एक्स्प्लोर

गुलाम : डेव्हिड गॉलियाथच्या कथेचं पडद्यावरच प्रारूप

'गुलाम' चा पहिलाच सिन मुख्य पात्राची ओळख (Character introduction )करून देण्याच्या दृष्टीने आदर्श म्हणता येईल असा आहे .

डेव्हिड गॉलियाथची कथा जनसामान्यांना आवडते. अजस्त्र , शक्तिशाली , धिप्पाड गॉलियाथला पोरगेल्या डेव्हिडने आसमान दाखवणं लोकांना प्रचंड आवडत . कुठल्याही संघर्षात अंडरडॉगच्या पाठीशी लोकांची सहानुभूती असते. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सर्वसामान्य माणूस स्वतःला कुठंतरी त्या अंडरडॉगमध्ये पाहत असतो. अनेक लेखक दिग्दर्शकांना याची चांगलीच जाणीव आहे. त्यामुळे आपल्या सिनेमातून ते अनेकवेळा डेव्हिड गॉलियाथच प्रारूप दाखवतात .हॉलीवूडवाल्यांची तर यात मास्टरी आहे. अंडरडॉगला नायक बनवून प्रेक्षकांना त्याच्या मागे उभं करण्याचं त्यांचं कसब वाखाणण्याजोगे आहे. आपल्याकडे पण असे सिनेमे बनतात. पण 'गुलाम' चा पहिलाच सिन मुख्य पात्राची  ओळख (Character introduction )करून देण्याच्या दृष्टीने आदर्श म्हणता येईल असा आहे . एक तडफदार वकील फातिमा (मिता वसिष्ठ ) आपल्या अशिलाची पोटतिडीकेने कोर्टात पाठराखण करत आहे . तिचा अशिल सिद्धार्थ मराठे (आमिर खान ) वर एका पोलीस कॉन्स्टेबलवर मारहाण करण्याचा आरोप आहे . फातिमा कोर्टात जीव तोडून पल्लेदार आदर्शवादी युक्तिवाद करत आहे . पण सिद्धार्थला त्याच्याशी काही देणं घेणं आहे असं दिसत नाहीये . त्याचं फातिमाच्या युक्तिवादाकडे लक्षच नाहीये . तो निर्विकारपणे इकडे तिकडे बघत आहे .फातिमा युक्तिवादात गुंतली आहे असं बघून , तो चक्क तिच्या पर्समधून पैसे पण लांबवतो . फातिमाच्या पोटतिडिकीने केलेल्या युक्तिवादामुळे जज शेवटची ताकीद देऊन मामुली दंड आकारून सिद्धार्थ मराठे उर्फ सिध्धूची सुटका करतो . पण सिद्धार्थ फातिमा मॅडमला गृहीत धरतोय फातिमाच्या पर्समधून चोरलेल्या पैशातूनच तो फातिमा मॅडमची फीस देतो .पण फातिमा मॅडमबद्दल त्याच्या मनात नितांत आदर आहे .त्याचा एक मित्र फातिमाबद्दल काही तरी वाईटसाईट बोलतो तर सिद्धार्थ लगेच त्याची कॉलर धरतो . वाया गेलेला आणि मवाली असला तरी सिद्धार्थचीपण स्वतःची काही एक मूल्यव्यवस्था आहे हे प्रेक्षकांच्या लक्षात येते . सिद्धार्थला आपल म्हणता येईल असं जगात एकच रक्ताचं नातं आहे . त्याचा मोठा भाऊ जय (रजित कपूर ). जय म्हणजे रौनक सिंग उर्फ रॉनी (शरत सक्सेना ) या शहरावर राज्य करणारा एक स्वतःच अवैध साम्राज्य असणाऱ्या गुंडाचा उजवा हात असतो . जय आणि सिद्धार्थच्या नात्यात बालपणी घडलेल्या काही घटनांमुळे एक अवघडलेपणा आहे . पण रॉनीला आपल्या उजव्या हाताच्या जयच्या भावाबद्दल जिव्हाळा आहे . धाडधिप्पाड , अजस्त्र ताकदीचा रॉनी पण एकेकाळी बॉक्सर होता . सिद्धार्थ हा रॉनीसमोर किरकोळ वाटत असला तरी तो पण बॉक्सर आहे . या बॉक्सिंग कनेक्शनमुळे रॉनी सिद्धार्थवर जीव टाकत असतो . अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी पण रॉनी सिद्धार्थचा वापर करून घेत असतो .. चित्रपटाच्या अप्रतिम क्लायमॅक्समध्ये जे डेव्हिड गोलियाथ रूपक वापरलं आहे त्यासाठी लहान चणीच्या आमिरसमोर धिप्पाड शरतचं असणं परिणामकारकतेत खूप भर घालत . चित्रपटात रॉनी डेनिमचा शर्ट आणि डेनिमची जीन्स या वेशभूषेत आहे . तो एकदाही शर्ट काढत नाही . पण कधी पण शर्ट फाटून त्याचे डोले शोले दिसू लागतील की काय असं वाटत असत . 'गुलाम' मधला रॉनी हा मध्येच दिलदार असतो , मध्येच उदार . चित्रपटाच्या सुरुवातीच्या सीनमध्ये सिद्धार्थ मस्करीमध्ये त्याला एक ठोसा लगावतो तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर उग्र भाव येतात , पण लगेच तो सिद्धार्थला  त्या पंचबद्दल दाद देतो . पण लोकांच्या मनातली भीती हेच आपल्या शारीरिक सामर्थ्यापेक्षापण आपलं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे हे त्याला पक्क माहित असत . पण फातिमा , जय , रॉनी असे लोक आयुष्यात असले तरी सिद्धार्थ त्याच्या आयुष्यात एका 'फादर फिगर ' ला शोधतोय . त्याला आपल्या आदर्शवादी वडिलांची सतत सय येत असते .बाहेरून उर्मट , बेफिकीर मुखवटा धारण केलेल्या सिद्धार्थच्या आत एक चांगुलपणा दडलेला असतो . रादर , त्यानेच तो आत खोलवर गाडून टाकलेला असतो . पण अशाच एका हातघाईच्या प्रसंगी सिद्धार्थची ओळख होते ती हरीशी .हरी हा रॉनीच्या जुलमाच्या रणगाड्याखाली पिचणाऱ्या जनतेला मदत करण्याचं काम करत असतो .हरीचा आदर्शवाद आणि त्याची अन्यायाविरुद्धची तळमळ बघून सिद्धार्थला आपल्या आदर्शवादी वडिलांची  आठवण येत असते .हरी रॉनीच्या जुलमाने ग्रासलेल्या जनतेला आणि पर्यायाने जयविरुद्ध उठवण्याचा प्रयत्न करत असतो .याची जाणीव असून पण सिद्धार्थ आणि हरीमध्ये चांगली मैत्री होते . सिद्धार्थ हरीला समजावतो की रॉनीच्या विरोधात उभा राहू नकोस , हकनाक जीव गमावशील . पण हरी रॉनीची भीती लोकांच्या मनातून काढून टाकण्यास कटिबद्ध होता .गल्लीतल्या दादापासून ते देशाला ताकदीने हाकणाऱ्या हुकूमशहाला लोकांच्या मनात आपल्याबद्दल असलेली भीती हेच मुख्य अस्त्र आहे याची जाणीव असते . रॉनी पण याला अपवाद नसतो .रॉनीला हरीच्या हत्येच्या केसमध्ये कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावण्यासाठी फातिमा रॉनीच्या बालेकिल्ल्यात येते तो प्रसंग टेन्शन बिल्डिंगच्या दृष्टीने आदर्श आहे . रॉनीचा क्रोध सिद्धार्थ मराठेवर कोसळतो . रॉनीच्या रागातून सिद्धार्थचा भाऊ जय पण वाचत नाही . आपल्या रॉनीशी एकनिष्ठ असणाऱ्या भावाचा पण रॉनीने बळी घेतल्याचं पाहून सिद्धार्थ रॉनीला लढतीच आव्हान देतो . शेवटची लढाई रॉनीच्या बालेकिल्ल्यातच होते . रस्त्यावर . शोषक आणि शोषित प्रेक्षक असताना धिप्पाड रॉनी आणि त्याच्यासमोर किरकोळ भासणारा सिद्धार्थ यांच्यात लढाई सुरु होते . ही लढाई अर्थातच क्रूर , रक्तरंजित असते . . पण शेवटी डेव्हिडचं जिंकतो . सिद्धार्थ मराठे रॉनीच्या बालेकिल्ल्यातच रॉनीची दहशत संपवतो . 'गुलाम ' वर अनेक चित्रपटांचा सरळ सरळ प्रभाव आहे . महेश भट्टच्या 'कब्जा ' शी तर कथानकाच्या पातळीवर अनेक साधर्म्य आहेत . पण स्टोरी नॅरेशनच्या पातळीवर पण राज संतोषींच्या 'घायल ' चा आणि चोप्रांच्या 'दिवार ' चा काही प्रमाणात प्रभाव जाणवतो . सिद्धार्थचं त्याच्या भावाशी असणार नातं हे फार सुंदर आहे . त्यांचे जगात नसलेले आदर्शवादी (?) वडील आणि त्यांच्या भूतकाळातली भूत त्यांच्या नात्यात ठाण मांडून बसलेली आहेत . त्यातून त्यांच्या नात्यात एक अवघडलेपण आलं आहे . पण अनेक तात्विक मतभेद , हे अवघडलेपण असून पण त्यांच्यात जे एक निर्व्याज प्रेम आहे ते फार सुंदर दाखवलेलं आहे .रजित कपूर (व्योमकेश बक्षी फेम ) यान रॉनीशी असणारी त्याची निष्ठा आणि छोट्या भावाबद्दल वाटणार प्रेम याच्यामुळे त्याच्या मनात जे अंतरद्वंद्व  निर्माण होत ते फार अप्रतिमपणे दाखवलं आहे .आदर्शवादी वकिलाच्या भूमिकेत मिता वसिष्ठने पण फार छान काम केलं आहे .चांगल्या चित्रपटाला किमान एक तरी ठिगळ असतंच . इथं पण ते आहे ते सिद्धार्थच्या प्रेमकहाणीच्या रूपाने . राणी मुखर्जीचा हा ट्रॅक अतिशय अतिशय अनावश्यक आहे . चित्रपटाच्या चांगल्या गतीला ब्रेक लावण्याचं काम हा ट्रॅक इमानेइतबारे करतो . पण भारतीय प्रेक्षक हा प्रेमाचा भुकेला आहे असा गैरसमज इतरांप्रमाणे दिग्दर्शक विक्रम भट्टचा पण झाला असावा . 'गुलाम ' हा माझा अतिशय आवडता चित्रपट . त्याला आमिरच्या सिद्धार्थ  इतकाच शरत सक्सेनाचा रॉनी हा खलनायक पण कारणीभूत आहे .लोकांच्या मनातली आपली भीती अजून बळकट करण्यासाठीच शेवटी तो सिद्धार्थला भरचौकात वन ऑन वन फाईट करण्याचं आव्हान देतो . त्या आव्हानात पण या पाच फुटाच्या पोराला सहज चिरडून टाकू हा आत्मविश्वास असतो . धिप्पाड शरतला हा आत्मविश्वास शोभून दिसतो . शेवटी आमिर त्याला धुतो ते फारस विश्वसनीय वाटत नाही . पण 'गुलाम ' हा चित्रपट जबरदस्त होण्यात शरतचा आमिरइतकाच मोठा वाटा आहे असं म्हंटल तर कुणाला हरकत असेल असं वाटत नाही .शरत हा चार दशकांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला तेंव्हा नायक हा पिळदार शरीरयष्टीचा असू शकतो हि संकल्पनाच अस्तित्वात नव्हती . त्याचा फटका नायक बनण्यासाठी आलेल्या शरतला बसला .त्याला सातत्याने खलनायकाच्या भूमिका मिळत गेल्या . सुरुवातीला त्याला साईड किकच्या भूमिका मिळायच्या .पण त्यात पण शरत छाप सोडून जायचा . शरतला कॉमेडीचं उत्कृष्ट अंग आहे . त्याचा 'मिस्टर इंडिया ' मधला डागा आठवत असेल . हनुमानाच्या मूर्तीच्या आडून मिस्टर इंडिया जेंव्हा डागाची धुनाई करतो तेंव्हाचा त्याचा अभिनय बघा . अब्बास मस्तानच्या बहुतेक चित्रपटांमध्ये 'बादशहा ' 'सोल्जर ' , 'खिलाडी ' मध्ये त्याने मस्त कॉमेडी केली आहे . 'बादशहा ' मध्ये तो कुत्र्यांना जाम घाबरत असतो .पण शरत सगळ्याच प्रकारच्या भूमिका चांगल्या करतो . 'साथिया ' मधला त्याने रंगवलेला राणी मुखर्जीचा बाप फार सुंदर आहे . 'मेरी बेटीया मेरा गुरुर है ' असं अभिमानाने सांगणारा बाप पोरीने आपल्या मर्जीविरुद्ध लग्न केलं आहे हे कळताच कोसळतो . मुलीवर प्रचंड प्रेम असून पण तिच्याकडे आयुष्यभरासाठी तोंड फिरवतो . साथिया असाही माझा आवडता आहे . शरतच्या अभिनयाचा त्यात मोठा वाटा आहे . 'प्यार के साईड इफेक्टस ' मधला आपल्या मुलीला डिझर्व करत नाही म्हणून राहुल बोसवर खार खाऊन असणारा बाप पण मस्त . 'बजरंगी भाईजान ' मधला करीना कपूरचा बाप आणि 'हंसी तो फसी ' मधला सिद्धार्थ मल्होत्राचा संशयी बाप पण भारी . शरत हा बॉलिवूडमधला सगळ्यात जास्त शिकलेला खलनायक असावा . त्यानं इंजिनियरिंग पूर्ण केलं आहे . आज शरत साठीच्या पुढं आहे . मात्र अजूनही त्याची शरीरयष्टी आदर्श म्हणावी अशी आहे . आज इंडस्ट्रीमध्ये चार दशक घालवल्यावर पण शरत सक्सेना म्हंटल की 'गुलाम ' मधला रॉनी डोळ्यासमोर उभा राहतो . पण तुलनेने शरत सुदैवी म्हणावा लागेल . अनेक लोकांना इथं वर्षानुवर्षे घालवून पण एक लाइफटाइम रोल मिळाला नाही . 'गुलाम ' मधला तो क्लायमॅक्सचा सीन माझ्यासाठी स्ट्रेसबस्टर आहे . अनेक लोकांना तो त्यातल्या रक्तपातामुळे अमानुष वाटू शकतो ,तरी पण . सिद्धार्थ  रॉनीच आव्हान स्वीकारतो आणि त्याच्यावर पहिला हल्ला चढवतो . दोन तीन ठोसे पण मारतो . नंतर रॉनीच्या हातचा मरणाचा मार खातो . हा टिपिकल हिंदी चित्रपट आहे आणि यात शेवटी आमिरचा नायकच जिंकणार आहे हे माहित असून पण प्रेक्षकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागते . हेच शरतच्या अभिनयाचं यश . त्या सीनच्या शेवटी लोकांच्या मनातली आपली दहशत संपली आहे हे कळताच रॉनी उन्मळून पडतो .भ्रमिष्ट होतो . चित्रपटात शेवटी रॉनी हरतो पण शरत सक्सेना जिंकतो . Story of Sharat's life . दिग्दर्शक विक्रम भट्ट आयुष्यभर काका महेश भट्टच्या सावलीत वावरला . त्याच्या दीर्घ कारकिर्दीत त्याने लक्षात राहतील असे मोजकेच चित्रपट केले आहेत . त्यातला सर्वाधिक भावलेला अर्थातच 'गुलाम '. दुसरा 'राज '. अंगात गुणवत्ता असून पण एवढं कमी काम त्याच्या नावावर का आहे , याचं आश्चर्य वाटत . बाजारपेठेला शरण जाण्याच्या त्याच्या वृत्तीची झलक तशी 'गुलाम ' आणि 'राज ' मध्ये पण जाणवतेच . पण या सिनेमात याबाबतीत त्याने स्वतःला नियंत्रणात ठेवलं असावं . बाकीची त्याची बहुतेक कारकीर्द त्याच्या पुरेशा न्याय न दिलेल्या गुणवत्तेची गवाही देते . सिनेमांचा लोकांवर पडणारा प्रभाव हा किती प्रमाणात आहे यावर अनेकदा वादविवाद होत असतात .पण लोकांना आपला सिनेमा मनोरंजन तर देतोच पण होप /आशा पण देतो असा अनुभव आहे .सर्वसामान्य माणसासमोरच्या रोजच्या आयुष्यातले अटीतटीचे संघर्ष , दैनंदिन समस्या , अन्यायकारक व्यवस्था या त्याला गॉलियाथसारख्याच अक्राळविक्राळ भासत असतात . पण आपण त्याच्यावर मात करू शकू असा दुर्दम्य आशावाद पण तो बाळगून असतो . असा आशावाद बाळगण्याशिवाय त्याच्या हाती पर्याय तरी काय असतो म्हणा ? मग सर्वसामान्य माणूस डेव्हिड गॉलियाथची प्रतीकात्मक मांडणी करणाऱ्या कलाकृतींच्या पण प्रेमात असतो . कारण या कलाकृती त्याला रोजच्या समस्यांशी भिडण्याचं बळ देत असतात . 'गुलाम ' मधल्या रॉनीच्या साम्राज्याला आव्हान देणाऱ्या सिद्धार्थ मराठेने पण अनेक लोकांना त्या काळात कसली तरी प्रेरणा दिली असलेच . अशा गोष्टींचा आकडेवारीनुसार हिशोब ठेवणं शक्य नसत . पण ते चांगलंच आहे . नाहीतर आकडेवारीच्या जंजाळात अनेक चांगल्या गोष्टी अडकून जातात आणि नंतर भेसूर दिसायला लागतात . 'गुलाम ' ने किंवा एकूणच भारतीय सिनेमाने किती लोकांना उमेद /आशा दिली याचा हिशोब नाही हे एका अर्थाने बरच आहे त्या अर्थाने . लोकांना उमेद देणारे 'गुलाम ' सारखे सिनेमे सतत येणं आजच्या भयानक सामाजिक -राजकीय परिस्थितीत गरजेचं आहे .
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget