एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

BLOG: जिभेचे चोचले - खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ हे बालगीत म्हणजे लहान मुलांना रिझवण्यासाठीची कवी कल्पना आहे, असं प्रत्यक्षात थोडंच घडू शकतं, अशी तुमची आमची सगळ्यांची कल्पना आत्तापर्यंत होती आणि अनेकांचा असा समज अजूनही आहे, मात्र त्या कवी कल्पनेच्याही पलिकडे जाऊन त्या बालगीतात कल्पना केल्याप्रमाणे खाद्यपदार्थांचं वेगळं जग निर्माण होतंय ते सध्याच्या मॉडर्न फूड टेक्निक्सच्या माध्यमातून. अशाच पदार्थांच्या आणखी एका जादूनगरीचं नाव आहे परळचं स्पाईस क्लब. परळच्या प्रसिद्ध अशा फिनिक्स मॉलच्या बरोबर समोर हे छोटेखानी रेस्टॉरंन्ट आहे. नेहमीचेच भारतीय पदार्थ पण त्यांना असं काही इथे सादर केलं जातं की पाव भाजी, वडा पाव, पाणीपुरीसारखा पदार्थही एकदम क्लासिकच्या रांगेत जाऊन बसतो...सगळ्य़ात महत्त्वाचं म्हणजे स्पाईसक्लब हे पूर्णपणे शाकाहारी रेस्टॉरेन्ट आहे..पण तरीही त्यांच्या मेन्यूमध्ये जबरदस्त वैविध्य आहे. कधीही ऐकले नाही अशा नावांच्या आणि कधीही जीभेनी चाखल्या नाहीत अशा चवींच्या पदार्थानी स्पाईस क्लबचं मेन्यूकार्ड भरलेलं आहे. अर्थात तिथे गेल्यानंतर त्यांच्या मेन्यूकार्डकडे जाण्यापूर्वीच वेटर आठ छोटेछोटे ग्लास असलेला एक ट्रे घेऊन येतो, त्यात आठ प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या कोशिंबिरी असतात. पुदिन्याची चटणी, कांद्याची कोशिंबीर अशा ८ चवदार चटण्या..आपलं जेवण पूर्ण होईपर्यंत कशाही बरोबर खाता येतील असे ते प्रकार. त्याबरोबरच टेबलवर ठेवला जातो पाण्याचा जार, त्या पाण्याच्या जारमध्ये एक पुदीन्याची काडी आणि ईडलिंबाची पातळशी फोड, ज्याने साधं पाणीही चवदार लागतं. BLOG: जिभेचे चोचले - खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  मग आपल्या जेवणाला स्टार्टर्सनी सुरुवात करायची तर सर्वात जास्त लोक खातात तो तिथला नान्झा - पंजाबी नान आणि इटालियन पिझ्झा यांच्या एकत्रीकरणातून तयार केलेली शेफच्या ड़ोक्यातली एक आयडिया म्हणजे नान्झा.. पंजाबी नानचा बेस आणि त्यावर पिझ्झावर जसे भाज्यांचे टॉपिंग्ज असतात तसेच टॉपिंग्ज पण त्यातही इंडियन ट्विस्ट, त्या टॉपिंगलाही पंजाबी भाजीचा स्वाद येतो, मात्र भरपूर टोमॅटो सॉस आणि चिजमुळे पहिला घास खाल्ल्याखाल्ल्या पिझ्झा, नान, भाज्या अशा वेगवेगळ्या चवींचा एकत्रित ब्लास्ट होतो जिभेवर Nanza या रेस्टॉरेन्टमधली डिकन्स्ट्रक्टेड पदार्थांची रेंज तर जबरदस्त आहे, मग तो डिकन्स्ट्रक्टेड वडा पाव असो किंवा तशाच प्रकारचा हटके ढोकळा असो...स्पाइसक्लबमधला आणखी एक फेमस पदार्थ आहे पावभाजी फॉन्द्यु. चिज फॉन्द्यु ही खरंतर स्विस डिश आहे, अगदी स्वित्झर्लंडचा राष्ट्रीय पदार्थच म्हणा ना..यात एका छोट्या स्टोव्हसाऱख्या स्टॅण्डवर एका वाडग्यात पातळ केलेलं चिज ठेवलेलं असतं, खाली मेणबत्ती लावलेली असते ज्यामुळे ते जिच गरम राहतं, सोबत ब्रेडचे छोटे छोटे तुकडे दिले जातात आणि असते फॉन्द्यु स्टिक, त्या स्टिकला ब्रेडचा तुकडा टोचायचा आणि त्या गरमागरम चिजमध्ये बुडवून तो खायचा, असा हा पारंपरिक स्विस फॉन्द्यु..पण स्पाईस क्लबमध्ये त्या फॉन्द्युपॉट किंवा वाडग्यात असते ती पावभाजीची भाजी आणि फॉन्द्यु स्टिकला टोचायला बटर लावलेले पावाचे छोटेछोटे तुकडे.. म्हणजे आपली नेहमीची लाडकी पावभाजी पण फॉन्द्यु स्टाईलने..तितक्याच भारी पद्धतीने पेश केली जाते ती आपली लाडकी चमचमीतपाणी पुरी. BLOG: जिभेचे चोचले - खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  एका टोपलीत पुऱ्या, एका वाटीत मसाला आणून ठेवला जातो वेटरकडून, आणि मग विज्ञानाच्या प्रयोगांच्या वेळी ज्यांच्याशी गाठ पडली अशी पाचसहा टेस्टट्युब समोर आणून ठेवल्या जातात, त्या असतात पाणीपुरीच्या तिखट पाण्याने भरलेल्या, आणि एका मोठ्या इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये गोड पाणी..मग खातांना आणखीच धमाल..पुरीत आधी सिरींजनी गोड पाणी भरायचं...मग टेस्टट्युबनी तिखट पाणी भरुन थेट तोंडात...असे कितीतरी धम्माल स्टार्टर्स खाल्ल्यानंतर खरं तर मेन कोर्सची म्हणजे मूळ जेवणाची गरजच नसते पण मेनकोर्समध्येही शेफचे धम्माल प्रयोग चाखायला मिळतात. अर्थात इथे मेनकोर्स कमीच खाल्लेलं बरं  कारण काहीही झालं तरी त्यांची डेझर्टस न चाखणं म्हणजे गुन्हा आहे.. BLOG: जिभेचे चोचले - खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  स्पाईसक्लबच्या शेफ्सनी डिझाईन केलेल्या डेझर्टमध्ये खरोखर त्यांनी त्यांची कल्पनाशक्ती आणि चवींचं गणित पणाला लावलंय, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. स्पाईसक्लबला भेट देणारी प्रत्येक व्यक्ती तिथला एक गोड पदार्थ नक्की खाते, ती म्हणजे त्यांची कुल्फी.. आता कुल्फी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर सर्वसाधारणपणे काय येतं, तर एका कांडीत घुसवलेला मलाईदार गोळा म्हणजे कुल्फी, काही आईसक्रीम ब्राण्ड्सच्या कुल्फ्या अशा काडीला टोचलेल्या नसतात तर प्लेटमध्ये दिल्या जातात त्याचीही आपल्याला सवय असते. पण, इथे स्पाईसक्लबला मात्र कुल्फी मागवल्यावर ओळखीचं असं काहीच आपल्या पुढ्यात येत नाही....येतो ते एक भलामोठा ट्रे, त्यावर अर्धगोलाकार पांढऱ्या शुभ्र रंगाचं भांडं..त्यातून गरम पदार्थातून निघाव्यात तशा वाफा निघत असतात आणि त्या भांड्यात थर्माकोलचे छोटेछोटे तुकडे वाटावेत किंवा पॉपकार्न वाटावेत असे तुकडे असतात (तीच आपली कुल्फी असते हे नंतर कळतं.) सोबत पाच छोट्याछोट्या वाट्या दिलेल्या असतात त्यात पाच प्रकारचे म्हणजे मलाई, चॉकलेट, ब्लुबेरी सिरप असतात..ते सगळं आणून ठेवल्यावर आता हे सगळं एकत्र खायचं कसं हे वेटर सांगू लागतो... कारण त्याच्या मार्गदर्शनाशिवाय तो पदार्थ खाता येणं शक्यच नाही... Kulfi त्यांच्या माहितीनुसार ती कुल्फी त्यांनी उणे २०० डिग्री इतक्या कमी तापमानात गोठवलेली असते, इतकं कमी तापमान केल्यामुळे त्या कुल्फीला तसं थर्माकोलसारखं क्रिस्टलचं रुप देता येतं..