलावंच लागेल. तो सध्या हात लावीन तिथे धावा काढीन अशा फॉर्मात आहे. म्हणजे वैयक्तिक २० धावा पार केल्यावर शतकाचा उंबरा त्याला खुणावतोय. सफाईने खेळत एकेरी-दुहेरी धावांची पेरणी करत तो मध्येच चौकार, षटकारांचं पीकही तो लीलया घेतोय. असं असलं तरी प्रत्येक वेळी मॅच फिनिश करण्याची जबाबदारी अन्य फलंदाजांनी त्याच्यावर टाकू नये. इतर फलंदाजांनाही ती जबाबदारी घ्यावी लागेल.

प्रत्येक गोलंदाज विकेट टेकिंग फॉर्ममध्ये आहे. जी गोष्ट सलामीच्या फलंदाजांची तीच सलामीच्या गोलंदाजांची. बुमराने दुखापतीनंतर केलेला कमबॅक कमाल आहे. त्याची लाईन अँड लेंथ, त्याचं व्हेरिएशन केवळ अफलातून. सिराजही त्याच्या सावलीत मोठा होतोय. तर, किवींविरोधात या स्पर्धेतील पहिली मॅच खेळणाऱ्या शमीने थेट मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा परफॉर्मन्स देत संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी चांगल्या अर्थी वाढवलीय.  जडेजा, कुलदीपच्या फिरकीने गिरकी दिलीय. इथल्या खेळपट्टीचा विचार करता कदाचित अश्विनला अकरामध्ये स्थान मिळाल्यास बहुदा सिराजला संघाबाहेर राहावं लागू शकतं. एकूणच काय एक संघ सेमी फायनलची जागा पक्की करण्यासाठी आणि एक संघ स्पर्धेतली जागा राखण्यासाठी उद्या मैदानात उतरतोय. लढाई रंजक ठरेल आणि रोहितसेना विजयाचा षटकार मारेल अशी अपेक्षा करुया.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
Wardha Crime News : अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
Karan Johar Koffee With Karan : करण जोहरनं 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या सिझनमधून घेतला ब्रेक; निर्णय घेताना केला सनसनाटी खुलासा!
करण जोहरनं 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या सिझनमधून घेतला ब्रेक; निर्णय घेताना केला सनसनाटी खुलासा!
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Om Birla Elected as Speaker : आवाजी पद्धतीने मतदानात ओम बिर्लांचा विजयABP Majha Headlines : 05 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPravin Darekar On Amol Mitkari : अमोल मिटकरी यांच्या तोंडाला लगाम घालण्याची गरज; दरेकर यांची टीकाRahul Gandhi In Pandharpur Wari : 13 किंवा 14 जुलैला राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची शक्यता

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
Wardha Crime News : अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
Karan Johar Koffee With Karan : करण जोहरनं 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या सिझनमधून घेतला ब्रेक; निर्णय घेताना केला सनसनाटी खुलासा!
करण जोहरनं 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या सिझनमधून घेतला ब्रेक; निर्णय घेताना केला सनसनाटी खुलासा!
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंची बदली; 'हे' आहेत नवे कलेक्टर
निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंची बदली; 'हे' आहेत नवे कलेक्टर
Nana Patekar On Manisha Koirala : नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला, आता साहेबांचा नंबर, टीम इंडिया इंग्लंडचा हिशेब चुकता करण्यास सज्ज! 
ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला, आता साहेबांचा नंबर, टीम इंडिया इंग्लंडचा हिशेब चुकता करण्यास सज्ज! 
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
Embed widget