एक्स्प्लोर

जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट

मनाची पूर्ण तयारी करुन ‘ताज’ मधल्या मसाला क्राफ्टमध्ये शिरायचा निर्णय झाला, संपूर्ण ताज महाल हॉटेलमध्ये एखाद्या सुशोभित राजवाड्यालाही लाजवेल अशी सुंदर सजावट आहे, अगदी तशीच सजावट मसाला क्राफ्टमध्येही डोळ्याचं पारणं फेडते..

जिंदगी मे एक बार...असं म्हणत आजकाल या आयुष्यात करायलाच पाहीजे अशा गोष्टींची एक विश लिस्ट किंवा इच्छांची यादी तयार करण्याची पद्धत आलीय नविन.. एखादा परदेशातला किंवा देशातला प्रदेश बघणं असो किंवा आपल्या मनातल्या भीतीवर मात करत एखादं धाडस करणं असो किंवा एखादी खर्चिक लक्झरी मिळवणं असो आपल्या त्या विशलिस्टमध्ये यातलं काहीही असू शकतं..त्यातही प्रत्येक मध्यमवर्गीय आणि त्यातही मराठी मध्यमवर्गीय लोकांच्या अशा विशलिस्टमध्ये अगदी हमखास असणारी इच्छा म्हणजे पंचतारांकित हॉटेलात राहणं किंवा किमान पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण...या पंचतारांकित हॉटेलांच्या यादीतही प्रत्येकांची मनोमन इच्छा असते ते ‘ताज’ च्या कुठल्यातरी एका पंचतारांकित प्रॉपर्टीला भेट देण्याची आणि तुम्ही मुंबईत रहाणारे पक्के मुंबईकर असा किंवा देशाच्या इतर कुठल्याही कोपर्यात रहात असले तरी कुलाब्याला गेट वे ऑफ इंडियाच्या बरोब्बर समोर ऐटीत उभं असलेलं ‘ताज पॅलेस’ नावाचं हॉटेल प्रत्येकाला खुणावतं एवढं मात्र नक्की.. जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट श्रीमंती आणि लक्झरीचं प्रतिक असलेलं हे ताज पॅलेस हॉटेल जेव्हा २६-११ च्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात उद्धवस्त झालं तेव्हा तिथे जाऊन आतून त्या ताजचं सौंदर्य पाहिलेल्यांबरोबरच केवळ बाहेरुन ताज बघून कधीतरी आतून हे बघायचं अशी इच्छा करणारी मंनही आतून दुखली होती..असं हे आग्र्याच्या ताजमहालाइतकं महत्त्वाचं ठिकाण आमच्याही विशलिस्टमध्ये वरच्या क्रमांकावर होतं...खरं तर मुंबईत इतकी पंचतारांकित हॉटेल्स आहेत आणि किमान तिथे जाऊन जेवणाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी संडे ब्रंच किंवा रात्रीचा फिक्स किमतीच्या डिनर बुफेचा पर्यायही ही पंचतारांकित हॉटेल्स देतात त्यामुळे आयटीसी, ओबेरॉय, ट्रायडन्ट, मॅरियट अशा कुठल्यातरी पंचतारांकित हॉटेलात जाऊन अशा हॉटेल्सची आतून सजावट, बैठक व्यवस्था पाहण्याची संधी आपल्याला मिळतेच..फिक्स बुफे असला तरी नामवंत शेफ्सने तयार केलेला मेन्यू, तसंच सर्वात चांगला कच्चा माल  वापरुन केलेले पदार्थ चाखायचे तेही पंचतारांकित डेकोरेशनच्या साथीने हा अनुभवही सुखावणारा असतो..पण असं सगळं असतानाही आणि पंचतारांकित हटेलांचेही हवे तेवढे पर्याय असूनही ‘ताज’ या नावाची क्रेझ काही वेगळीच आहे. आधी तर ‘ताज’ या नावाचं दडपण त्याबरोबरच २६-११ च्या हल्ल्यानंतर ताज च्या आसपासचा परिसर आणि ताज च्या बाहेर कायम दिसणारं पोलिस सुरक्षेचं कवच यामुळे ताजमध्ये प्रवेश करताना मध्यमवर्गियांना पुन्हा पुन्हा विचार करावा लागला तर आश्चर्य वाटायला नको.. जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट आपला सगळा संकोच ताज च्या नावाचं दडपण या सगळ्याला मागे टाकून आपण ताज मध्ये प्रवेश केल्यावर अगदी लॉबीपासूनच ताजचं ‘रॉयल सौंदर्य’ आपलं लक्ष वेधून घेतं पण हे सौदर्य बघत असतानाही आपण डिनरला गेलो असल्यानं ताजमधल्या कोणत्या रेस्टॉरन्टमध्ये जाऊन जेवायचं हे ठरवायचं अत्यंत कठीण काम आपल्याला करायचं असतं... थोडेथोडके नाही तर तब्बल ९ रेस्टॉरन्टस आहेत या भल्याथोरल्या ताज मध्ये.. प्रत्येक प्रकारच्या खाद्यसंस्कृतीचं एक वेगळं रेस्टॉरन्ट, त्यातही त्यांचं सगळ्यात प्रसिद्ध रेस्टॉरन्ट आहे वसाबी. फक्त आणि फक्त जपानी खाद्यपदार्थांचं हे रेस्टॉरन्ट, ते ही साधसुधं नाही तर मोरीमोटो नावाच्या जगप्रसिद्ध जपानी शेफचं भारतातलं एकमेव रेस्टॉरन्ट..इथला प्रत्येक पदार्थ म्हणजे कलाविष्कार असतो म्हणे, पदार्थांसाठी आवश्यक कच्चामाल थेट जपानहूनच येतो, पण संपूर्ण जेवण सुशी किंवा तत्सम पदार्थ खाऊन होऊ शकत नाही त्यामुळे या रेस्टॉरन्टचा पर्याय बाद झाला... जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट दुसरं रेस्टॉरन्ट चायनिजचं गोल्डन ड्रॅगन नावाचं..फक्त चायनिज आणि सी फुडसाठी प्रसिद्ध. त्यामुळे हेसुद्धा रेस्टॉरन्ट अतिशय प्रसिद्ध असलं तरी आमचा चॉईस ठरणारं नव्हतं..संपूर्ण भारतीय पदार्थांसाठी तिथे दोन रेस्टॉरन्टस आहेत एक शामियाना आणि दुसरं मसाला क्राफ्ट..शामियानाचा मेन्यू त्यामानाने भरपूर अगदी पावभाजीपासून ते थेट वांग्याच्या भरीतासारखे पदार्थ पाहून इथे जाऊन बघुया म्हणून आम्ही थेट ताजच्या शामियाना नावाच्या रेस्टॉरन्टमध्ये थडकलो तर आश्चर्य म्हणजे या रेस्टॉरन्टला प्रचंड वेटींग होतं...४० ते ५० मिनिटं थांबा मग टेबल मिळेल असं आम्हाला सांगितलं गेलं..ताज च्या रेस्टॉरन्टला जिथे प्रत्येक पदार्थ किंवा प्रत्येक डिश ही ७०० ते ८०० रुपयाच्या घरात आहे तिथे इतकं वेटींग पाहून मुंबई खरोखर श्रीमंतांचं शहर आहे यांची पुन्हा खात्री झाली.. जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट मग पुढचा पर्याय होता मसाला क्राफ्ट चा.. ताजचं उत्तर भारतीय आणि मुघलई पदार्थांसाठी प्रसिद्ध असं मसाला क्राफ्ट हे एक रेस्टॉरन्ट.. तेव्हा मनाची पूर्ण तयारी करुन ‘ताज’ मधल्या मसाला क्राफ्टमध्ये शिरायचा निर्णय झाला, संपूर्ण ताज महाल हॉटेलमध्ये एखाद्या सुशोभित राजवाड्यालाही लाजवेल अशी सुंदर सजावट आहे, अगदी तशीच सजावट मसाला क्राफ्टमध्येही डोळ्याचं पारणं फेडते.. रेस्टॉरन्टचा मेन्यू भारतीय असल्याने संपूर्ण लाकडी इंटिरियर हे मसाला क्राफ्टचं वैशिष्ट्य, बरं मसाला क्राफ्टमध्ये जाण्याची चिंचोळी गल्लीसुद्धा तितकीच आकर्षक, जाताना कुठलं तरी राजघराण्याचं प्रदर्शन बघत आपण पुढे जातोय असं वाटावं अशा पद्धतीनं ताजचा इतिहास, तिथे येऊन राहून गेलेल्या जगभरातल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या आठवणींचं खरोखरीच प्रदर्शन तिथे दिसतं आणि आपण ‘द ताज’ मध्ये फिरतोय याची प्रकर्षाने जाणीव होते. ओबामा, इंग्लंडची राणी, भारताचे तसंच विविध देशांचे क्रिकेट संघ अशा सगळ्यांच्या इथल्या आठवणी जपून ठेवलेल्या दिसतात ताजच्या छोट्या छोट्या शोकेसेसमध्ये, ते बघत बघतच मसाला क्राफ्टचा दरवाजा येतो आणि एन्ट्री घेतल्यावर पुन्हा एकदा रॉयल फिल देऊन जातो.. जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट ताजच्या मसाला क्राफ्टमध्ये जाऊन बसल्यावरही आपल्याला मिळणारी रॉयल ट्रिटमेंट काही थांबत नाही आणि बसण्याच्या अत्यंत आरामदायक व्यवस्थेपासून तर टेबलावरच्या कॅण्डल लाईट डिनरसाठीच्या तयारीपर्यंत सगळं काही अगदी फाईव्ह स्टार. रेस्टॉरन्टचं नाव मसाला क्राफ्ट असल्याने हा मसाला तयार करण्याचं सर्वात महत्त्वाचं पारंपरिक साधन खलबत्ता, तो ही टेबलवर सजावट म्हणून ठेवलेला, या सगळ्या तयारीनंतर ताजमध्ये नेहमी खातो ते पदार्थ थोडीच मिळणार, तेही काहीतरी वेगळे आणि रॉयलच असले पाहीजे..खरं तर आपल्या उडुपी किंवा मल्टीक्युझीन रेस्टॉरन्टच्या तुलनेत इथला मेन्यू अगदी मोजका. प्रत्येक सेक्शनमध्ये अगदी ठराविक पदार्थ असलेला पण त्या प्रत्येक पदार्थाचं नाव वाटतानाही जगप्रसिद्ध शेफ्सच्या पाककलेची छाप त्यावर दिसते. पहिल्यांदाच मागवलेलं सूप एकदम वेगळं..एरव्ही सूप म्हंटलं की टोमॅटो, मॅनचाऊ, स्विट कॉर्न असं काहीतरी ऑर्डर करण्याची आपल्याला सवय असते, पण ताजच्या मेन्यूकार्डात असं काही ऑप्शनच नाही..मग आम्ही मागवलं ते भुने मकई का कॅप्युचिनो नावाचं सूप, ते सूप किंवा कॉफी बाऊलमध्ये न येता थेट कॉफीचा कपच आला, बरं चमचाही नाही, म्हणजे हे सूप थेट कॉफीसारखंच प्यायचं, अर्थात चव ताजच्या लौकिकाला साजेशी भन्नाटच होती या शंका नाही... जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट सोबत कॉम्प्लिमेंटरी पापड पण त्याची डिशही अत्यंत वेगळी आणि आकर्षक.. त्याच्या पाठोपाठ मागवलेले स्टार्टर्सपासून मेनकोर्सपर्यंत सगळे पदार्थ एकदम रॉयल आणि फाईव्ह स्टार चवीचे..रोटींच्या ऑप्शनमधले नाचणीचे फुलकेही मऊसूत आणि रुमाली रोटीही एकदम बेस्ट..जेवणाच्या चवी चांगल्याच होत्या, त्या बराच वेळ जिभेवर रेंगाळल्या आणि गेल्या पण त्या जेवणाबरोबर मिळणारा फाईव्ह स्टार अनुभव मात्र कायम लक्षात राहणारा ठरला..प्रत्येक मुंबईकराने तर किमान एकदा मुंबईची शान असलेल्या या ताजचा अनुभव घ्यायला हरकत नाही.. जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Embed widget