आपण ती कुल्फी थोडीथोडी डिशमध्ये वाढून घ्यायची आणि हव्या त्या चवीच्या सिरपमध्ये घोळवून ती खायची, आपण हे सगळे सोपस्कार करेपर्यंत त्या कुल्फीचं तापमान नॉर्मल आईस्क्रीमसारखं झालेलं असतं..त्यामुळे लगेच तोंडात टाकता येतं...आहे की नाही भन्नाट.. खरं तर असा लिक्विड नायट्रोजन या थंड रसायनाचा खाद्यपदार्थांमध्ये आणि खासकरुन मॉकटेल्स, कॉकटेल्समध्ये वापर करण्याची सध्या जगभर जोरदार फॅशन आहे.. अगदी ‘नाईट्रो’ नावाचीही एक रेस्टॉरन्टची चेन आहे..पण भारतीयांना आवडतील अशा चवींना लिक्वीड नायट्रोजनची जोड देण्याचं कसब मात्र स्पाईसक्लबइतकं कुणालाच साधलं नाही. BLOG: जिभेचे चोचले - खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  नायट्रो पान किंवा पान मूस नावाचाही एक पदार्थ स्पाईसक्लबमधल्या प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. चॉकलेट आणि पानाच्या चवीचं आईस्क्रीम भरलेली खरी पानं आपल्यासोमर आणून ठेवली जातात आणि ती सर्व्ह करण्यापूर्वी लिक्वीड नायट्रोन त्या संपूर्ण प्लेटवर अक्षरश: ओतलं जातं...त्या नायट्रोजनमुळे ते पान थंड आणि कुरकरीत होतं..आणि तोंडात टाकल्यावर ते पान मूस लगेच विरघळतं... तिथला प्रत्येक गोड पदार्थ युनिक आहे म्हणजे सोप केक अशा नावाचा पदार्थ मागवला तर खरोखर साबणाच्या आकाराचा आणि वर फेसही असलेला पदार्थ तुमच्या पुढ्यात येतो, ट्री पॉट नावाचं डेझर्ट मागवलं तर खरोखरीच तुळशीचं रोप असलेली कुंडी आणि माती उकरण्याचं खुरपणं आणून ठेवतात आपल्यापुढे, गंमत म्हणजे त्या कुंडीतली माती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चॉकलेट असतं आणि खुरपण्यानी जशी ती माती उकरत जाऊ तशी वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स चमच्यात येऊ लागतात. BLOG: जिभेचे चोचले - खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  याशिवाय आपल्याला लहानपणीची आठवण करुन देणारे बर्फाचे गोळे, आणि लहानपणीच्या कॅण्डीची आठवण करुन देणारा एका जादूचा डबाही आहे त्यांच्या मेन्यूत. ही कॅण्डी ऑर्डर केल्यावर एक गारेगार चौकोनी डबा येतो पुढ्यात आणि दोन बाटल्यांमध्ये कॅण्डीचे सिरप, सोबत कॅण्डीच्या काड्या...तो डबाही लिक्वीड नायट्रोजनने भरलेला असतो, त्या डब्यावर कॅण्डीची काडी ठेवायची आणि हवं ते सिरप, हव्या त्या आकारात ओतून तयार करायची आपली कॅण्डी. ह्या सगळ्या गमतीजमती अनुभवून झाल्यावर आपण बिल मागवतो..आणि ही आगळी वेगळी खाद्यसफर संपली असा विचार करत असतानाच दोन तीन चॉकलेटं ठेवली जातात समोर, आता हे पुन्हा कशाला म्हणत आपण ती तोंडात टाकतो, तर त्यातही चॉकलेटच्या आतमध्ये पान फ्लेवरच्या लिक्वीडची चव लागते आणि आपलं जेवण खऱ्या अर्थाने पूर्ण होतं. या स्पाईसक्लबसाऱख्या रेस्टॉरंटमध्ये जाताना मोठ्या ग्रुपने जावं कारण मग अनेक वैविध्यपूर्ण पदार्थांची चव चाखता येते. नाहीतर अनेक पदार्थांची चवच नाही घेता आली कारण पोटात जागाच नव्हती, असं व्हायला नको. संबंधित ब्लॉग

मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget