World Cup 2023 Final : क्रिकेट विश्वचषक 2023 'भारत' जिंकणार का? विराट कोहलीची भूमिका काय असेल? ज्योतिषशास्त्रीय गणिते सांगतात....
World Cup 2023 Prediction : क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. ज्योतिषशास्त्रीय गणिते काय सांगतात? जाणून घ्या..
World Cup 2023 Prediction : सध्या प्रत्येकाच्या मनात एकच चर्चा आहे की, 2023 चा क्रिकेट विश्वचषक कोणता संघ जिंकणार? भारत विश्वचषक मिळवण्यात यशस्वी होईल की ऑस्ट्रेलियन संघ पराभूत होईल? ज्योतिषशास्त्रीय गणिते काय सांगतात?
भारत-ऑस्ट्रेलिया सामना सर्वांसाठी खूप महत्त्वाचा
भारतीय संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर संपूर्ण विश्वचषकादरम्यान भारतीय संघाने समोरच्या संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे आणि त्यामुळेच हा सामना सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. यासह, ऑस्ट्रेलियन संघ पहिले दोन सामने गमावल्यानंतर आणि उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर सर्व सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे, तो विश्वचषक अंतिम फेरीत भारताचा मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून उभा आहे.
भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात विराट कोहलीची महत्त्वाची भूमिका
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, हा विश्वचषक अंतिम सामना एक अतिशय प्रेक्षणीय सामना असणार आहे, ज्यामध्ये भारताला वेगवान सुरुवातीनंतर पराभवाचा सामना करावा लागू शकतो. विराट कोहली आणखी एक शतक झळकावून नवा विक्रम प्रस्थापित करेल आणि या विश्वचषकात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, तरी या सामन्यात गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असणार आहे आणि फिरकी गोलंदाजांची भूमिका अतिशय मजबूत असणार आहे. या सामन्यात हवामानाचाही परिणाम दिसून येऊ शकतो आणि जर हवामानामुळे खेळ थांबवला गेला नाही, तर भारत हा सामना जिंकण्याची शक्यता जास्त आहे. या सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी होण्याची शक्यता आहे.
भारत हा सामना जिंकण्याची शक्यता जास्त
रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेंकाविरोधात भिडणार आहेत. दोन्ही संघ भन्नाट फॉर्मात आहेत, त्यामुळे फायनलचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने लागोपाठ दहा सामन्यात विजय मिळवलाय, तर ऑस्ट्रेलियाने आठ सामन्यात बाजी मारली आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स प्रमुख भूमिका बजावू शकतात, तर भारताकडून रोहित शर्मा आणि वेगवान सुरुवात करणाऱ्या शुभमन गिल यांच्याशिवाय विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार. यादव आणि जसप्रीत बुमराह मुख्य भूमिकेत आहेत.आणि मोहम्मद शमी प्रमुख भूमिकेत खेळाडू बनू शकतात. हा विश्वचषक भारताचा विश्वचषक होऊ शकतो, असे म्हणता येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: