News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

वीज बिलांबाबत सरकारने योग्य भूमिका न घेतल्यास रस्त्यावर उतरू, भाजप खासदार रक्षा खडसेंचा इशारा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला सातत्याने आंदोलन करण्याची गरज पडत आहे. कारण भाजप ही वैयक्तिक फायद्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहेत, असं रक्षा खडसे यांनी सांगितलं.

FOLLOW US: 
Share:

जळगाव : वीज बिलात सवलत देण्याची भाषा करणाऱ्या राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता आपला शब्द फिरवला आहे. याविरोधात भाजप नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. वीज ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, सरकारनं याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास जनहितासाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देखील भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिला आहे.

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, जेवढं बिल आलेलं आहे, तेवढं बिल ग्राहकांना भरावच लागेल असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. ऊर्जामंत्र्यांचं वक्तव्य सपशेल चुकीचं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं बिल माफ करू, असं राज्यातील जनतेला आश्वासन दिलं होतं. मात्र नितीन राऊत हे एक चांगले नेते आहे, त्यांनी आपला शब्द फिरवायला नको होता. संपूर्ण वीज बिल माफ करू शकले नसले तरी काही प्रमाणात ग्राहकांना सवलत द्यायला हवी, अशी मागणी रक्षा खडसे यांनी यावेळी केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला सातत्याने आंदोलन करण्याची गरज पडत आहे. कारण भाजप ही वैयक्तिक फायद्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहेत, असं रक्षा खडसे यांनी सांगितलं.

वीज बिलावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप; फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार

वीजबिलात सवलत देण्याची भाषा करणाऱ्या ऊर्जामंत्र्यांनी आता आपला शब्द फिरवला. याविरोधात विदर्भवाद्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 7 डिसेंबरला विदर्भात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विदर्भवादी ठिय्या आंदोलन करणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात ऊर्जा विभागानं अवास्तव बिलं पाठवली आहेत. यावर विरोधी पक्षांनी आंदोलन केली, संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यामुळे वीज बिलात सवलत देऊ असा शब्द ऊर्जामंत्र्यांनी दिला होता. मात्र, आता अचानक ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवला.

वीज बिल सवलतीवरून महाविकास आघाडीत नाराजी, काँग्रेस मंत्र्यांना अपेक्षित निधी मिळत नसल्याची भावना

वीज बिल सवलतीवरून महाविकास आघाडीत नाराजी, काँग्रेसच्या खात्यांना अपेक्षित निधी मिळत नसल्याची भावना
Published at : 18 Nov 2020 10:58 PM (IST) Tags: Light bill issue MP Raksha Khadse nitin raut BJP

आणखी महत्वाच्या बातम्या

Nashik : नाशकात भाजपला मोठा धक्का! अंतर्गत गटबाजीमुळे दोन उमेदवारांचे अर्ज बाद; सुधाकर बडगुजरांच्या घरातील तीन अर्ज वैध

Nashik : नाशकात भाजपला मोठा धक्का! अंतर्गत गटबाजीमुळे दोन उमेदवारांचे अर्ज बाद; सुधाकर बडगुजरांच्या घरातील तीन अर्ज वैध

पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?

पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?

खैरे साहेबांनी मार्क केलेल्या लोकांना तिकिट दिलंय, आमच्यात कोणताही वाद नाही, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

खैरे साहेबांनी मार्क केलेल्या लोकांना तिकिट दिलंय, आमच्यात कोणताही वाद नाही, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

Anandraj Ambedkar VIDEO : ठाकरे बंधूंनंतर आंबेडकर बंधूही एकत्र येणार? 'माझा त्याला प्रतिसाद असेल', आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Anandraj Ambedkar VIDEO : ठाकरे बंधूंनंतर आंबेडकर बंधूही एकत्र येणार? 'माझा त्याला प्रतिसाद असेल', आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

भारतीय हवामान विभागात नोकरी मिळवायचीय? नेमकी काय आहे प्रक्रिया? किती मिळतो पगार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

भारतीय हवामान विभागात नोकरी मिळवायचीय? नेमकी काय आहे प्रक्रिया? किती मिळतो पगार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

टॉप न्यूज़

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार

मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप

Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप