एक्स्प्लोर

BLOG : फुटबॉल विश्वचषकातला ‘M’ फॅक्टर

फुटबॉलच्या महामेळ्याची भैरवी रविवारी अवघ्या जगाने अनुभवली. लिजंड मेसी (Lionel Messi) आणि प्रतिभावान युवा खेळाडू एम्बापे (Kylian Mbappe) या दोन कलाकारांच्या अदाकारीने ही संस्मरणीय मैफल अवघ्या फुटबॉल रसिकांच्या हृदयात दीर्घकाळ घर करुन राहील. खरं तर अर्जेंटिना (Argentina) आणि फ्रान्स (France) हे दोन्ही संघ तिसऱ्या विश्वचषकाच्या (FIFA Worldcup) शोधात होते. या फायनलच्या पहिली जवळपास 80 मिनिटे अर्जेंटिनाचा एक हात चषकाच्या बाजूला पोहोचला होता. त्याच वेळी एम्बापे नावाच्या वादळ धडकलं आणि पुढच्या दोन मिनिटांमध्ये दोन गोल करत डागत फ्रान्सच्या आव्हानातली धुगधुगी कायम ठेवली. पुढे अतिरिक्त वेळेतही एकेक गोल केल्यावर सामना पेनल्टी शूटआऊटवर गेला. जिथे दोन्ही संघ सर्वस्व पणाला लावून हल्लाबोल करणार हे निश्चित होतं. तेव्हा मार्टिनेझ नावाची अर्जेंटिनाची अभेद्य तटबंदी गोलपोस्टच्या बाजूला उभी राहिली, जिने फ्रेंच आक्रमण निष्प्रभ ठरवलं. फायनलमधील खेळ पाहिल्यावर हा सामना फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना असा होण्याऐवजी एम्बापे विरुद्ध अर्जेंटिना असा झाला, असंही म्हणता येईल.

अर्थात सामन्यावर छाप राहिली ती अर्जेंटिनाच्या दोन 'M'ची. हे दोन M म्हणजे मेसी आणि गोलकीपर मार्टिनेझ (Emiliano Martinez). या दोघांनीही संघाचं 1986 पासून अधुरं राहिलेलं विश्वचषक विजयाचं स्वप्न साकार केलं. त्यात मेसीसाठी आणखी सुखावणारी बाब म्हणजे कारकीर्दीच्या अखेरच्या वर्ल्डकप सामन्यात (जे त्यानेच जाहीरही केलं होतं) त्याच्या सोनेरी कामगिरीला विजेतेपदाचं तोरण बांधलं गेलं. याबाबतीत सचिन तेंडुलकर आणि मेसीची कारकीर्द कनेक्ट करता येईल. सचिनही कारकीर्दीत 1989 ला पदार्पण केल्यानंतर पाच वर्ल्डकप खेळून त्याला सहाव्या म्हणजे 2011 च्या विश्वचषकामध्ये  विश्वविजयाची चव चाखता आली. तर, मेसीलाही त्याच्या पाचव्या विश्वचषक स्पर्धेत खेळताना त्याला ती झळाळती ट्रॉफी हाती घेता आली. लिजंडरी मेसीसाठी जगभरात असणारं फॉलोईंग या निमित्ताने समोर आलं.

अर्जेंटिनाच्या वर्ल्डकप मोहिमेत गोलरक्षक मार्टिनेझनेही मोलाचा वाटा उचलला. खास करुन नॉकआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना एक्स्ट्रा टाईममध्ये जाणार असं वाटत असतानाच त्याने अखेरच्या क्षणी अफलातून सेव्ह करत बाजी मारली. नेदरलँड्सच्या मॅचमध्यील पेनल्टी शूटआऊटमध्येही त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवलं. तर, सर्वात मोठ्या प्रेशर मॅचमध्ये अर्थात मेगाफायनलमध्ये त्याने दोन पेनल्टी सेव्ह करत विश्वचषकाभोवतीची पकड घट्ट केली. या सामन्यानंतर त्याच्या मनाच्या मोठेपणाचं दर्शनही घडलं. तीन गोल करुन सामना गाजवणारा एम्बापे उपविजेता ठरल्यानंतर साहजिकच त्याचं हसू मावळलं होतं. यावेळी ज्येष्ठ खेळाडूच्या नात्याने मार्टिनेझ त्याच्या जवळ गेला, त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला. त्याला चीअर केलं आणि रवाना झाला. मोठा खेळाडू असणं आणि माणूस म्हणून मोठेपण दिसणं या दोन्हीचं दर्शन या सामन्याने घडवलं. अर्जेंटिनाने विश्वविजयाचा सुवर्णक्षण अनुभवला असला तरी फ्रान्सच्या परफॉर्मन्सबद्दलही पाठ थोपटावीच लागेल. या दोन्ही संघांना स्पर्धेत सुरुवातीच्या फेऱीत एकेक धक्का बसला होता. अर्जेंटिनाला सौदी अरेबियाकडून तर फ्रान्सला ट्युनिशियाकडून पराभवाची किक लागली होती. ती मागे सारत दोघांनाही आपापला खेळ सामन्यागणिक उंचावत नेत टॉप टूमध्ये स्थान मिळवलं. मेसीच्या खेळातल्या सफाईने जर आपल्याला मोहित केलं असेल तर एम्बापेचा थक्क करणारा वेग, मैदानातलं त्याचं श्वास रोखून धरायला लावणारं फूटवर्क, त्यातच चेंडूचा ताबा मिळवून गोलपोस्टमध्ये धाडण्याचं त्याचं कसब, ही सारी त्याची बलस्थानं आहेत.

या वर्ल्डकपमधील तिसरा M हा मोरोक्कोचा. हे वर्ल्डकपमधलं सरप्राईज पॅकेज होतं. चौथ्या स्थानावर राहिलेल्या मोरोक्कोने कुणाच्याही ध्यानीमनी नसताना तिथवर मजल मारली. जेव्हा फायनल फोरमध्ये हा संघ आला, तेव्हा या मोरोक्कोबद्दल गुगल सर्च केलं, तेव्हा काही गोष्टी समोर आल्या. साधारण साडेतीन कोटींचा हा देश. इथल्या खेळाडूंच्या सिलेक्शनबद्दल एक अत्यंत इंटरेस्टिंग माहिती वाचनात आली. या संघातल्या 26 पैकी 14 खेळाडूंचा जन्म देशाबाहेरचा आहे. मोरोक्कोतून अनेक कामगार युरोपमध्ये कामासाठी स्थलांतर करतात. कामानिमित्ताने तिथे स्थायिक मुलांचा जन्म त्या त्या देशातला असतो. जगात फुटबॉलसाठी पोषक वातावरण जर कुठे असेल तर ते युरोपमध्ये. युरोपमधल्या फुटबॉल संस्कृतीत त्यांच्या गुणवत्तेच्या बीजाला पोषक सुविधांचं पाणी घातलं जातं, तिथे स्पर्धा अधिक तगडी असल्याने या गुणवत्तावान खेळाडूंना संघात स्थान मिळणार नाही, हे नक्की झाल्यावर मग मोरोक्कोकडून खेळण्याचा प्रस्ताव हे खेळाडू हसत हसत स्वीकारतात आणि तिथेच मग यशाची फळं देणारा मोरोक्को संघाच्या रुपातला वृक्ष उभा राहतो. बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, स्पेनमध्ये जन्मलेल्या प्रतिभेला मोरोक्को हेरत असतं.

बेल्जियम, स्पेन आणि पोर्तुगाल या दादा संघांना मोरोक्कोसारख्या तुलनेने नवख्या संघाने अस्मान दाखवलं. एखाद्या आफ्रिकन देशाने फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम चार संघांमध्ये मजल मारण्याची ही पहिलीच वेळ होती. मोरोक्कोच्या एका चाहत्याची प्रतिक्रिया फारच बोलकी होती. तो म्हणाला, आमच्या संघातील खेळाडूंनी जे करुन दाखवलंय, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आता इतिहासाच्या पानात आमचीही नोंद सुवर्णाक्षरांनी केली जाईल. म्हणजेच विजेतेपदाचा मुकूट न मिळवताही मोठी भरारी घेण्याचा तुरा या खेळाडूंनी आपल्या शिरपेचात खोवलाय, असंच या चाहत्याला म्हणायचं होतं.

जगात 100हून अधिक देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या फुटबॉलने गेले काही दिवस चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं होतं. कतारसारख्या देशाने यजमानपदही उत्तम भूषवलं. डीसमँटल होणारी स्टेडियम बनवण्यापासून ते फुटबॉल व्हिलेजसारखी नगरी वसवत त्यांनी उत्तम आयोजनाचा वस्तुपाठही घालून दिला. आतापर्यंतचा सर्वात खर्चिक फुटबॉल विश्वचषक आता मनाच्या मैदानावर रुंजी घालतच राहील. त्याची किक फुटबॉल चाहत्यांना आयुष्यभर वेडावत राहील.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget