Yearly Numerology 2025 : 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष 2025? जाणून घ्या भविष्य
Yearly Numerology 2025 Of Mulank 2 : ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 2 असतो.
Yearly Numerology 2025 Of Mulank 2 : 2024 वर्ष सरत्या मार्गावर आहे. तर, नवीन वर्षाचं (New Year) स्वागत करण्यासाठी आपण सारेच सज्ज आहोत. पण हे नवीन वर्ष आपल्यासाठी नेमकं कसे असेल? याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं कुतूहल असतं. अंकशास्त्रानुसार कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष लकी असणार आहे हे आपण जाणून घेऊयात.
सर्वात आधी 2025 हे वर्ष मूलांक 9 दर्शवते. मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ग्रह हा वर्चस्व स्थापित करणारा ग्रह मानला जातो. हा ग्रह साहस, संपन्नता, आग, ऊर्जा आणि क्रोध, आक्रमकतेचं प्रतिनिधीत्व करतो.
या ठिकाणी आपण मूलांक 2 असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेऊयात. सर्वात आधी ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 2 असतो. त्यामुळे 2025 हे वर्ष मूलांक 2 साठी कसं असेल ते जाणून घेऊयात.
कशी असेल लव्ह लाईफ? (Yearly Luv Life Numerology 2025)
मूलांक 2 असणाऱ्या लोकांची लव्ह लाईफ सामान्य असणार आहे. नवीन वर्षात तुमच्या व्यवसायात अचानक तुम्हाला वृद्धी जाणवेल. त्यामुळे तुमचा कल व्यवासायाकडे जास्त असेल. तसेच, ज्या लोकांचे नवीन वर्षात विवाहाचे मुहूर्त आहेत त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम काळ असणार आहे. कारण मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे नात्यातील वाद दूर होतील.
कसं असणार करिअर? (Yearly Career Numerology 2025)
नोकरी, व्यवसाय, धन, सुख-संपत्तीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन वर्षात तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे. तुमच्या बौद्धिक क्षमतेत चांगली वाढ होईल. तसेच, जे लोक पर्यटन, लेखन, अभिनय, नृत्य, कलेशी संबंधित जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा सुवर्णकाळ असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तरुणांना देखील परदेशात जाण्याची संधी मिळेल.
कशी असेल आर्थिक स्थिती? (Yearly Wealth Numerology 2025)
आर्थिक दृष्टीकोनातून बोलायचं झाल्यास, नवीव वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचं असणार आहे. तुमच्याकडे पैशांची कमतरता नसणार आहे. या दरम्यान, तुमचं आर्थिक उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही नवीन प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल.
कसं असेल आरोग्य? (Yearly Health Numerology 2025)
आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या तब्येतीत अनेक चढ-उतार जाणवू शकतात. याचं कारण म्हणजे मंगळ ग्रहाचं प्रभुत्व असल्या कारणाने मानसिक तणाव जाणवू शकतो. तर, चंद्राचा प्रभाव देखील असल्यामुळे स्वभावात शीतलता, शांतपणा जाणवेल. या वर्षात तुम्ही तुमच्या वेळेच नियोजन करणं गरजेचं आहे. कारण तुमचं आरोग्य, तुमचं मन आणि तुमचा आहार या तिन्ही गोष्टींचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :