(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी येणारा आठवडा भाग्याचा; अनेक शुभ योगासाह वेळोवेळी मिळतील 'हे' संकेत
Weekly Numerology : हा आठवडा अनेक जन्मतारखेच्या लोकांसाठी खास असणार आहे. या आठवड्यात काही लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल.
Weekly Numerology : येत्या 29 एप्रिलपासून एप्रिल (April) महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होतेय. हा आठवडा अनेक जन्मतारखेच्या (Numerology) लोकांसाठी खास असणार आहे. ज्योतिषशास्त्रात, संख्यांना, अंकशास्त्र, मूलांकाला (Moolank) फार महत्त्व आहे. यानुसार देखील व्यक्तीचा स्वभाव, त्याचं भविष्य वर्तविलं जातं. त्यानुसार येणाऱ्या नवीन आठवड्यात काही लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी हा आठवडा लकी ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
मूलांक 3 (Moolank 3)
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3,12,21 आणि 30 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक संख्या 3 आहे. मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी येणारा आठवडा फार लाभदायी ठरणार आहे. या मूलांकाच्या लोकांची करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. काही लोकांसाठी नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांना पुढच्या आठवड्यात गुरुच्या कृपेने मान-सन्मान मिळेल. जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. या आठवड्यात तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकता. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगलं यश मिळेल.
मूलांक 5 (Moolank 5)
कोणत्याही महिन्याच्या 5,14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 5 असते. त्यानुसार, या आठवड्यात तुम्हाला करिअरच्या बाबतीत काही सकारात्मक बातमी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. अचानक धनप्राप्ती होईल. तुमच्या कुटुंबात देखील आनंदी वातावरण असेल. तुमचं जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी हा आठवडा नक्कीच फलदायी ठरणार आहे.
मूलांक 9 (Moolank 9)
जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9,18 आणि 27 तारखेला झाला आहे तर तुमचा मूलांक 9 आहे. या आठवड्यात तुम्हाला पैसे कमावण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. अनेक नवीन योजनांवर तुम्ही काम कराल. या आठवड्यात तुम्ही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढेल. निर्णयक्षमता चांगली दिसून येईल. तसेच, कुटुंबात सुद्धा वातावरण आनंदी असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: