एक्स्प्लोर

वैभवशाली मोडी लिपी

मोडी लिपीचा वापर यादवकाळापासून राज्यकारभार आणि प्रशासकीय लेखनात मोठ्या प्रमाणात सुरु झाला. शिवकाळात, पेशवेकाळात या मोडीलिपीला बहर आला.

भूतकाळातील गोष्टींचा आढावा, अभ्यास भविष्यकाळातील वाटचालीस महत्वाचा ठरु शकतो. आज आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. जागतिकीकरणाच्या लाटेत आपल्यावर इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहे, आज मराठी भाषेतही इंग्रजी शब्दांचा असा शिरकाव झाला आहे की ते शब्द जणू मराठी भाषेतीलच आहेत असे वाटू लागले आहे. जागतिकीकरणामध्ये नव्या भाषा, कला निश्चितच शिकल्याच पाहिजेत, पण त्याबरोबरच आपल्या मातृभाषेचा अमूल्य ठेवा जतन करणे ही नैतिक जबाबदारी आपलीच आहे याचे भान असलेच पाहिजे. मध्ययुगीन महाराष्ट्राचा वैभवशाली, गौरवशाली, ज्वलंत, प्रेरणादायी, समृद्ध इतिहास हा मोडी लिपीत आहे. हीच मोडी लिपी मध्ययुगीन काळात राजकारभाराची लिपी होती. पण मागील सहा–सात दशकापूर्वी काही कारणांमुळे मोडी लिपी कालबाह्य झाली, तत्कालीन मुद्रण तंत्रज्ञानाला मर्यादा होत्या, पण आज २१व्या शतकात मुद्रण तंत्रज्ञानात खूप मोठी क्रांती झाली आहे. आज मोडी लिपीचे बरेच फाँट तयार झाले आहेत, त्याद्वारे आपण सर्व काही संगणकावर टंकीत करू शकतो. मोडी लिपीचा ठेवा हा मराठी भाषेचा अनमोल ऐतिहासिक ठेवा आहे, आज कोट्यवधी कागदपत्रे, दस्तऐवज मोडी लिपीत लिहिलेले आढळतात. आज भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, हरीयाणा, ओरिसा आणि आसाम या राज्यात उपलब्ध आहेत याचबरोबर इंग्लंड, फ्रान्स, नेदरलँड, पोर्तुगाल, डेन्मार्क, इटली, स्पेन, इंडोनेशिया, जावा सुमात्रा बेटे या देशात उपलब्ध आहेत. मोडी लिपीचा वापर यादवकाळापासून राज्यकारभार आणि प्रशासकीय लेखनात मोठ्या प्रमाणात सुरू झाला. शिवकाळात, पेशवेकाळात या मोडीलिपीला बहर आला. इंग्रजी राजवटीत मोडी प्रचलीत होती. इ.स. १९६० पर्यंत मोडीचा वापर महाराष्ट्रात झालेला आढळतो. १९६० नंतर ही लिपी कालबाह्य झाली असली तरी आज ऐतिहासिक गोष्टींचा आढावा घेऊन संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी मोडी लिपीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालंय. मोडी लिपी ही मराठीची शिघ्र लिपी आहे. मोडीचा वापर हस्तलिखीतासाठी व्हायचा. मोडीचा वापर मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत भाषा लिहिण्यासाठी झालेला आढळतो. आज जसे देवनागरी लिपीचा वापर मराठी, कोकणी, हिंदी, संस्कृत, नेपाळी इ. भाषा लिहिण्यासाठी होतो, तसाच मोडीचा वापर होई. मोडी लिपीने गेली ७००–८०० वर्षे आपले अस्तित्व अबाधीत ठेवलं. पण १९६० नंतर मुद्रण तंत्रज्ञानामध्ये झालेला बदल, आणि काही राजकीय बदल मोडीला कालबाह्य करण्यास कारणीभूत ठरले असावे असे मोडी तज्ञ आणि इतिहासकारांचे मत आहे. आज कोणाही तरुणाला मोडी विषयी विचारल्यास उत्तर येतंकी माझ्या आजोबांना मोडी यायची, मग त्यानतंरच्या पिढीला मोडीचा गंधही लागला नाही, आणि हीच परिस्थिती राहिली तर पुढील पिढीला सांगणारे आजोबापण राहणार नाहीत. आजही सहस्त्रावधी मोडी दस्तावेजांचे वाचन होणे बाकी आहे, या दस्तावेजामध्ये दडलेला इतिहास अज्ञात आहे, हेच कागद अजून किती दिवस तसेच राहतील याची खात्री देता येत नाही. कारण आजमितीला त्यांची काळजी योग्य पद्धतीने न घेतल्यामुळे लाखो कागद नष्ट होत आहेत. याची खबरदारी आत्ताच घेतली पाहिजे, नाहीतर पुढील पिढीला आपण काय वारसा देणार ? मोडी लिपीला परत पूर्वीचे वैभव प्राप्त होईल का ते काळच ठरवेल. नक्की मोडी दस्तावेजामध्ये काय दडले आहे यासाठी जास्तीतजास्त वाचक, अभ्यासक तयार करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. तरच मोडी लिपीचा ऐतिहासिक अनमोल ठेवा पुढील पिढीला देता येईल. अन्यथा पुढील पिढी आजच्या पिढीला काय म्हणेल ? ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी वैभवशाली, गौरवशाली, ज्वलंत, प्रेरणादायी, समृद्ध इतिहासाचा अनमोल वारसा, ठेवा दिला आहे तो आपण आपल्या पुढील पिढीला देणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी समजून कार्य तडीस नेणे गरजेचे आहे. मोडी लिपीचा वापर नक्की कोणत्या काळात सुरु झाला याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. इतिहासकारांमध्ये मोडीच्या उगमाबाबत अनेक मतप्रवाह आहेत. देवगिरीच्या यादव साम्राज्यात करणाधीप पदावर असलेले हेमाद्री उर्फ हेमाडपंत यांनी राजकारभारासाठी मोडीचा वापर करण्यास सुरुवात केली असे इतिहासकारांचे मत आहे. मोडीचा वापर करुन लिहिलेली ऐतिहासिक दस्तऐवज, कागदपत्रे, ताम्रपत्रे यांचे वाचन होणे गरजेचे आहे, तसेच मोडीचा वापर आजच्या पिढीनेही आपल्या दैनदिन कामात थोड्याफार प्रमाणात करण्यास सुरुवात केली तरच मोडी लिपीचा हा वारसा पुढील पिढीला देवू शकतो. वर्तमानकाळातील मोडी लिपीचा वापर भविष्यात मोडी लिपीचे अस्तित्व अबाधित ठेवू शकतो. आज मोडी लिपीचा वापर बरेच लोक आपल्या दारावरील नावाच्या पाट्या, वा सोशल मिडीयावरील वापरायचे हेडर असे छोटेछोटे प्रयत्न करुन मोडीचा प्रचार, प्रसार आपल्याआपल्या पातळीवर करत आहेत, त्यांचे कार्य मोडी प्रचारासाठी स्त्युत्य आहेच. पण असा वापर मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. वैभवशाली मोडी लिपी तसेच बरेच मोडी अभ्यासक, प्रशिक्षक आपल्या स्तरावर मोडीचा प्रचार, प्रसार करताना दिसतात. मोडी लिपी कशी शिकावी यासाठी बरीच पुसतके आज उपलब्ध आहेत, तसेच मोडी प्रशिक्षण वर्ग महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक या शहरात होताना दिसतात. तसेच स्वातंत्रवीर सावरकर यांची जन्मठेप संपूर्णपणे मोडी लिपीत टंकीत करुन पुस्तक तयार केले आहे. तसेच राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे चरीत्राचे ई–पुसतक, तसेच अन्य महापुरुषांची चरित्रे मोडी लिपीतील ई–पुस्तके व पुस्तके येत आहेत ही मोडीच्या प्रसारासाठी महत्वाची बाब आहे. मध्ययुगीन महाराष्ट्राचे वैभव, वारसा असलेल्या मोडी लिपीचा वापर इ.स. २०१६ साली प्रदर्शीत झालेल्या एका चिनी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट ह्एन–त्सांग (XuanZang) यामध्ये झाला आहे. या चित्रपटामध्ये भारतातील दस्तऐवज, कागदपत्रे, तसेच पत्रव्यवहारासाठी भाषा संस्कृत आणि लिहिण्यासाठी मोडी लिपीचा वापर करण्यात आलाय. कारण या चित्रपटाचं कथानक ज्या काळातील आहे, त्या काळात भारतात मोडी प्रचलित होती, एवढंच नाही तर ती व्यवहाराची आणि राजकारभाराची भाषा होती. वैभवशाली मोडी लिपी सातव्या शतकात भारतात आलेला चिनी विद्वान प्रवासी ह्एन–त्सांग (XuanZang)(इ.स.६०३–इ.स.६६४) यांच्या भारत प्रवासाचे अनुभव या चित्रपटामध्ये चित्रीत करण्यात आले आहेत. हा चिनी विद्वान प्रवासी ज्ञानाच्या आणि योग्य गुरुच्या शोधात भारतात आला. भारतातही त्याने सर्वत्र प्रवास केला, काश्मीरपासूपासून  तक्षशिला, मथुरा, काशी, कपिलवस्तू, पाटलीपुत्र, नालंदा अशा अनेक ठिकाणी त्याने वास्तव्य केले. या काळात त्याने वेद, भाषा. व्याकरण, आयुर्वेद, तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला. तो इ.स. ६४५ मध्ये चीनला परत गेला. वैभवशाली मोडी लिपी वैभवशाली मोडी लिपी चिनी चित्रपट ह्एन–त्सांग (XuanZang) यासाठी केलेले मोडी लिपीचे लेखन मुंबईतील ‘‘जागतिक मोडी लिपी’’ या संस्थेचे श्री.सुहास पटवर्धन, व श्री.रवींद्र भगवते यांनी करून दिले आहे. मोडी लिपीचा वापर चिनी ऐतिहासिक चित्रपटामध्ये होतो पण आपल्या देशातील ऐतिहासिक चित्रपटामध्ये मोडीचा वापर का होऊ शकत नाही? व आपल्यातील चित्रपट निर्देशकांना मोडीची ऐतिहासिक पार्श्वभूमी माहित नाही का? हा सर्वात मोठा संशोधनाचा विषय आहे.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
Mahanagarpalika Election 2026 BJP: मोठी बातमी: समोरच्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला अन् भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला, मतदानापूर्वीच कमळ गुलालाने न्हाऊन निघालं
मोठी बातमी: समोरच्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला अन् भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला, मतदानापूर्वीच कमळ गुलालाने न्हाऊन निघालं
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
BMC Election 2026: वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
BMC Election 2026: मतदानापूर्वीच भाजपचे 3 उमेदवार जिंकले पण मुंबईतील 'या' वॉर्डात उमेदवार बाद, शिंदेसेनेच्या उमेदवारालाही झटका
मतदानापूर्वीच भाजपचे 3 उमेदवार जिंकले पण मुंबईतील 'या' वॉर्डात उमेदवार बाद, शिंदेसेनेच्या उमेदवारालाही झटका
Embed widget