एक्स्प्लोर

जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन

खरा मुंबईकर असण्याची लक्षणं कोणती? तीन चार पिढ्यांपासून मुंबईत वास्तव्य असणं की थेट फोर्टपासून दादरपर्यंत जुन्या मुंबईत कुठेतरी लहानाचं मोठं होणं, मुंबईची बम्बया हिंदी आत्मसात करणं की मुंबईच्या दमट हवेची, घामाच्या धारांची सवय झालेली असणं..माझ्यामते या सगळ्यापेक्षाही मुंबईचं जगणं खऱ्या अर्थानी स्वीकारुन तो जगण्याच्या वेग, त्यातलं वैविध्य मौजमजा आणि अपरिहार्य अशा अँडजेस्टमेन्टस यांच्यासकट मुंबईला आपलं मानणारा खरा मुंबईकर..म्हणूनच तर मुंबईचं जगणं म्हंटलं की जसा सुखावणारा समुद्रकिनारा निवांत क्षण देतो एकीकडे तर दुसरीकडे गर्दी, अंगावर काटा आणणारा लोकलचा प्रवास या दोन्ही टोकाच्या गोष्टी अपरिहार्य म्हणून आपण स्वीकारतो, त्याचप्रकारे खिशात पैसा असेल तर पाहीजे ते खायला प्यायला या मुंबईत मिळतं, ते सुख मिळवता येत असलं तरी नोकरीचे पाच किंवा सहा दिवस ऑफीसच्या कॅंटीनमधलं खाणं किंवा डबेवाल्याच्या हातून आलेल्या डब्याने पोट भरणं प्रत्येक मुंबईकराच्या दैनंदिन जीवनाचा आता भाग झालाय..म्हणूनच की काय परळच्या कमला मिल्समधल्या एका रेस्टॉरन्टला नावच दिलं गेलंय..बॉम्बे कॅंटीन. जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन मुंबईच्या मुंबईपणाला पुरेपूर न्याय देणारी, मुंबईने जगाला दिलेल्या खाद्यसंस्कृतीला न्याय देणारी आणि जगाला मुंबईने दिलेल्या पदार्थांना खवय्यांसमोर नव्याने सादर करणारी पण त्याचबरोबर मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्याचीही दखल घेणारी ही जागा म्हणजे ‘बॉम्बे कँटीन’. जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन सध्या नेहमीचे भारतीय पदार्थ जे त्याचत्याच पद्धतीने खाऊन प्रसंगी कंटाळवाणेही झालेले असतात अशा पदार्थांना मॉडर्न शेफ स्पेशल ट्विस्ट देण्याची एक नविनच फॅशन दिसतेय खवय्यांच्या जगतात..इथे बॉम्बे कॅन्टीनलाही अनेक पदार्थांमध्ये आपल्याला शेफचा हा प्रयत्न दिसतो, पण या प्रत्येक पदार्थात आणि अगदी रेस्टॉरन्टच्या डेकोरमध्येही मुंबई किंवा बॉम्बे या शहराचं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. जुन्या काळच्या इराण्याच्या किंवा इतरही हॉटेलात दिसायचं तसं भव्य लाकडी फर्निचर, टिपीकल लाकडी चौकट असलेला दर्शनी भाग आणि तिथून आत गेल्यावर लाकडी टेबलं आणि लाकडीच खुर्च्या, काऊंटरवर बिस्कीटं, मावा केक, खारी आणि चॉकलेटं यांनी भरलेल्या मोठमोठ्या काचेच्या बरण्यांची सजावट. खरोखर विस्मरणात गेलेले किस्मी टॉफी बार, रावळगावच्या गोळ्यांनी भरलेल्या बरण्या बघितल्या की तर थेट शाळेचे दिवस आठवतात.  एका कोपऱ्यात एक हातठेला ठेवलाय आणि त्यावर काही वस्तूंची सजावट केलेली. मद्याच्य़ा काऊंटरला मोठ्या अक्षरात दारपखाना असं तर ओपन किचनला खाना खजाना असं ठळक अक्षरात दिलेलं नाव. जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन अशी सगळी जुन्या आणि नव्या बॉम्बेची आठवण करुन देणारी सजावट आणि त्यात असलेली बैठक व्यवस्था.. त्या आसन व्यवस्थेची मुंबई ही थिम आणखीच जाणवून देणारे साठ सत्तरच्या दशकातले पोस्टर्स लावून सजवलेले खांब आणि भिंती तर चहुबांजुनी दिसतात कुठल्याही टेबलवरुन. गंमत म्हणजे रेस्टॉरन्टच्या एका भागातून दुसऱ्या भागात जायला पाचच पायऱ्यांचा छोटा लाकडी पूलही तयार केलाय..लहान मुलांना अम्युझमेंट पार्कची मजा देतो हा छोटा पूल..सर्व्ह करणाऱ्या वेटर्सचे टी शर्ट्स आणि त्यावरचे संदेशही अतिशय रंजक आणि खास मुंबईच्या भाषेतले..एकाच्या टी शर्टवर नुसतंच देवनागरीत ब्रो असा शब्द लिहीलेला, तर दुसऱ्यावर ‘मै तेरा बाप हू’ असा एक संदेश. जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन आता खास मुंबईची आठवण देणारी ही जागा आहे म्हंटल्यावर पदार्थांमध्येही मुंबईची झलक दिसणारच. ती झलक दिसूही लागते थेट मेन्यूकार्डातून. त्यातही आधी हातात पडतं ते ड्रिन्क्सचं सचित्र मेन्यूकार्ड, लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं असतात तशी थ्रीडी आणि त्यातली कॉकटेल मॉकटेल्सची नावं तर त्याहूनही अजब.. मुंबईतल्या किंवा बॉम्बेतल्या ठिकाणांची नावं असलेली कॉकटेल्स आणि मॉकटेल्स ही तर या बॉम्बे कॅन्टीनची खासियत. ओव्हल व्ह्यू, इरॉस का राजा, इरॉस की रानी अशी मुंबईतल्या प्रसिद्ध जागांची आठवण करुन देणारी नावं असणारी ही ड्रिन्क्स आणि ती ड्रिन्क्स तयार करण्यासाठी असलेली सुसज्ज ड्रिन्क्स गॅलरी हा अनेकांचा या रेस्टॉरन्टमधला आवडता कोपरा ठरतो.. जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन अनेक कॉकटेल्स, मॉकटेल्स आणि शीतपेयांच्या बरोबरीनं जुन्या फोर्ट भागातल्या इराणी रेस्टॉरन्टमध्ये हमखास दिसणारी पालोनजीचा फ्लेवर्ड सोडाही इथे आवर्जुन मिळतो आणि आलेले खवय्येही या फ्लेवर्ड सोड्याची न चुकता चव घेतात. जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन मुंबई शहराचा गैरव करणाऱ्या थिमचं रेस्टॉरन्ट आहे म्हंटल्यावर पुढे येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या मेन्यूकार्डमध्येही खास मुंबईची झलक दाखवणारे पदार्थ दिसतील असा एक अंदाज बांधतच आपण पुढचं मेन्यूकार्ड उघडतो आणि आपल्या अपेक्षेनुसारच मुंबईच्या विविधतेचं दर्शन ते मेन्यूकार्ड करुन देतं पण ते ही त्यांच्या खास बम्बय्या पद्धतीनं..एक तर मेन्यूकार्डात आधी स्टार्टर्स कुठलेत हे बघायची आपल्या सगळ्यांची सवय पण इथे मेन्यूकार्डात ना स्टार्टर्स ना मेनकोर्स, त्याऐवजी ‘छोटा’ नावाने स्टार्टर्सचा मेन्यू तर ‘ बडा’ नावाने मेनकोर्स म्हणजे मुख्य जेवणाचा मेन्यू दिसतो, खास बम्बय्या हिंदीतल्या या बडा आणि छोटा या सर्रास वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा असा वापर केलेला बघून गंमत वाटते. जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन स्टार्टर्स बघितल्यावरच लक्षात येतं की मुंबईत प्रामुख्यानं मराठी, गुजराती, दक्षिण भारतीय आणि पारसी खाद्यसंस्कृती रुजली आहे, त्यामुळे खास मुंबईचं नाव असलेल्या या रेस्टॉरन्टमध्ये या प्रत्येक खाद्यसंस्कृतीतल्या मोजक्या पदार्थांना मॉडर्न टच देऊन खवय्यांसमोर सादर केलं जातं..जसा मुंबईच्या कोपऱ्यात कुठेही मिळणारा गुजराती ढोकळा इथे ग्रील करुन तीन वेगवेगळ्या चटण्यांचं टॉपिंग घालून चाटच्या स्वरुपात आपल्या पुढे आणला जातो..तसाच टॅकोज नावाच्या अतिशय प्रसिद्ध अशा मेक्सिकन पदार्थाचं देशी रुप फार रंजक वाटतं..टॅकोज म्हणजे क़ॉर्नच्या पिठाच्या गोलाकार पुऱ्या असतात एरव्ही पण इथे त्यांच्या जागी मेथीचे ठेपले वापरले जातात. पण सगळ्यात गमतीदार आणि वेगळा पदार्थ म्हणजे पाव भाजी पोर्टरहाऊस रोल असं भलंमोठं नाव असलेलं स्टार्टर. हा पदार्थ मागवला की एका गोल तव्यावर सहा एकमेकाला जोडलेले पाव आणि त्याच्याबरोबर छोट्या वट्यामध्ये कांदा, चटण्या अशी एक डिश आणून ठेवली जाते.. पाव तर दिसतात पण भाजी कुठे दिसत नाही, मत एकेक पाव दुसऱ्यापासून कापून वेगळा केला आणि तोडात घातला की लक्षात येतं की पावाच्या आता भाजी आहे..तो स्टफ्ड पाव आहे हे तोंडात जाईपर्यंत लक्षातच येत नाही. या स्टार्टर्सच्या यादीत ‘केजरीवाल टोस्ट’ हा दिल्लीकरांच्या जिव्हाळ्याचा पदार्थ मुंबई स्पेशल रेस्टॉरन्टमध्ये काय करतोय असा प्रश्न मात्र राहून राहून पडतो. त्यांच्या ‘बडा’ सेक्शनमध्येही अशीच मुंबईच्या लाडक्या खाद्यपदार्थांची चवदार सरमिसळ दिसते. मराठी भरली वांगी हैदराबादी ग्रेवीबरोबर सर्व केली जातात तर पंजाबी मा की दाल पारसी पनीरच्या जोडीनी वाढली जाते...साधारणपणे चायनिज रेस्टॉरन्टमध्ये मिळणारा बाम्बू राइस इथे मिळतो, पण त्या बाम्बूतून आपल्या पुढ्यात येते ती खिचडी. ग्रील्ड चिकनबरोबर टोमॅटो आणि चिंचेचं कॉम्बिनेशनही इथली एक स्पेशालिटी आहे. या सगळ्याबरोबरच बन मस्कासारख्या खास बम्बय्या डिशेस म्हणजे इथले न चुकवण्याचे पदार्थ. या वैशिष्ट्यपूर्ण डिशेसबरोबर खाल्ले जाणारे भात आणि रोटीसारखे पदार्थही अगदी वेगळ्याच पद्धतीचे, कोकोनट राईस मागवला तर केळीच्या पानात गुंडाळलेला आईस्क्रीमच्या कोनसारखा भात येतो एका डिशमध्ये, तो पानातून सोडवून मग हवा तसा हवा त्या पदार्थाबरोबर खायचा. जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन मेनकोर्सनंतरचा स्विट डिशचा सेक्शन म्हणजे तर शेफची प्रयोगशाळा वाटावी असा प्रकार, पाच सहाच पदार्थ पण प्रत्येकाचं नाव वाचून अरे असं कसं असे उद्गार बाहेर पडणार..म्हणजे टार्ट दिसतं, पण ते नेहमीचे टार्ट नाही तर कैरीच्या फ्लेवरचं, रसगुल्ला तो ही कॉफीच्या चवीचा, हा रसगुल्ला सर्व्ह केला जातो कॅरॅमल आईस्क्रीमच्या जोडीनं, पण ते आईसक्रीमही गोड नाही तर खारं, आता बोला. गुलाब नट नावाचा गोड पदार्थ तर त्याहूनही भन्नाट, भल्यामोठ्या गुलाबजामचं सॅडविच पण त्यालाही केवळ गुलाबजामची चव नाही तर ओल्ड मॉन्कचीही किंचित चव.. जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन या रेस्टॉरन्टच्या नावातला दुसरा शब्द कॅन्टीन, त्याची सारखी आटवण करुन देतात ते स्टीलचे दोन पुडाचे सजवून ठेवलेले डबे. पाहतांना एक वेळ वाटतं की कदाचित केवळ सजावटीसाठी ठेवलेत की काय इतके मोठे डबे. पण सोमवार ते शुक्रवार दरम्यान  या गजबजलेल्या कमला मिल्समधल्या अनेक कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांसाठी या स्टीलच्या डब्यातून सब्जी रोटी, राईस असा फिक्स मेन्यूदेखील दिला जातो..कॅन्टीनच्या रटाळ जेवणापेक्षा नक्कीच चवदार पर्याय आहे त्या भागातल्या लोकांसाठी. इथली सौम्य आणि मोकळीढाकळी सजावट आणि हसतमुख स्टाफमुळे इथलं वातावरणही अगदी निवांत करणारं आणि शीण घालवणारं झालं आहे त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मजेत पदार्थांचा आस्वाद घेत रिलॅक्स होण्यासाठी नक्कीच उत्तम पर्याय आहे.

जिभेचे चोचले’मधील याआधीचे ब्लॉग :

जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन

जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
ABP Premium

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report :  गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget