एक्स्प्लोर
खादाडखाऊ : पुण्यातील सर्वात बेस्ट 'ठक्कर' दाबेली
ठक्करांच्या दाबेलीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यात ते स्वतः बनवलेला कच्छी मसाला वापरतात. माझ्या मते, त्यांच्या चवीची तिच USP आहे. फक्त इथेच न थांबता प्रत्येक दाबेलीत मसाला भरल्यानंतर त्या दाबेलीवर जाड पोळपाट ठेवून, आतले मिश्रण पावाबरोबर एकजीव करुन घेतात. त्यानंतर त्या मिश्रणात शेव आणि ऑर्डरप्रमाणे चिज भरले जाते.

पुण्यात 80 च्या दशकात पहिल्यांदाच कच्छी दाबेली सुरु करणाऱ्या रास्ता पेठेतल्या ठक्कर बंधूंच्या 'जय जलाराम' दाबेलीबद्दल मागे 'Abp माझा ' वर ब्लॉग लिहिला होता. सहज सांगायचं म्हणून,ठक्कर बंधूं गेले अनेक वर्ष चरितार्थासाठी फक्त आणि फक्त दाबेलीच विकतात. आठवड्याची सुट्टी वगैरे न घेता दररोज दुपारी गाडीवर दाबेली विकायला सुरुवात करतात. सहसा संध्याकाळी 7.30 पर्यंत रोजचा ताजा माल संपवून घरी परत जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने तयारी करुन पुन्हा गाडीवर उभे रहातात.
ठक्करांच्या दाबेलीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यात ते स्वतः बनवलेला कच्छी मसाला वापरतात. माझ्या मते, त्यांच्या चवीची तिच USP आहे. फक्त इथेच न थांबता प्रत्येक दाबेलीत मसाला भरल्यानंतर त्या दाबेलीवर जाड पोळपाट ठेवून, आतले मिश्रण पावाबरोबर एकजीव करुन घेतात. त्यानंतर त्या मिश्रणात शेव आणि ऑर्डरप्रमाणे चिज भरले जाते.
ह्या वेगळेपणामुळे ही दाबेली खाण्याबरोबरच ती करताना बघणे हाही एक झकास अनुभव असतो, असं मला वाटतं.
त्यांच्या स्टॉलवरची दाबेली बघून, ब्लॉगच्या नियमित वाचकांपैकी अनेकांना तशी दाबेली घरी किंवा आपल्या फूड जॉईंटवरही करुन बघता येईल. म्हणूनच त्यांच्या ट्रेंडसेटर दाबेलीबद्दल आधी ब्लॉग लिहिलेला असूनही पुन्हा हा छोटासा व्हिडियो ब्लॉग केलाय.
व्हिडियो ब्लॉगचा माझा हा पहिलाच उत्स्फूर्त प्रयोग असल्याने ह्यात काही छोट्यामोठ्या उणीवा राहून गेल्या आहेत.त्या सांभाळून घ्याल ह्याची खात्री आहे.
जय जलाराम कच्छी दाबेली

- अपोलो टॉकीज- केईएम हॉस्पिटल रस्ता,रास्ता पेठ,पुणे
- वेळ : दररोज दुपारी 3 ते जास्तीत जास्त रात्री 8 पर्यंत
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
करमणूक
मुंबई