एक्स्प्लोर

तितली : वेदनांचा पॅन्डोरा बॉक्स

'तितली' ही तीन भावांची गोष्ट आहे. भावनांवर नियंत्रण नसणारा आणि परिवाराला आपल्या दहशतीखाली ठेवणारा विक्रम (रणवीर शौरी), त्यातल्या त्यात थोडं डोकं ताळ्यावर असणारा आणि विचार करु शकणारा बावला (अमित सियाल ) आणि आजूबाजूच्या नरकातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारा धाकटा तितली (शशांक अरोडा )

'तितली ' बघताना प्रेक्षक सतत आपल्या खुर्चीमध्ये अस्वस्थपणे चुळबुळ करत असतो. हा चित्रपट बोर करणारा आहे म्हणून नव्हे, तर पडद्यावर जे काही चालू आहे ते त्याच्या अंगावर धावून यायला लागतं म्हणून. सहन होत नाही म्हणून. 'तितली'मधला हिंसाचार फक्त शारीरिक नाही. किंबहुना तो जास्त मानसिक आहे. एखाद्या चिघळलेल्या जखमेत कर्कटक घुसवून ते गोल गोल फिरवलं तर कशा वेदना होतील तशा वेदना या चित्रपटात ठायी ठायी दिसतात. 'तितली'च्या बहुतेक 'फ्रेम'मध्ये अनेक दिवस अंगाला पाणी न लावणारे, दात घासताना ओंगळवाणे आवाज करणारे, वचावचा जेवणारे, कुणाचेही रक्त काढण्यास मागेपुढे न पाहणारे लोक दिसतात. मोठमोठे 'मॉल्स', अर्धवट अजस्त्र बांधकामे, एक चकचकीत जग थोड्या वेळापुरत दिसतं. त्याने पडद्यावर एक हवाहवासा विरोधाभास तयार होतो. बराचसा शरद जोशींच्या 'इंडिया' आणि 'भारत' ह्या थियरीची आठवण करुन देणारा. 'तितली' मधलं प्रत्येक पात्र हे डार्क 'ग्रे' आहे. प्रत्येकाचा स्वतःचा गडद भूतकाळ आहे आणि कुणीही आयुष्यात आनंदी नाही. प्रत्येकाला ते सध्या जिथे आहेत तिथून पळायचं आहे. त्यासाठी कुठलीही किंमत मोजायची पण त्यांची तयारी आहे. इथे कुणाचेही कुणावर प्रेम नाही. कुणाच्याही कुणाबद्दल हळव्या भावना नाहीत. त्यांना फक्त आपल्या अस्थिर, आर्थिक अभावग्रस्त आणि दुर्गंधीने भरलेल्या जगातून बाहेर पडायचे आहे. 'तितली' ही तीन भावांची गोष्ट आहे. भावनांवर नियंत्रण नसणारा आणि परिवाराला आपल्या दहशतीखाली ठेवणारा विक्रम (रणवीर शौरी), त्यातल्या त्यात थोडं डोकं ताळ्यावर असणारा आणि विचार करु शकणारा बावला (अमित सियाल ) आणि आजूबाजूच्या नरकातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारा धाकटा तितली (शशांक अरोडा ). हे तिघं जण दिल्लीमधल्या एका बकाल वस्तीत आपल्या पॅरा साईट  बापासोबत (ललित बहेल)  रहात असतात. दिवसा सटर फटर काम करून रात्री तिघं भाऊ 'गश्त पे' जात  असतात. निर्मनुष्य रस्त्यावर लोकांच्या गाड्या अडवून लुटमार करणे हा त्यांचा मुख्य धंदा असतो. तितलीला ह्या सगळ्याची किळस असते.  त्याला आपल्या परिवारापासून दूर कुठेतरी शांत स्थिर आयुष्य जगायचं असतं. त्यासाठी पैशांची जमवाजमव पण करत आहे. मात्र एका अपयशी दरोड्याच्या प्रयत्नानंतर तितली आणि बावला पोलिसांच्या तावडीत सापडतात. अनेक खटपटी करून ते सुटतात पण मुश्किलीने जमवलेले तितलीचे पैसे पोलिसांच्या ताब्यात जातात. विचारी बावला आपण धंद्यात मागे पडत आहोत कारण आपल्या टोळीमध्ये 'लौण्डिया ' नाही असं मत मांडतो. 'अंडरवेयर से लेके कार तक लोग लौण्डिया दिखाके बेचते है.' हा त्याचा युक्तिवाद विक्रमला पण पटतो. मग तितलीचं लग्न लावून देण्याचं ठरतं. तितलीशी लग्न करुन सुंदर, सुशिक्षित आणि 'रिस्पेक्टेड' परिवारातील नीलू (शिवानी रघुवंशी) त्यांच्या घरात येते. तिच्यापासून अर्थातच अनेक गोष्टी लपवण्यात आलेल्या आहेत. निलूचापण स्वतःचा 'भूतकाळ' आहे. ती तितलीपेक्षा प्रत्येक बाबतीत सरस आहे. तरीपण तिने तितलीशी लग्न का केलं याच उत्तर तिच्या या भूतकाळात दडलेलं आहे. हे भाऊ तिच्या मनाविरुद्ध तिचा 'गळ' म्हणून वापर करून लुटमार करायला लागतात. त्यामुळे ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागते. तिच्यासारखाच हेतू असणाऱ्या तितलीशी ती एक डील करते. त्याबदल्यात तितली तिची या नरकातून सुटका करण्याचं आश्वासन देतो. ती डील काय असते, तितली आणि नीलू त्या नरकातून बाहेर पडतात का, ही शोकांतिका आहे का दुखांतिका या प्रश्नांची उत्तर चित्रपट पाहताना मिळतात. आदित्य चोप्रा, दिबांकर बॅनर्जी अशी मोठी मोठी नाव 'तितली'शी निगडीत आहेत. पण हा चित्रपट फक्त दिग्दर्शक कानू बहेलचा आहे. बॉलिवूडसारख्या जास्त करुन पलायनवादी सिनेमे बनवणाऱ्या आणि स्वप्न विकणाऱ्या इंडस्ट्रीत अशी कंटेंटच्या दृष्टीने धाडसी फिल्म बनवण्याची हिम्मत अनेक तालेवार दिग्दर्शक पण दाखवू शकणार नाहीत. चित्रपटाची पटकथा खूप बांधीव आहे आणि एका क्षणासाठी पण भरकटत नाही. चित्रपटाची पटकथा स्वतः कानू बहेलने, शरत कटारियासोबत (दम लगा के हैशा सारखा सुंदर चित्रपट देणारा दिग्दर्शक) लिहिली आहे. चित्रपटातले काही प्रसंग अतिशय वास्तववादी चित्रिकरणामुळे अंगावर शहारे आणतात. नीलूचा वापर करुन भावांचं टोळकं जी पहिली लूटमार करतं, तो प्रसंग किती लोकांना त्यातील भयानक हिंसेमुळे, रक्तपातामुळे आणि या सगळ्याला नीलूने दिलेल्या शारीरिक-मानसिक प्रतिसादामुळे बघवला जाईल याबद्दल काही शंका आहेत. निलूला सांगून तितली काही अपरिहार्य कारणामुळे तिच्या हाताचे हाड मोडतो तो प्रसंग पण असाच. 'तितली'मध्ये एक हळूवार फुलणारी प्रेमकथा पण आहे. बॉलिवूडच्या चौकटीत न बसणारी.  तिला सुरुवात किंवा मध्य नाही पण एक छान अपारंपरिक शेवट मात्र नक्की आहे. सगळ्याच अभिनेत्यांनी आपल्या भूमिकांचं सोनं केलं आहे. पण हा चित्रपट जितका तितलीच्या भूमिकेतल्या शशांक अरोडाचा आहे तितकाच विक्रमच्या भूमिकेमधल्या रणवीर शौरीचा पण आहे. भडक, भावनांवर नियंत्रण नसणारा आणि कुणाचंही रक्त काढण्यात मागेपुढे न पाहणारा विक्रम रणवीर शौरीने अफलातून साकारला आहे. विझलेल्या डोळ्यांचा आणि आत काहीतरी मरुन गेलेल्या तितलीची भूमिका शशांक अरोडाला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिली होती की काय असा प्रश्न पडावा इतक्या सहजतेने तो भूमिकेत विरघळून गेला आहे. शिवानी रघुवंशी आणि अमित सियाल यांनी त्यांना तोलामोलाची साथ दिली आहे. 'सत्या' किंवा 'अग्ली' सारख्या चित्रपटात मुंबई शहर हेच एक महत्वाचं पात्र होतं. 'तितली 'मध्ये दिल्ली शहर ही एक महत्वाची भूमिका बजावतं. अर्धवट अजस्त्र बांधकाम, मोठमोठे फ्लायओवर्स, चिंचोळ्या गल्ल्या, साचलेली डबकी, माणसाला त्याची स्पेस नाकारणाऱ्या  कोन्दट वस्त्या अशी दिल्लीची विविध रूप सिद्धार्थ दिवाणच्या लेन्समधून दिसतात. पॅन्डोरा बॉक्स नावाची एक ग्रीक दंतकथा आहे. या बॉक्समध्ये म्हणे जगातल्या सगळ्या वेदना आणि दुःख भरलेली होती. पॅन्डोरा नावाच्या म्हातारीने हा बॉक्स उघडला आणि सगळी दुःख डब्ब्याच्या बाहेर प्रत्यक्ष जगात आली. आपल्या चुकीची जाणीव होऊन म्हातारीने धडपडून तो बॉक्स बंद केला. पण त्यामुळे चांगलं काही घडण्याची आशा (होप) मात्र बॉक्स मध्येच राहून गेली. त्या अर्थाने ही दंतकथा माणसांच्या वेदनांची आणि निराशावादाची. कानू बहेलने 'तितली' बनवून हा पॅन्डोरा बॉक्स पुन्हा उघडला आहे. सहन होणार असेल तर नक्की बघा. अमोल उदगीरकर यांच्या लेखमालिकेतील आधीचे ब्लॉग
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget