Shani Margi 2025 : तब्बल 30 वर्षांनंतर शनिचा विपरीत राजयोग, वर्षाच्या शेवटी 'या' राशींचे सुरु होतील 'अच्छे दिन', अचानक होणार धनलाभ
Shani Margi 2025 : शनीचा कर्क राशीत होणाऱ्या प्रवेशामुळे गुरुसह विपरीत राजयोग निर्माण होणार आहे. गुरु कर्क राशीत 5 डिसेंबरपर्यंत असणार आहे.

Shani Margi 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनिला (Shani Dev) सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. शनिने एका राशीत परिवर्तन केल्यास सर्वात दीर्घ काळापर्यंत ते त्याच राशीत स्थित असतात. शनी एका राशीत अडीच वर्ष स्थित असतात. त्यामुळे एका राशीत (Zodiac Signs) पुन्हा येण्यासाठी शनीला तीस वर्षांचा कालावधी लागतो.
सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत स्थित आहेत. तर, 15 नोव्हेंबर रोजी याच राशीत शनी मार्गी होणार आहे. त्यामुळे या काळात मीन राशीत शनिची कोणत्या ना कोणत्या राशीबरोबर युती होणार यामुळे अनेक शुभ-अशुभ राजयोग निर्माण होणार आहेत. शनीचा कर्क राशीत होणाऱ्या प्रवेशामुळे गुरुसह विपरीत राजयोग निर्माण होणार आहे. गुरु कर्क राशीत 5 डिसेंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे हा राजयोग कोणकोणत्या राशींसाठी शुभकारक असणार आहे ते जाणून घेऊयात.
धनु रास (Saggiatrius Horoscope)
धनु राशीसाठी विपरीत राजयोग फार लाभदायी ठरणार आहे. गुरु या राशीत आठव्या स्थानी उच्च स्थितीत विराजमान आहे. यामुळे विपरीत राजयोग निर्माण होणार आहे. गुरु आणि शनिच्या या संयोगाने हा काळ तुमच्यासाठी भाग्यवान असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध होतील. भविष्यासाठी पैशांची गुंतवणूक करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच, कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
गुरु-शनिचा विपरीत राजयोग या राशीच्या लोकांसाठी फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, शनि पंचम चरणात आणि गुरु भाग्य चरणात उच्च स्थितीत विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना कर्म आणि भाग्यात लाभ मिळू शकतो. नकारात्मक ऊर्जेपासून तुम्ही दूर राहाल. तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. गुंतवणुकीच्या संबंधातील सर्व समस्या दूर होतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी विपरीत राजयोग भाग्याचा ठरणार आहे. या राशीच्या पहिल्या आणि शनि नवव्या चरणात विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अशुभ फळ कमी तर शुभ फळ जास्त मिळेल. तुमच्यावर कोणतंच कर्ज राहणार नाही. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवता येईल. नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















