एक्स्प्लोर

BLOG : पालक व्हा, मालक नाही.....

मुलांनी कसे वागावे किंवा असे करु नये असे पालक सांगतात खरे, पण त्यामागची कारणे सांगणे त्यांना तितके महत्वाचे वाटत नाही. मुलांविषयींचे निर्णय, त्यांना काय हवंय किंवा नकोय ह्याचा विचार न करताच घेतले जातात. बरं, आता हे सगळं पालक मुद्दाम करत नाहीत. आपल्या मुलांच सगळं चांगलं व्हावं हाच त्या मागचा हेतू असतो. पण अशा बारिक-सारिक गोष्टी त्यांच्याकडून नकळतपणे घडून जातात आणि मुलं नेमकं तेच मनात टिपून धरतात.

दोन उदाहरणांनी सुरुवात करते. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे ही दोन मुले आली. गोपनीयतेचे नियम लक्षात घेता, मुलांची नावे बदलली आहेत. रोज खाली खेळायला जातांना  नववीतल्या नीरजला हेच ऐकून जावे लागत असे, "नीरज! 7 च्या आत घरी यायचे लक्षात ठेव! नाही आलास तर बघ!". कधीतरी नीरजने, "पण बाबा असं का?" असे विचारले की तेच उत्तर येत असे, "मी सांगतो म्हणून. मी तुझा बाबा आहे आणि म्हणून तू माझे ऐकलेच पाहिजेस!" मनीषा यंदा आठवीत आहे. शाळा झाली की ट्युशनला जाते ती थेट संध्याकाळीच घरी येते. बऱ्याच वेळा आई आणि ती एकत्र घरी येतात. संध्याकाळचा चहा बिस्कीट खाताना मनीषा तिचा आवडता कार्यक्रम बघायला सुरवात करताच आईचा आतून आवाज येतो, "मने! आवर पटपट आणि जा आता अभ्यासाला! पुरे झालं टी. व्ही. ला चिकटणं! आता गेलीस की थेट जेवायला बाहेर ये!". ही दोन उदाहरणं मला प्रामुख्याने आठवतात कारण, दोन्ही गोष्टींचा सारांश एकच आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर, ह्या दोन्ही मुलांशी वेगवेगळं बोलताना कळलं की दोघांचीही एकच तक्रार होती, ती म्हणजे, "आई बाबा सतत हे कर, ते कर, किंवा हे करु नकोस, ते करु नकोस! असेच सांगत असतात. आपण 'का?' असे विचारले की आणखी चिडतात". मनीषा तर एकदम भडाभडाच बोलू लागली, "मला तर कधी कधी घरी यावंसंच वाटत नाही, असं वाटतं  शाळेतंच बसावं. कारण तिथे छान हसता येतं, खेळता येतं, घरी असं काहीच नसतं. मनासारखं काहीच करता येत नाही. आता का टी. व्ही. लावलास? किती वेळ बघणारेस? आज उशीर का झाला? असे सारखे प्रश्नच असतात. जेवायला बसल्यावर देखील अर्धे पोट प्रश्नांनीच भरेल की काय असे वाटते". तिचं हे एवढं सगळं बोलणं ऐकल्यावर मनात अनेक विचार आले. ‘मास्टर्स इन काउन्सेलिंग सायकॉलॉजी’ च्या शेवटच्या वर्षात केलेला ‘रिसर्च’ आठवला. ‘पालकत्वाच्या विविध शैली’ आणि त्यांचा मुलांवर होणार परिणाम यावर मी अभ्यास केला होता.  त्यातलेच ‘अथॉरिटेरियन’ म्हणजेच ‘सत्तावादी पालकत्व’ आठवले. ‘सत्तावादी’ - नावातंच किती वजन! तर, ह्या शैली मध्ये पालक मुलांवर त्यांचा अफाट हक्क गाजवतात. "मी सांगतोय/ सांगतेय तसेच झाले पाहिजे". "इतक्या वेळा बजावलं तरी केलीसच ना चूक!" मुलांनी कसे वागावे किंवा असे करु नये असे पालक सांगतात खरे, पण त्यामागची कारणे सांगणे त्यांना तितके महत्वाचे वाटत नाही. मुलांविषयींचे निर्णय, त्यांना काय हवंय किंवा नकोय ह्याचा विचार न करताच घेतले जातात. बरं, आता हे सगळं पालक मुद्दाम करत नाहीत. आपल्या मुलांच सगळं चांगलं व्हावं हाच त्या मागचा हेतू असतो. पण अशा बारिक-सारिक गोष्टी त्यांच्याकडून नकळतपणे घडून जातात आणि मुलं नेमकं तेच मनात टिपून धरतात. मनीषाशी पुढे बोलताना ती पटकन बोलून गेली, " माझे तर काही महत्त्वंच राहिले नाही असे वाटते!" आता तिला असे काही वाटू शकेल ह्याचा कणभर देखील विचार तिच्या आई बाबांच्या मनात आला नसेल. या सगळ्याचा मुलांच्या मनावर अगदी खोलवर परिणाम होतो, आणि सर्वाधिक परिणाम होतो तो त्यांच्या आत्मविश्वासावर. स्वतः संबंधित सगळेच निर्णय आई वडिल घेत असल्यामुळे मुलांना निर्णय घेण्याची सवयच नसते. पुढे जाऊन तशीच वेळ आली तर ही मुलं पेचात पडतात. 'हे आपल्याने होणारंच नाही' हेच डोक्यात ठेवून ती मागे हटतात. "हे मला नाही जमणार", " हे सर्व खूप कठीण आहे" असे म्हणत मुले पुढे सरसावतच नाहीत. आणि एकदा का हा आत्मविश्वास ढासळला की संपतच ना हो सगळं! हा कमी होत चाललेला आत्मविश्वास इतर गोष्टींमध्ये देखील दिसून येतो. आपले आई बाबाच आपल्यावर सतत रागावतात म्हणजे नक्की आपणच चांगले नाही हा विचार त्यांच्या मनात अधिक घट्ट होत जातो. मग ही मुले लोकांशी संवाद टाळतात, एकटच राहणं सोयीचं मानतात, चिडचिड करू लागतात, स्वतःच स्वतःला कमी लेखतात, घरी देखील मिसळत नाहीत, इत्यादी. आपण इतरांपेक्षा कुठेतरी कमी आहोत हे त्यांच्या डोक्यात इतक ‘फिट्ट’ बसलं असतं की त्यातून त्यांना बाहेर येणं कठीण जातं. आणि या सगळ्याचा परिणाम होतो तो त्यांच्या सर्वांगीण विकासावर. या सगळ्यात त्यांच्या मनातील हा 'कॉन्फ्लिक्ट' दूर करणारी एखादी मोठी व्यक्ती असेल तर उत्तमच! नाहीतर हे सगळे 'कॉन्फ्लिक्टस' आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपले डोके वर करु पाहतात. आणि मग प्रत्येक वेळी "मला हे जमेल का?" की "मला हे जमणारच नाही" अशा 'सेल्फ डाउट' मध्ये ते अडकतात. बरं, हे प्रत्येक मुलाबरोबर होईलच असे नाही, पण होणारच नाही असेही नाही. हे सगळं टाळण्यासाठी पालक म्हणून आपण काही पाऊले उचलणं अत्यंत गरजेचे आहे. ती म्हणजे:
  1. मुलांकरिता वेळ काढणं: आई वडिलांचा वेळ हा मुलांकरिता फार मोलाचा असतो. "कसा गेला आजचा दिवस?" ह्या एका प्रश्नानेच छानसा संवाद सुरु होऊ शकतो. पण कुठून आणायचा हा वेळ? तर, एकत्र जेवताना, बाहेर जाताना, चहा घेताना हा वेळ नक्कीच मिळू शकतो, नाही का?
 
  1. मुलांचा आदर करणं:आपल्या संस्कृतीत आदर हा फक्त वयाकडे बघूनच येतो. आदर होतो तो फक्त मोठ्यांचाच, लहान मुलांचा आदर करणे आपल्याला तितके महत्वाचे वाटत नाही. आता लहान मुलांचा आदर करायचा म्हणजे नेमक काय करायचं? तर, पालकांनी त्यांच्या मुलांची मते ऐकून घ्यावीत, त्यांना समजून घ्यावे. त्यातूनच एकमेकांमधील विश्वास अधिकाधिक मजबूत होतो.
 
  1. कौतुक करणं:आपलं कौतुक झालेलं कोणाला नाही आवडणार? आणि मुलांना तर ते हवच असतं. आपले आई वडिल आपलं कौतुक करतात, आपल्याला शाबासकी देतात ह्यातून त्यांना फार आनंद मिळतो. इतकच नाही, ह्यातून त्यांचा आत्मविश्वास देखील वाढू लागतो.
 
  1. भावनांवर ताबा ठेवणं:आपलं मूल चुकलंय हे कळताच पालक एकदम रागावतात. अशावेळी आपल्या चिडण्यावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे असते.
 
  1. मुलांच्या भावनांचा विचार करणं:मुलं जशी मोठी होतात, तशा त्यांच्या भावभावनांमध्ये कमालीचा बदल होत असतो. अशावेळी पालकांनी हा बदल लक्षात घेणे फार गरजेचे असते. आपले पालक आपल्याला समजून घेतात याची मुलांना खात्री पटणे महत्वाचे असते.
  तसं बघायला गेलं तर, ह्या फार छोट्या गोष्टी आहेत. पण, पालक म्हणून आपण जर ह्या गोष्टी पाळल्या तर आपल्या मुलांबरोबरचे आपले नाते अधिकाधिक घट्ट होऊ शकते. पालक म्हणजे : पा - पाठीशी न घालणारे पण पाठीशी उभे असलेले ल - लाडावून न ठेवणारे पण लाड करणारे क - कौतुकात न बुडवणारे पण कौतुक करणारे ह्या गोष्टींचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे कारण पालक म्हणून विचारांची परिपक्वता आपल्यातच आहे, नाही का? चला तर मग, ह्या सुंदर नात्याला आज नव्याने सुरुवात करूया!
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
ABP Premium

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget