एक्स्प्लोर

भारतीय क्रिकेटचा जेम्स बॉण्ड - धोनी

धोनी – द अनटोल्ड स्टोरी मध्ये मला 3 सीन खूप महत्त्वाचे वाटले. त्यातले दोन सीन मला जास्त आवडले. दोन्ही प्रसंगात एकही डायलॉग नाही. तिसरा प्रसंगही भारी जमलाय त्यात 1 डायलॉग आहे. पहिला प्रसंग म्हणजे धोनी शाळेत असतानाचा किस्सा आहे. मॉर्निंग शिफ्ट असूनही त्याच्या वडिलांना रात्री अकराला उठावं लागतं, ग्राऊंडवर लॉनला पाणी देण्याची जबाबदारी असते, ते घराबाहेर पडतात. ‘मही’ धोनी जागाच असतो. वडील घराबाहेर पडले की तो हळूच उठतो, गॅलरीत जातो, त्या थंडीत वडील काम करताना/ लॉनला पाणी देताना तो शांतपणे बघत असतो. आपण प्रत्येकाने कधी ना कधी आपल्या वडिलांना असं ‘आपल्यासाठी’ काहीतरी करताना पाहिलंय, त्या सीनसोबत आपण रिलेट करतो, म्हणूनच कदाचित त्या लहानग्या महिच्या मनात काय चाललंय याचा आपण अंदाज लावू शकतो. भारतीय क्रिकेटचा जेम्स बॉण्ड - धोनी दुसरा प्रसंग बहुतेक खरगपूरच्या फलाटावरचा आहे. ‘मही’ आपलं मन मारत 4 वर्ष रेल्वेत काम करतोय, करिअर आणि आयुष्य प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 3 मध्ये चकरा मारतंय, स्वप्न आणि सत्य यातला फरक लक्षात आलाय.. सोबतचे आणि मागून आलेले पुढे गेलेत. गाडी मिस झाल्याची भावना आहे. निराशा, फ्रस्ट्रेशन आहे. पण अजूनही आशा सोडलेली नाहीय, विचारात गुरफटलेल्या महिच्या चेहऱ्याचे वेगवेगळ्या अँगलने फक्त क्लोजप्स दिसतात. आपल्या प्रत्येकाच्या किंवा बहुतांशांच्या आयुष्यात असे प्रसंगही आलेत/येतात, त्यामुळेच कदाचित महीच्या मनात काय चाललंय याचा अंदाज आपण लावू शकतो. भारतीय क्रिकेटचा जेम्स बॉण्ड - धोनीआपण ज्याला माही म्हणतो तो खरं तर ‘मही’ आहे हे मला हा सिनेमा बघताना कळलं, तशाच महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यातल्या आणखी काही गोष्टीही. लहानपणी धोनीचं पहिलं प्रेम फुटबॉल, गोलकिपींगचा भारी शौक त्यानंतर टेनिस, बॅडमिंटनचा नंबर, क्रिकेट तर दूरवर कुठेच नाही, ‘छोटे बॉलसे कौन खेलेगा’ हे त्यामागचं साधं सोपं कारण. शाळेतल्या शिक्षकांमुळे हातातले गोलकिपरचे ग्लोव्ह्ज कसे जातात आणि विकेटकिपरचे ग्लोव्ह्ज कधी येतात ते त्यालाही कळत नाही. भारतीय क्रिकेटचा जेम्स बॉण्ड - धोनीअंडर-19 कूचबिहार क्रिकेट चषकाची फायनल मॅच अनेक अर्थाने धोनीसाठी महत्वाची. चांगलं खेळून निवड समितीचं लक्ष वेधायची संधी, पुढच्या कारकिर्दीची चावी, नेमक्या याच सामन्यात त्याचा सामना युवराज सिंह सोबत होतो, या सामन्याचा किस्सा खूप मस्त आहे. सिनेमात धोनीच्या तोंडूनच ऐकण्यात मजा आहे. या खेळीमुळे वर्षभरात युवराजला भारतीय संघातही संधी मिळते. धोनी मात्र मागे फेकला जातो, तिथून पुढे यायला त्याला तब्बल 4 वर्ष वाट पाहावी लागते. Dhoni & Yuvraj Singh match 1Dhoni & Yuvraj Singh match याकाळात युवराज, मोहम्मद कैफ, गौतम गंभीर, झहीर खान, दिनेश कार्तिक, संजय बांगर अशा तब्बल 30 खेळाडूंना भारताकडून खेळायची संधी मिळाली होती. धोनी मात्र दूर कुठेतरी विनातिकीट प्रवास करणारे प्रवाशाकडून दंड वसूल करण्याचं काम करत होता. प्रचंड टॅलेंट असूनही संधी न मिळाल्याने होणारी घुसमट सहन करत होता, खरंतर कुणीही खचून जावं अशी ही परिस्थिती. चार वर्षाचा वनवास खरंतर अज्ञातवासच. पण या 4 वर्षानेच धोनीला अनेक गोष्टी शिकवल्या, त्यातली महत्वाची म्हणजे आता धोनीमुळे प्रसिद्ध झालेला हेलिकॉप्टर शॉट. संतोष हा महिचा मित्र हा शॉट भारी खेळायचा, त्याला थप्पड शॉट म्हणायचा, गल्ली क्रिकेट खेळताना समोस्याच्या बदल्यात त्याने हा शॉट धोनीला शिकवला. धोनीला वेळोवेळी साथ देणारं कुटुंब, शिक्षक, रेल्वेचे अधिकारी आणि मित्र परिवार मोजक्या सीनमधून आपल्याला बऱ्यापैकी कळतो. भारतीय क्रिकेटचा जेम्स बॉण्ड - धोनीमला आवडलेला तिसरा प्रसंग अर्थात ओपनिंग सीन, सगळ्यांना माहितीय 2011 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धोनी वर खेळायला आला, तोवर बॅटिंगमध्ये तो फार काही करु शकला नव्हता. त्यामुळे 275 चं टार्गेट आणि 114 वर 3 अशी अवस्था असताना, धोनीचं वर येणं थोडं रिस्की होतं. या आधीचे काही क्षण या सीनमध्ये दाखवलेत, हा सीन खास नीरज पांडेच्या स्टाईलनं आल्यामुळे जास्त प्रभावी वाटला, आवडला. पाकिस्तानच्या दुकानातून धोनी त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडला फोन करतो, बोलणं संपवतो. दुकानाबाहेर आल्यावर काही क्षण घुटमळतो, आत विचार सुरुच असतात. त्या घुटमळण्याच्या गिल्टचा प्रभाव पुढे मैदानावरील आणि वैयक्तिक आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगात तुम्ही नकळत शोधू लागता.. इंटरवलपर्यंतचा म्हणजे ‘मही’ने गाडी पकडेपर्यंतचा प्रवास जास्त भिडला. यातल्या त्रुटींसहित संपूर्ण 3 तास 5 मिनिटांचा सिनेमा मी एन्जॉय केला. सुशांतसिंह राजपुतने त्याला दिलेलं काम चोख पार पाडलंय, नीरज पांडे माझ्या आवडत्या दिग्दर्शकांच्या यादीत आहे, तो निराश करत नाही. जेम्स बॉन्ड जेम्स बॉन्ड का आहे? वरवर शांत, थंड, निर्विकार, तुटक, स्थितप्रज्ञ वागण्याच्या तळाशी काय आहे, हे कसिनो रोयालमधे आपल्याला थोडफार कळतं, धोनी – द अनटोल्ड स्टोरी क्रिकेटच्या मैदानावरच्या आपल्या या जेम्स बॉन्डबद्दल अगदी पुसटशी कल्पना देऊन जातो,  धोनीचा पार्ट टू सुद्धा भारी बनू शकतो. संंबंधित बातमी

धोनीला हेलिकॉप्टर शॉट शिकवणाऱ्या संतोषच्या मृत्यूची दुर्दैवी कहाणी

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget