एक्स्प्लोर

BLOG : 'नागासाकी'च्या गुन्ह्याचा अर्थ; अणुयुगातील अमेरिकन शक्ती आणि अमानवीकरण

Nagasaki : आजच्याच दिवशी, 77 वर्षांपूर्वी 9 ऑगस्टला, अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकला आणि ते शहर बेचिराख केलं. त्या दिवशी पहाटे अनेक हवाई हल्ल्यांचे अलार्म वाजले होते, परंतु अशा चेतावणी आता नेहमीचीच झाली होती. अमेरिकन हवाई दलाकडून अनेक महिन्यांपासून जपानी शहरांवर बॉम्बचा वर्षाव केला जात होता आणि आजची सकाळ काही वेगळी असेल अशी शंका घेण्याचे फारसे कारण नव्हते. हवाई बॉम्बर्स असलेले दोन B-29 सुपरफोर्ट्रेसनी टिनियन हवाई तळ सोडले होते आणि कोकुरा या टारगेटच्या ठिकाणी ते सकाळी 9:50 वाजता पोहोचले. परंतु ढगांचे आवरण इतके दाट होते की ते लक्ष्यावर बॉम्ब टाकता आला नाही आणि तो दुसऱ्या लक्ष्यावर म्हणजे नागासाकीवर टाकण्यात आला.  या ठिकाणी पुन्हा एकदा दाट ढगांमुळे दृश्यमानता झपाट्याने कमी झाली होती. परंतु नंतर जसं काही आश्चर्य घडतं त्या प्रमाणे नागासाकीवरच्या ढगांचा पडदा बाजूला झाला आणि योजनेप्रमाणे सकाळी 11 वाजून 02 मिनीटांनी "फॅट बॉय" हा अणुबॉम्ब त्या ठिकाणी टाकण्यात आला. 

स्फोटाच्या क्षणी, एका मिनिटापेक्षा कमी वेळात तब्बल 40,000 लोकांचा जीव गेला. पुढील पाच ते सहा महिन्यांत यामध्ये जखमी झालेले आणखी 30,000 लोक मरण पावले. मृतांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच गेली, काही त्यांच्या दुखापतींना बळी पडले तर काहींना रेडिएशनमुळे झालेल्या त्रासामुळे जीव गमवावा लागला. या बॉम्बस्फोटामुळे काही वर्षांत किमान 1,00,000 लोक मरण पावले. हायपोसेंटरच्या 2.5 किलोमीटर परिसरातील जवळपास नव्वद टक्के इमारती किंवा ग्राउंड झिरो पूर्णपणे नष्ट झालं होतं. दुसर्‍या दिवशी, 10 ऑगस्ट रोजी जपानच्या सम्राटाने मित्र राष्ट्रांसमोर शरणागती पत्करली. तरीही 'विनाशर्त आत्मसमर्पण' करण्याचा अमेरिकेचा आग्रह होता. 15 ऑगस्ट रोजी जपानचा सम्राट हिरोहितोने प्रथमच रेडिओच्या माध्यमातून नागरिकांशी थेट बोलत जपानच्या शरणागतीची घोषणा केली.

तीनच दिवसांपूर्वी झालेल्या हिरोशिमा अणूबॉम्ब हल्ल्याची तुलना करता नागासाकीवरील अणुबॉम्बच्या हल्ल्याविषयी तुलनात्मकदृष्ट्या कमी बोललं जातंय, त्याचं कमी स्मरण केलं जातयं. हिरोशिमाचे हे एकच दुर्दैव आहे की त्याने मानवतेला आण्विक युगात आणले आणि मानवतेला रानटीपणाच्या नवीन आणि उच्च पातळीवर नेले. "लिटल बॉय" या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या बॉम्बने जवळपास 70,000 लोकांचा तात्काळ मृत्यू झाला. स्फोटाच्या क्षणी शहर सपाट झाले, पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि त्याचं रुपांतर एका स्मशानभूमीत झालं. त्यावेळची अनेक ग्राफिक्स हे वेगवेगळी असली तरी ते सर्व एकच कथा सांगतात. एक तरुण मुलगी जी सुरुवातीला यातून वाचली होती, पण तिचे डोळे पोकळ होते, स्फोटामुळे बाहेर पडलेल्या तेजस्वी प्रकाशामुळे ती आंधळी झाली होती. या बॉम्ब हल्ल्याने हजारो लोकांना अक्षरशः नग्न केलं गेलं, तीव्र उष्णता आणि फायरबॉल्समुले त्यांच्या अंगावरचे कपडे निघून गेले. हा एक प्रकारचा रानटीपणा आहे.

'जपानची संपूर्ण लोकसंख्या हे अमेरिकन लष्करासाठी एक योग्य लक्ष्य आहे' असं एका अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यानं म्हटलं होतं. असा दृष्टिकोन बाळगणे हा आणखी एक प्रकारचा रानटीपणा आहे. हिरोशिमामध्ये मारले गेलेले 250 पेक्षा कमी लोक सैनिक होते. दुसर्‍या शब्दात लक्ष्य म्हणजे वृद्ध, स्त्रिया आणि मुले. लढाऊ वयाचे जपानी पुरुष जे आधीच सशस्त्र दलात किंवा सहाय्यक सेवांमध्ये सेवा करण्यासाठी शहर सोडून गेले होते. युद्धासंबंधी आंतरराष्ट्रीय कायद्यावर कितीही निर्बंध लादले जातील आणि सभ्य डोक्याच्या लोकांच्या नैतिक भावना कशाही असो, युद्ध हा एक क्रूर व्यवसाय आहे. अनेक वेळा या गोष्टीचा पाठपुरावा करताना काहीही निषिद्ध समजलं जात नाही. इतिहासकार सामान्यतः याला “Total War” असंच म्हणतात.  

अणुबॉम्बस्फोटांचे अनेक वर्षे आणि दशकांनंतरही समर्थन करत राहणे हा आणखी एक प्रकारचा रानटीपणा आहे. अनेक अमेरिकन हे करतात. 2015 च्या शेवटी, या बॉम्बस्फोटांच्या सत्तर वर्षांनंतर, प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात असं दिसून आलं की 56 टक्के अमेरिकन लोकांनी अणुबॉम्बस्फोटांचं समर्थन केलं आणि इतर 10 टक्के लोकं यावर तटस्थ राहिली. बॉम्बच्या वापराच्या बचावासाठी अनेक युक्तिवाद केले गेले आहेत. अनेकजण 'टोटल वॉर'च्या परिस्थितीत सर्व काही माफ असतं असं म्हटलं जातं. हा युक्तिवाद बर्‍याचदा चुकीचा आणि अक्षम्य वाटत असल्याने इतर लोक 'लष्करी गरज' यावर बोलणे पसंत करतात. जपानने शरणागती पत्करण्यास नकार दिल्याने बॉम्बस्फोटाचा अधिकार अमेरिकेला असल्याचं समर्थन अनेकांनी केलं.  

तथापि या सगळ्याच्या खोलावर एक मूलभूत दावा आहे ज्यावर बॉम्बस्फोटांचे समर्थक त्यावर बोलणं किंवा त्याचं समर्थन करणं थांबवतात. अणुबॉम्बस्फोटामुळे जीव वाचला असा युक्तिवाद केला जातो. आपण सर्व परिस्थितीची कल्पना करू शकतो, त्याचप्रमाणे वाद देखील होतो, जिथे एक व्यक्ती काही जणांचा जीव घेऊन इतर सर्वांचा जीव वाचवते. बॉम्ब टाकला नसता तर अमेरिकन लोकांना जमिनीवरुन आक्रमण करावे लागले असते. आयोवा जिमाच्या लढाईने अमेरिकन लष्कराला दाखवून दिलं होतं की जपानी लोक त्यांच्या शेवटच्या माणसापर्यंत,स्त्रिया आणि मुलाचे रक्षण करण्यास, लढण्यास तयार असतील. हजारो अमेरिकन सैनिक मारले गेले असते. यामध्ये शेकडो जपानी लोकही मारले गेले असते. अशाप्रकारे अमेरिकेने इतिहासात कधीही न पाहिलेला मोठ्या प्रमाणावर विनाश घडवण्याचा निर्णय घेतला, तो केवळ अमेरिकनच नाही तर जपानी लोकांचेही जीव वाचवण्यासाठी असा युक्तीवाद केला जातो. 

11 ऑगस्ट रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रुमन यांनी केलेल्या भाषणातून निःसंदिग्धपणे असं दिसतं की जपानी लोकांचा जीव वाचवणे हे त्यांच्या मनात नक्कीच नव्हते. मॅनहॅटन प्रकल्पाला यश मिळवून देण्याचा आरोप असलेल्या शास्त्रज्ञांच्याही मनात ते नव्हते. ते केवळ बॉम्बची भाषा समजत होते. जेव्हा तुम्हाला एखाद्या पशूसोबत लढावं लागतं तेव्हा तुम्हाला त्याच्यासारखेच वागावे लागते. हे अत्यंत खेदजनक असले तरी खरे आहे. जपानी लोकांचे पूर्णपणे अमानवीकरण झाले होते यात शंका नाही. जर्मनीविरुद्धच्या युद्धाचा खटला चालवताना, अमेरिकेने नेहमी हे स्पष्ट केलं आहे की नाझी हे सामान्य जर्मन नव्हे तर शत्रू आहेत. जपानविरुद्ध युद्धाचा खटला चालवतानाही त्यांना असा कोणताही फरक आढळला नाही. लष्कराने आणि सामान्य अमेरिकन लोकांनी स्वतःला केवळ जपानी नेतृत्वाविरुद्धच नव्हे तर जपानी लोकांविरुद्ध युद्ध करताना पाहिले. जपानी लोकांच्या विरोधात आणि वर्णद्वेषाचा रानटीपणा, असंख्य व्यंगचित्रे, लेखन आणि अधिकृत दस्तऐवजांमध्ये तसेच अमेरिकन सरकार आणि समाजातील सर्वोच्च पदावरील लोकांच्या स्पष्टपणे उच्चारलेल्या विचारांमध्ये आढळतात. यूएस वॉर मॅनपॉवर कमिशनचे अध्यक्ष पॉल व्ही. मॅकनट यांनी सांगितले की त्यांनी जपानींचा संपूर्णपणे उच्चाटन करण्यास अनुकूलता दर्शवली. आणि राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांचा स्वतःचा मुलगा इलियट याने उपराष्ट्रपतींसमोर कबुल केले की त्यांनी त्यांच्याविरुद्ध युद्ध सुरू ठेवण्यास समर्थन दिले. 

अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी येथे अणुबॉम्ब टाकून युद्धगुन्हे केले, अगदी मानवतेविरुद्धचे गुन्हे केले आणि राज्याला दहशतवादात गुंतवले. जपानच्या लष्कराच्या युद्धकाळातील अत्याचारांमुळे त्यांच्या अमानवीकरणावर बोललं जात असलं तरी अशा प्रकारचं बॉम्बस्फोटाचं समर्थन करणे याला आमचा विरोध राहिल, आणि हे वाजवी आहे. जे बॉम्बस्फोटांचा बचाव करू पाहतात, ते समजू शकत नाहीत की अणुबॉम्ब हे फक्त मोठे आणि त्याहून अधिक प्राणघातक बॉम्ब नव्हते आणि बॉम्बस्फोट हे केवळ प्रथम केलेल्या सामरिक बॉम्बस्फोटाचे अधिक तीव्र आणि भयंकर स्वरूप नव्हते. Luftwaffe आणि नंतर रॉयल एअर फोर्स (RAF) आणि यूएस हवाई दलाच्या अणुबॉम्बस्फोटांनी सीमारेषा ओलांडली, त्यांनी वैश्विक स्तरावर एक अतिक्रमण केले. त्यामुळे नष्ट करण्याची इच्छा जगण्याच्या इच्छेवर विजय मिळवू शकते या मानवजातीसमोरच्या सर्वात भयानक मार्गाची जाणीव करून दिली. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की हिरोशिमाचा गुन्हा हा आपल्या आधुनिक युगातील आदिम गुन्हा आहे.

तरीही, नागासाकीचा गुन्हा हिरोशिमाच्या गुन्ह्यांपेक्षा मोठा होता असा तर्कही करता येईल का? अमेरिकनांना दुसरा बॉम्ब का टाकावा लागला? जपानने शरणागती पत्करण्यासाठी ते आणखी काही दिवस का थांबले नाहीत? नागासाकी बॉम्बस्फोटाचे समर्थक असा युक्तिवाद करतात की, हिरोशिमा बॉम्बस्फोटानंतर जपानी लोकांनी ताबडतोब आत्मसमर्पण केले नव्हते, अमेरिकन लोकांना हे अगदी स्पष्ट होते की त्यांनी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता. अमेरिकेकडे एकच बॉम्ब आहे असे जपानी लोक मानत असावेत. काही लोक असा युक्तिवाद करतात की जपानी लोकांसाठी आत्मसमर्पण हा पर्याय नव्हता, कारण त्यांच्या समाजात योद्धा संस्कृती व्यापक होती आणि त्यांची “Oriental culture” अशा अपमानास्पद शरणागतीला परवानगी देत ​​नाही. दुसरीकडे असा युक्तिवाद केला जातो की अमेरिकन लष्करी नियोजकांकडे एक खेळणं होतं आणि जर ते खेळण्यात येणार नसेल तर त्या खेळण्याचा काय उपयोग.

जसा मी युक्तिवाद केला आहे आणि इतर अनेकांनी माझ्या अगोदर असा युक्तिवाद केला आहे, अणुबॉम्बस्फोट हा केवळ जपानला आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त करण्याचा हेतू नव्हता. युद्ध संपण्याआधीच, अमेरिका आधीच पुढच्या युद्धाची तयारी करत होते आणि ते म्हणजे-सोव्हिएत युनियनविरुद्धचे युद्ध. जपान यावेळी एक पूर्णपणे नष्ट शक्ती होती. हे खरं आहे की अमेरिकन लोकांना तुलनेने जपानमध्ये कमी स्वारस्य होते. सोव्हिएतच्या स्टॅलिनला हे सांगणे अत्यावश्यक होते की अमेरिका सोव्हिएत युनियनला साम्यवादाचे विष जगभर पसरवण्यास आणि जागतिक वर्चस्व मिळवण्यास परवानगी देण्यास तयार होणार नाही. हिरोशिमा आणि नागासाकीवरच्या हल्ल्याच्या माध्यमातून अमेरिकेनेने असा दुहेरी ठोसा देण्याचा प्रयत्न केला. जपानला नॉकआऊट केलं आणि सोव्हिएत युनियनला सूचित केले की अमेरिका जगातील एक अपरिहार्य देश म्हणून आपल्या सर्व शक्तीचा वापर करण्यास तयार आहे. नागासाकीच्या गुन्ह्याचा अर्थ लावण्याचं काम अजून बाकी आहे.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RTE Admission : आरटीईच्या एक लाख जागांवरील प्रवेशासाठी नोंदणी कधी सुरु होणार? शालेय शिक्षण विभागाकडून मोठी अपडेट
आरटीईच्या एक लाख जागांवरील प्रवेशासाठी नोंदणी कधी सुरु होणार? शालेय शिक्षण विभागाकडून मोठी अपडेट
Ahmednagar Water Tankers: पाच दिवसांतून एकदा मिळतंय पिण्याचं पाणी, नगर जिल्ह्याची मदार 312 पाण्याच्या टँकर्सवर, परिस्थिती बिकट
पाच दिवसांतून एकदा मिळतंय पिण्याचं पाणी, नगर जिल्ह्याची मदार 312 पाण्याच्या टँकर्सवर, परिस्थिती बिकट
"केजरीवालांना स्पेशल ट्रिटमेंट मिळालीये..."; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या अंतरिम जामीनावर अमित शहा स्पष्टच बोलले
Monsoon 2024 Updates : केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार, सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता
केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार, यंदा सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 16 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMonsoon 2024 Updates : केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार, सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यताSRPF Prakash Kapade : राज्य राखीव दलाचे जवान प्रकाश कापडे यांनी स्वत:ला संपवलेGhatkopar Hoarding Collapse : दुर्घटनेला 54 तास, मृतदेह कुजण्यास सुरूवात, काहीजण अडकल्याची भीती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RTE Admission : आरटीईच्या एक लाख जागांवरील प्रवेशासाठी नोंदणी कधी सुरु होणार? शालेय शिक्षण विभागाकडून मोठी अपडेट
आरटीईच्या एक लाख जागांवरील प्रवेशासाठी नोंदणी कधी सुरु होणार? शालेय शिक्षण विभागाकडून मोठी अपडेट
Ahmednagar Water Tankers: पाच दिवसांतून एकदा मिळतंय पिण्याचं पाणी, नगर जिल्ह्याची मदार 312 पाण्याच्या टँकर्सवर, परिस्थिती बिकट
पाच दिवसांतून एकदा मिळतंय पिण्याचं पाणी, नगर जिल्ह्याची मदार 312 पाण्याच्या टँकर्सवर, परिस्थिती बिकट
"केजरीवालांना स्पेशल ट्रिटमेंट मिळालीये..."; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या अंतरिम जामीनावर अमित शहा स्पष्टच बोलले
Monsoon 2024 Updates : केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार, सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता
केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार, यंदा सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता
Maharashtra Weather: राज्यात दोन दिवस उष्णतेची लाट, तर 'या' जिल्ह्यांमध्ये वीजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
राज्यात दोन दिवस उष्णतेची लाट, तर 'या' जिल्ह्यांमध्ये वीजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
Ind vs Pak : टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान मॅच ज्या मैदानावर होणार तिथून मोठी अपडेट समोर, पाहा व्हिडीओ 
Ind vs Pak : टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान मॅच ज्या मैदानावर होणार तिथून मोठी अपडेट समोर, काय घडलं?
Horoscope Today 16 May 2024 :  आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा गुरुवारचं राशीभविष्य
आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा गुरुवारचं राशीभविष्य
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
Embed widget