Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी नोव्हेंबरचा पहिला आठवडा कसा असणार? कोणत्या राशींना होईल धनलाभ? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 3 To 9 November 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 3 To 9 November 2025 : हिंदू कॅलेंडरप्रमाणे, उद्यापासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या आठवड्यात अनेक शुभ ग्रहांचा शुभ संयोग तयार होतोय. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. तसेच, हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुमच्या आरोग्यात चढ-उतार दिसून येईल. तसेच, या काळात तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. सरकारी योजनांचा लाभ घ्याल. आठवड्याच्या सुरुवातीला मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच, कोणाचाही जास्त विचार करु नका. तुमच्या मनाप्रमाणे कामे करा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आठवड्याची सुरुवात सकारात्मक असेल. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पैशांचा खर्च करताना काळजी घ्या. तसेच, प्रेम संबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. सकारात्मक गोष्टी घडायला वेळ लागेल. अशा वेळी संयम राखणं गरजेचं आहे.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नवा आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात अनेक सुख-दु:खाच्या गोष्टी तुमच्याबरोबर घडताना दिसतील. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. तसेच, कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा पहिला आठवडा समाधानकारक असणार आहे. या आठवड्यात तुमच्या जास्त काही अपेक्षा नसतील. मात्र तुमचा अपेक्षाभंग देखील होणार नाही. तुमच्या व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. मुलांच्या कलागुणांना चालना मिळेल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट पाहायला मिळेल.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठ नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात शुभवार्ता ऐकायला मिळेल. घरात पाहुण्यांची ये-जा असेल. जे तरुण लग्न करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. नवीन व्यवसायाची सुरुवात तुम्ही करु शकता.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, नकारात्मक ऊर्जा तुमच्या आसपासही नसेल. त्यामुळे तुमच्या कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करु शकाल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. मानसिक ताण कमी करण्यासाठी योगासन करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















